शाळा

Showing posts with label शालेय-सहशालेय उपक्रम. Show all posts
Showing posts with label शालेय-सहशालेय उपक्रम. Show all posts

Sunday, 1 May 2022

जि. प. शाळा शिळ ता.अंबरनाथ येथे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन उत्साहात साजरा....

 स्वातंत्राचा अमृत महोत्सव कार्यक्रम अंतर्गत...


जि. प. शाळा शिळ ता.अंबरनाथ येथे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन उत्साहात साजरा....

          आपल्या जि. प. शाळा शिळ ता. अंबरनाथ येथे महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि राज्याच्या जिल्हा परिषदे स्थापनेस 60 वर्ष पूर्ण झाल्याने "हिरक महोत्सव" समारंभाचे आयोजन करण्यात आले.

             सर्व प्रथम शाळा व्यवस्थापन  समिती अध्यक्ष मा.सौ.वर्षाताई शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सर्व विध्यार्थी,शिक्षक,अंगणवाडी ताई आणि ग्रामस्थ यांनी राष्ट्रगीताने सलामी दिली.त्याच प्रमाणे राष्ट्रघोष करण्यात आले.

       


   महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे, १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झालेली आहे. हा दिवस मराठी माणसाचा आहे आणि तो मोठ्या उत्साहाने साजरा करतात, विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते.महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते...इत्यादी माहिती श्री.संजय मराठे सरांनी विध्यार्थ्याना करून दिली.



           आंतरराष्ट्रीय कामगार दिन किंवा जागतिक कामगार दिन हा जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी पाळण्यात येणारा दिनविशेष आहे. दर वर्षी १ मे रोजी जगभरातील ८०हून अधिक देशांमध्ये हा दिवस राष्ट्रीय सुट्टीचा दिवस म्हणून पाळला जातो असे श्री.संजय तांबे सरांनी विध्यार्थ्याना विशद केले.

           राज्याच्या जिल्हा परिषद स्थापनेस 60 वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने "हिरक महोत्सव समारंभ" निमित्त विध्यार्थ्यानी सांस्कृतिक कार्यक्रम साजरा केला. इयत्ता 1 ली ते 5 वी च्या विध्यार्थ्यानी भाषण,नाट्य,गाणी इत्यादी कार्यक्रम सादर केले.मा अध्यक्षा यांनी सर्व मुलांचे अभिनंदन केले त्याच प्रमाणे सर्व उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्याना हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले.

        श्री.संजय मराठे सरांनी उपस्थितांचे आभार मानून मुलांना नास्ता आणि खाऊ देऊन कार्यक्रमाची सांगता केली.

Sunday, 26 December 2021

नाताळ किंवा क्रिसमस सण साजरा

 नाताळ किंवा क्रिसमस सण साजरा :-


जि. प. शाळा - शिळ,ता. अंबरनाथ,जि. ठाणे येथे नाताळ सण साजरा.


         सर्वप्रथम विध्यार्थ्याना श्री.संजय मराठे सरांनी नाताळ या सणाविषयी सांगितले की नाताळ किंवा क्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी २५ डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. काही ठिकाणी ह्या सणाऐवजी एपिफनी सण ६, ७ किंवा १९ जानेवारीला साजरा केला जातो.ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण १२ दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळच्या पोप पहिला ज्युलियसने ‘२५ डिसेंबर’ हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला.त्या वेळेपासून नाताळ हा दिवस २५ डिसेंबर या तारखेला साजरा केला जाऊ लागला. अशी माहिती दिली.

          तद्नंतर श्री.तांबे सरांनी सांता क्लॉज हे पाश्चिमात्य ख्रिश्चन धर्मात आणि संस्कृतीत आढळणारे काल्पनिक पात्र आहे. सांता क्लॉजाचे नाताळ सणाशी अतूट नाते आहे. सांता क्लॉज जगभरातील मुला-मुलींना नाताळच्या आदल्या रात्री म्हणजे २४ डिसेंबरला खेळणी व इतर भेटवस्तू वाटतो असा ख्रिश्चन लोकांमधे समज आहे. जगभरातील लहान मुलांचे सांताक्लॉज हे अनोखे आणि आवडते पात्र आहे. असे नमूद केले.

            नाताळ या सणाची सविस्तर माहिती सांगून झाल्यावर मुलांना कागदी टोप्या बनवून सांता क्लोज चा खाऊ वाटप खेळ घेण्यात आला.मुलांचे पटांगणात खेळ आणि नृत्य घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



गणित महोत्सव उपक्रम

गणित महोत्सव उपक्रम:-

              

भारतीय गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा 22 डिसेंबर जन्मदिन प्रत्येक वर्षी राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो.शालेय स्तरापासून विध्यार्थ्याना गणित विषयाची गोडी लागावी तसेच गणितीय दृष्टिकोन विकसित व्हावा यासाठी गणित

दिनानिमित्त आपल्या जि. प. शाळा शिळ,ता.अंबरनाथ(ठाणे) येथे विविध गणितीय उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

          पायाभूत संख्याज्ञान आणि गणितीय क्षमता विषयी बोलतांना  श्री.संजय मराठे सर यांनी विध्यार्थ्याना  संख्यात्मक संकल्पना आणि त्यांच्यातील कार्यकारणभाव,गणनपूर्व संकल्पना,संख्याची तुलना,क्रमवार संख्या,वर्गीकरण,आकृतिबंध इत्यादी गोष्टींची प्रात्याक्षिके करून विध्यार्थ्याना समजाऊन सांगितले.गोट्या,खडे,पत्ते, काड्या,रंगीत खंडू,संख्याकार्ड इत्यादी गोष्टींच्या सहाय्याने विध्यार्थ्याना मार्गदर्शन केले.

             परिसरातील गणित,गणित शब्दकोडी,गणित पेटीतिल साहित्य,व्यावहारातील गणित इत्यादी बाबींचे कल्पक आणि रंजक खेळ खेळून श्री.तांबे सरांनी विध्यार्थ्यामधील गणित विषयाची भीती घालवली आणि विध्यार्थ्याना बोलते केले.

               विध्यार्थ्यानी गणितीय रांगोळी,चित्रकला स्पर्धा,गणितीय खेळ,गणित शब्दकोडी इत्यादी खेळरूपी उपक्रमात भाग घेऊन कार्यक्रमात रंजकता आणली.

                 स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या विध्यार्थ्याना प्रोत्साहन म्हणून शाळा व्यवस्थापन समिती,पालक आणि शिक्षकवर्गाकडून शैक्षणिक वस्तूंचे बक्षीस रूपाने वाटप करण्यात आले.सर्व विध्यार्थ्याना गोड खाऊ देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली




संत गाडगे महाराज यांच्या स्मृतीदिन

 संत गाडगे महाराज यांच्या स्मृतीदिन :-


आज दि.20 डिसेंबर रोजी वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज यांच्या स्मृती दिनानिमित्त जि. प. शाळा शिळ,ता. अंबरनाथ, जि. ठाणे येथे छोटे खाणी कार्यक्रम पार पडला.

                 सर्वप्रथम संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला श्री.तांबे सरांनी पुष्पहार चढवून प्रतिमा पूजन केले.संत गाडगे महाराज यांच्या विषयी श्री. संजय मराठे सरांनी -गाडगे बाबा यांचा जन्म शेंडगाव येथे २३ फेब्रुवारी १८७६ मध्ये झाला.आणि मृत्यू अमरावती येथे २० डिसेंबर १९५६ रोजी झाला. हे गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे इत्यादी माहिती सांगितली.तद्नंतर शालेय आवार,रस्ते,आणि परिसर सर्व विध्यार्थी आणि शिक्षकांनी मिळून झाडून स्वच्छ केले.



चावडी वाचन कार्यक्रम

 चावडी वाचन कार्यक्रम:-

      शासन निर्णय व मा. जिल्हाधिकारी सो. ठाणे यांचे आदेशान्वये दि.16/12/2021 रोजी दुपारी 1:30 वाजता चावडी वाचन कार्यक्रम अंतर्गत मौजे शिळ येथील ग्रामस्थांना मा सरपंच सौ.दर्शना दिनेश बनोटे,तलाठी श्री.पट्टेबहाद्दूर, शाळेतील शिक्षक श्री.तांबे सर,श्री.मराठे सर ,माजी मंडल अधिकारी श्री.बडेकर तात्या,ग्रामस्थ श्री.नरेश बनोटे,श्री.सुभाष रोणे,श्री.रामदास शिंदे,श्री.रामचंद्र बनोटे,श्री.छगन बनोटे,श्री.अनंत बनोटे,श्री.पुंडलिक बनोटे,श्री.बबन ठोंबरे श्री.दिनेश बनोटे यांच्या उपस्थितीत खालील माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले...

1.मयत खातेदारांची यादी तयार करण्यासाठी गाव नमुना 8 अ चे वाचन करण्यात आले.

2.मंजूर फेरफारांचा गा.न.नं 7/12 सदरी अंमल न दिलेल्या फेरफारांची यादी तयार करण्यात आली.

3.प्रलंबित फेरफारांची यादी तयार करून संस्था निश्चित करण्यात आली.

4.7/12 चे इतर हक्कातील नोंदीबाबत आक्षेप असल्यास तो नोंदवून घेण्यात आला.

5.सोसायटी/बँकांच्या कर्जाच्या दीर्घकालीन नोंदी तपासणी करण्यात आल्या.

6.अ. पा. क. च्या नोंदी तपासून सज्ञानांची नोंद घेणेकामी जन्मदाखला व इतर पुरावे घेऊन अर्ज स्विकारण्यात आली.

           वरील सर्व बाबींच्या अनुषंगाने येणारे कामकाज चावडी वाचन कार्यक्रमांतर्गत करून तमाम खातेदारांचे शंकानिरसन करण्यात येऊन श्री.संजय मराठे सरांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.



शाळा प्रवेश कार्यक्रम

 शाळा प्रवेश कार्यक्रम :-


स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत...


जि. प. शाळा -शिळ, ता.अंबरनाथ(ठाणे) येथे कोविड 19 प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर आज दि .15 डिसेंबर 2021 रोजी शाळा पूर्ववत सुरू......

           आज दि.15 डिसेंबर 2021 रोजी जि. प. शाळा शिळ,ता. अंबरनाथ येथे शासनाच्या लेखी आदेशान्वये कोरोनाचे नियम पाळत इयत्ता 1 ली ते 4 थी विद्यार्थ्याचा शाळा प्रारंभ दिनी सर्व परिसरात रांगोळी काढण्यात आली.दाराला आंब्यांच्या पानांचे तोरण बांधून सजवण्यात आले. आनंदाच्या वातावरणात विध्यार्थ्याचे स्वागत करण्यात आले.

           शाळेच्या आवारात सर्व विध्यार्थ्याचे ऑक्सिजन लेव्हल आणि टेम्प्रेचर लेव्हल तपासण्यात आली.सर्व  विद्यार्थ्याना शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष सौ.वर्षा शिंदे यांच्या कडून औक्षण करण्यात आले.आगमन झालेल्या विदयार्थी तसेच पालक यांच्याशी श्री.संजय मराठे सर आणि श्री.संजय तांबे सर यांनी हितगुज केली.दोन्ही शिक्षकांनी स्वखर्चाने आणलेले शैक्षणिक साहित्याचे विध्यार्थ्याना वाटप करण्यात आले.सर्व विध्यार्थ्याना तोंड गोड करण्यासाठी चॉकलेट आणि बिस्किटांचे वाटप करण्यात आले.

          सर्व बालगोपालांच्या चिमुकल्या पावलांनी सर्व शाळेचा परिसर दुमदुमून गेला....



संविधान दिन आणि शौर्यगाथा सलाम दिन

 संविधान दिन आणि शौर्यगाथा सलाम दिन:-


जिल्हा परिषद शाळा - शिळ ता.अंबरनाथ ,जि. ठाणे. येथे संविधान दिन आणि शौर्यगाथा सलाम दिन साजरा... 

     

        जिल्हा परिषद शाळा शिळ येथे  संविधान दिवसाचे औचित्य साधत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला ग्रामपंचायत सरपंच आदरणीय सौ.दर्शना दिनेश बनोटे यांनी प्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि 26 /11 च्या हुतात्म्यांच्या फोटोला हार घालून अभिवादन केले.

          सर्व उपस्थित शिक्षक,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य,अंगणवाडी कर्मचारी,पालक,आणि विध्यार्थ्यानी सामूहिक संविधान उद्देशिकेचे वाचन करून आरोग्य शपथ घेतली.

         श्री संजय मराठे सर यांनी भारतीय संविधानातील मूलभूत हक्क व कर्तव्य समजाऊन सांगत असतांनाच भारतीय संविधान तयार करण्यासाठी एकूण दोन वर्षे ११ महिने आणि १८ दिवस लागले. आपल्या संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र भारतात राहण्याचा समान अधिकार दिला आहे. पाश्चिमात्य संस्कृतीच्या युगात देशातील तरुणांमध्ये संविधानाची मूल्ये रुजवणे हा संविधान दिन साजरा करण्यामागचा एकमेव उद्देश आहे असे नमूद केले.

          आपल्या देशाच्या संविधानाच्या निर्मितीमध्ये डॉ. भीमराव आंबेडकर यांचा सर्वात महत्त्वाचा वाटा होता. त्यामुळे त्यांना आदरांजली वाहण्याचे प्रतीक म्हणूनही संविधान दिन साजरा केला जातो. असे श्री संजय तांबे सर यांनी विद्यार्थ्याना स्पष्ट केले.तद्नंतर शहीद हुतात्म्यांची माहिती विद्यार्थ्याना देण्यात आली.

         देशाबद्दल आपले कर्तव्य आणि निष्ठा याबाबत विध्यार्थ्यामध्ये जागरूकता निर्माण करून खाऊचे वाटप केले...आणि कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


       यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,सदस्य,अंगणवाडी ताई,मदतनीस ताई,शा पो आहार शिजवणाऱ्या ताई उपस्थित होत्या.



बहुजनांच्या प्रज्ञेचा सूर्य: कर्मवीर

 ▪️बहुजनांच्या प्रज्ञेचा सूर्य: कर्मवीर                      महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात आणि समाजसुधारणेच्या प्रदीर्घ इतिहासात कर्मवीर ...