स्वातंत्राचा अमृत महोत्सव कार्यक्रम अंतर्गत...
जि. प. शाळा शिळ ता.अंबरनाथ येथे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन उत्साहात साजरा....
आपल्या जि. प. शाळा शिळ ता. अंबरनाथ येथे महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि राज्याच्या जिल्हा परिषदे स्थापनेस 60 वर्ष पूर्ण झाल्याने "हिरक महोत्सव" समारंभाचे आयोजन करण्यात आले.
सर्व प्रथम शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा.सौ.वर्षाताई शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सर्व विध्यार्थी,शिक्षक,अंगणवाडी ताई आणि ग्रामस्थ यांनी राष्ट्रगीताने सलामी दिली.त्याच प्रमाणे राष्ट्रघोष करण्यात आले.
महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे, १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झालेली आहे. हा दिवस मराठी माणसाचा आहे आणि तो मोठ्या उत्साहाने साजरा करतात, विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते.महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते...इत्यादी माहिती श्री.संजय मराठे सरांनी विध्यार्थ्याना करून दिली.
आंतरराष्ट्रीय कामगार दिन किंवा जागतिक कामगार दिन हा जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी पाळण्यात येणारा दिनविशेष आहे. दर वर्षी १ मे रोजी जगभरातील ८०हून अधिक देशांमध्ये हा दिवस राष्ट्रीय सुट्टीचा दिवस म्हणून पाळला जातो असे श्री.संजय तांबे सरांनी विध्यार्थ्याना विशद केले.
राज्याच्या जिल्हा परिषद स्थापनेस 60 वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने "हिरक महोत्सव समारंभ" निमित्त विध्यार्थ्यानी सांस्कृतिक कार्यक्रम साजरा केला. इयत्ता 1 ली ते 5 वी च्या विध्यार्थ्यानी भाषण,नाट्य,गाणी इत्यादी कार्यक्रम सादर केले.मा अध्यक्षा यांनी सर्व मुलांचे अभिनंदन केले त्याच प्रमाणे सर्व उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्याना हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले.
श्री.संजय मराठे सरांनी उपस्थितांचे आभार मानून मुलांना नास्ता आणि खाऊ देऊन कार्यक्रमाची सांगता केली.


No comments:
Post a Comment