शाळा

Showing posts with label माहिती. Show all posts
Showing posts with label माहिती. Show all posts

Monday, 24 July 2023

ग्रामपंचायत बद्दल संपूर्ण माहिती

 🏡 ग्रामपंचायत बद्दल संपूर्ण माहिती ----


➡कायदा - 1958 (मुंबई ग्रामपंचायत अधिनियम)कलम 5 मध्ये प्रत्येक गावासाठी एक ग्रामपंचायत स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे. परंतु एखाद्या गावामध्ये 600 लोकसंख्या असेल त्याठिकाणी गट ग्रामपंचायत स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे.


➡लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची सभासद संख्या :

600 ते 1500 - 7 सभासद

1501 ते 3000 - 9 सभासद

3001 ते 4500 - 11 सभासद

4501 ते 6000 - 13 सभासद

6001 ते 7500 - 15 सभासद

7501 त्यापेक्षा जास्त - 17 सभासद


➡निवडणूक - प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने राज्य निवडणूक आयोग घेते.


➡कार्यकाल - 5 वर्ष


➡विसर्जन - कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी राज्यसरकार विसर्जित करू शकते.


➡आरक्षण :

👉महिलांना - 50%

👉अनुसूचीत जाती/जमाती - लोकसंख्येच्या प्रमाणात

👉इतर मागासवर्ग - 27% (महिला 50%)


➡ग्रामपंचायतीच्या सभासदांची पात्रता :

👉तो भारताचा नागरिक असावा.

👉त्याला 21 वर्ष पूर्ण झालेली असावीत.

👉त्याचे गावच्या मतदान यादीत नाव असावे.


➡ग्रामपंचायतीचे विसर्जन : विसर्जित झाल्यापासून सहा महिन्याच्या आत निवडणूक घेणे बंधनकारक आहे तिच्या राहिलेल्या कालावधीसाठी पुढे काम करणे.


➡सरपंच व उपसरपंच यांची निवड : निवडून आलेल्या सदस्यांमधूनच ग्रामपंचायतीच्या पहिल्या सभेच्या वेळी केले जाते.


➡सरपंच व उपसरपंचाचा कार्यकाल : 5 वर्ष इतका असतो परंतु त्यापूर्वी ते आपला राजीनामा देतात.


➡राजीनामा :

👉सरपंच - पंचायत समितीच्या सभापतीकडे देतो.

👉उपसरपंच - सरपंचाकडे


➡निवडणुकीच्या वेळी वाद निर्माण झाल्यास :

सरपंच-उपसरपंचाची निवड झाल्यापासून 15 दिवसांच्या आत जिल्हाधिकार्‍याकडे तक्रार करावी लागते व त्यांनी दिलेल्या निर्णयानंतर त्याविरोधी 15 दिवसांच्या आत विभागीय आयुक्तांकडे तक्रार करावी लागते.


➡अविश्वासाचा ठराव :

👉सरपंच आणि उपसरपंचाची निवड झाल्यापासून 6 महिन्यांपर्यंत अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही व तो फेटाळला गेल्यास पुन्हा त्या तारखेपासून 1 वर्षापर्यंत मांडता येत नाही.


👉बैठक : एका वर्षात 12 बैठका होतात (म्हणजे प्रत्येक महिन्याला एक)


👉अध्यक्ष : सरपंच असतो नसेल तर उपसरपंच


👉तपासणी : कमीत कमी विस्तारात अधिक दर्जाच्या व्यक्तीकडून तपासणी केली जाते.


👉अंदाजपत्रक : सरपंच तयार करतो व त्याला मान्यता पंचायत समितीची घ्यावी लागते.


👉आर्थिक तपासणी : लोकल फंड विभागाकडून केली जाते.


➡ग्रामसेवक / सचिव :

निवड : जिल्हा निवडमंडळाकडून केली जाते.

नेमणूक : मुख्य कार्यकारी अधिकारी.

नजीकचे नियंत्रण : गट विकास अधिकारी.

कर्मचारी : ग्रामविकास खात्याचा वर्ग-3 चा.


➡कामे :

👉ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून काम करतो.

👉ग्रामपंचायतीचे दफ्तर सांभाळणे.

👉कर्मचार्‍यांवर नियंत्रण ठेवणे.

👉ग्रामपंचायतीचा अहवाल पंचायत समिती व जिल्हा परिषदेला देणे.

👉व्हिलेज फंड सांभाळणे.

👉ग्रामसभेचा सचिव म्हणून काम पाहणे.

👉ग्रामपंचातीच्याबैठकांना हजर राहणे व इतिबृत्तांत लिहणे.

👉गाव पातळीवर बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून काम करणे.

👉जन्म-मृत्यूची नोंद करणे.


➡ग्रामपंचातीची कामे व विषय :

कृषी

समाज कल्याण

जलसिंचन

ग्राम संरक्षण

इमारत व दळणवळण

सार्वजनिक आरोग्य व दळणवळण सेवा

सामान्य प्रशासन


👉ग्रामसभा : मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार निर्मिती करण्यात आली आहे.


👉बैठक : आर्थिक वर्षात (26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 2 ऑक्टोंबर)


👉सभासद : गावातील सर्व प्रौढ मतदार यांचा समावेश होता.


👉अध्यक्ष : सरपंच नसेल तर उपसरपंच


👉ग्रामसेवकाची गणपूर्ती : एकूण मतदारांच्या 15% सभासद किंवा एकूण100 व्यक्तींपैकी जी संख्या कमी असेल.

___________________________________


✳✴ग्रामपंचायतींची कार्ये✴✴


१. कृषी – जमीन सुधारणा, धान्य कोठारांची निर्मिती, कंपोष्ट खात निर्मिती, सुधारित बियाणांचा वापर, सुधारित शेती प्रोत्साहन.


२. पशु संवर्धन – पशुधनाची काळजी, संकरीत गुराच्या पैदाशीसाठी प्रयत्न करणे, दुग्धोत्पादन वाढविणे, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करणे.


३. समाजकल्याण – दारूबंदीस प्रोत्साहन, जुगार आणि अस्पृश्यता नष्ट करणे, महिला/बालकल्याणाच्या योजना लाभार्थींपर्यंत पोहोचविणे.


४. शिक्षण – प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षणाची सोय करणे, गावाचा शैक्षणिक विकास.


५. आरोग्य – सार्वजनिक विहीर, गटारे आणि परिसर स्वच्छ राखणे, शासकीय योजना राबविणे, शुद्ध जल पुरवठा.


६. रस्ते बांधणी – रस्ते, पूल, साकव यांची बांधकामे करणे, सार्वजनिक बाग, क्रीडांगणे, सचिवालय बंधने.


७. ग्रामोद्योग आणि सहकार – स्वयं रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे, कार्यकारी संस्था/पतपेढ्या स्थापणे.


८. प्रशासन - महसुलाची कागदपत्रे अद्ययावत करणे, सार्वजनिक मालमत्तेची नोंद ठेवणे, घरांची नोंद ठेवणे, जन्म, मृत्यू आणि विवाहाची नोंद ठेवणे, बक्षिसांची नोंद, अतिक्रमणे हटविणे .

___________________________________


✔आपणास आवश्‍यक असलेली माहिती कोणत्या नोंदवहीत असते याबाबत ही माहिती.


* गाव नमुना नंबर - 1 - या नोंदवहीमध्ये भूमी अभिलेख खात्याकडून आकारबंध केलेला असतो, ज्यामध्ये जमिनीचे गट नंबर, सर्व्हे नंबर दर्शविलेले असतात व जमिनीचा आकार (ऍसेसमेंट) बाबतती माहिती असते.


* गाव नमुना नंबर - 1अ - या नोंदवहीमध्ये वन जमिनीची माहिती मिळते. गावातील वन विभागातील गट कोणते हे समजते. तशी नोंद या वहीत असते.


* गाव नमुना नंबर - 1ब - या नोंदवहीमध्ये सरकारच्या मालकीच्या जमिनीची माहिती मिळते.


* गाव नमुना नंबर - 1क - या नोंदवहीमध्ये कुळ कायदा, पुनर्वसन कायदा, सिलिंग कायद्यानुसार भोगवटादार यांना दिलेल्या जमिनी याबाबतची माहिती असते. सातबाराच्या उताऱ्यामध्ये नवीन शर्त असल्यास जमीन कोणत्या ना कोणत्या तरी पुनर्वसन कायद्याखाली किंवा वतनाखाली मिळालेली जमीन आहे असे ठरविता येते.


* गाव नमुना नंबर - 1ड - या नोंदवहीमध्ये कुळवहिवाट कायदा अथवा सिलिंग कायद्यानुसार अतिरिक्त जमिनी, त्यांचे सर्व्हे नंबर व गट नंबर याबाबतची माहिती मिळते.


* गाव नमुना नंबर - 1इ - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनींवरील अतिक्रमण व त्याबाबतची कार्यवाही ही माहिती मिळते.


* गाव नमुना नंबर - 2 - या नोंदवहीमध्ये गावातील सर्व बिनशेती (अकृषिक) जमिनींची माहिती मिळते.


* गाव नमुना नंबर - 3 - या नोंदवहीत दुमला जमिनींची नोंद मिळते. म्हणजेच देवस्थाना साठीची नोंद पाहता येते.


* गाव नमुना नंबर - 4 - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीचा महसूल, वसुली, विलंब शुल्क याबाबतची माहिती मिळते.


* गाव नमुना नंबर - 5 - या नोंदवहीत गावाचे एकूण क्षेत्रफळ, गावाचा महसूल, जिल्हा परिषदेचे कर याबाबतची माहिती मिळते.


* गाव नमुना नंबर - 6 - (हक्काचे पत्रक किंवा फेरफार) या नोंदवहीमध्ये जमिनीच्या व्यवहारांची माहिती, तसेच खरेदीची रक्कम, तारीख व कोणत्या नोंदणी कार्यालयात दस्त झाला याची माहिती मिळते.


* गाव नमुना नंबर - 6अ - या नोंदवहीमध्ये फेरफारास (म्युटेशन) हरकत घेतली असल्यास त्याची तक्रार व चौकशी अधिकाऱ्यांचा निर्णय याबाबतची माहिती मिळते.


* गाव नमुना नंबर - 6क - या नोंदवहीमध्ये वारस नोंदीची माहिती मिळते.


* गाव नमुना नंबर - 6ड - या नोंदवहीमध्ये जमिनीचे पोटहिस्से, तसेच वाटणी किंवा भूमी संपादन याबाबतची माहिती मिळते.


* गाव नमुना नंबर - 7 - (7/12 उतारा) या नोंदवहीमध्ये जमीन मालकाचे नाव, क्षेत्र, सर्व्हे नंबर, हिस्सा नंबर, गट नंबर, पोट खराबा, आकार, इतर बाबतीची माहिती मिळते.


* गाव नमुना नंबर - 7अ - या नोंदवहीमध्ये कुळ वहिवाटीबाबतची माहिती मिळते. उदा. कुळाचे नाव, आकारलेला कर व खंड याबाबतची माहिती मिळते.


* गाव नमुना नंबर - 8अ - या नोंद

वहीत जमिनीची नोंद, सर्व्हे नंबर, आपल्या नावावरील क्षेत्र व इतर माहिती मिळते.


* गाव नमुना नंबर - 8ब, क व ड - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या महसूल वसुलीची माहिती मिळते.


* गाव नमुना नंबर - 9अ - या नोंदवहीत शासनाला दिलेल्या पावत्यांची माहिती मिळते.


* गाव नमुना नंबर - 10 - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या जमा झालेल्या महसुलाची माहिती मिळते.


* गाव नमुना नंबर - 11 - या नोंदवहीत प्रत्येक गटामध्ये सर्व्हे नंबर, पीकपाणी व झाडांची माहिती मिळते.


* गाव नमुना नंबर - 12 व 15 - या नोंदवहीमध्ये पिकाखालील क्षेत्र, पडीक क्षेत्र, पाण्याची व्यवस्था व इतर बाबतीची माहिती मिळते.


* गाव नमुना नंबर - 13 - या नोंदवहीमध्ये गावाची लोकसंख्या व गावातील जनावरे याबाबतची माहिती मिळते.


* गाव नमुना नंबर - 14 - या नोंदवहीमध्ये गावाच्या पाणीपुरवठ्याबाबतची माहिती, तसेच वापरली जाणारी साधने याबाबतची माहिती मिळते.


* गाव नमुना नंबर - 16 - या नोंदवहीमध्ये माहिती पुस्तके, शासकीय आदेश व नवीन नियमावली याबाबतची माहिती मिळते.


* गाव नमुना नंबर - 17 - या नोंदवहीमध्ये महसूल आकारणी याबाबतची माहिती मिळते.


* गाव नमुना नंबर - 18 - या नोंदवहीमध्ये सर्कल ऑफिस, मंडल अधिकारी यांच्या पत्रव्यवहाराची माहिती असते.


* गाव नमुना नंबर - 19 - या नोंदवहीमध्ये सरकारी मालमत्तेबाबतची माहिती मिळते.


* गाव नमुना नंबर - 20 - पोस्ट तिकिटांची नोंद याबाबतची माहिती मिळते.


* गाव नमुना नंबर - 21 - या नोंदवहीमध्ये सर्कल यांनी केलेल्या कामाची दैनंदिन नोंद याबाबतची माहिती मिळते.


अशा प्रकारे तलाठी कार्यालयात सामान्य नागरिकांना गाव कामगार तलाठी यांच्याकडून वरील माहिती विचारणा केल्यास मिळू शकते. आपणास आपल्या मिळकतीबाबत व गावाच्या मिळकतीबाबत माहिती मिळाल्यामुळे मिळकतीच्या मालकी व वहिवाटीसंबंधीचे वाद कमी होण्यास व मिटण्यास मदत    शकते असे वाटते.यात सहभागी होवा आपला गाव आपला विकास

- नरेंद्र चौधरी, संपादक - सायंदैनिक राजरंग टाइम्स,  दैनिक लोकमैत्री, साप्ताहिक सखी मंच

Wednesday, 17 August 2022

मतदान कार्ड ला आधार कार्ड मोबाईल द्वारे लिंक करणे.

 🎯मतदान कार्ड ला आधार कार्ड मोबाईल द्वारे लिंक करणे.


चला तर मग मतदान कार्ड आणि आधार कार्ड मोबाईल द्वारे एकमेकांशी कसे लिंक करायचे ते पाहू या.


🎯स्टेप 1:

मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हला तुमच्या गुगल मध्ये जाऊन NVSP सर्च करायचे आहे, जो पहिला रिझल्ट येईल त्यावर क्लिक करायचे आहे किंवा तुम्ही या लिंकला www.nvsp.in क्लिक करून थेट NVSP चे पोर्टल ओपन करू शकता.


🎯स्टेप 2:

NVSP चे पोर्टल ओपन झाल्यावर तुम्हाला Login/Register या बटन वर क्लीक करायचे आहे.

अधिक माहिती – तुम्हाला या पेज वर जी फॉर्म ची लिस्ट दाखवली जात आहे याचा अर्थ म्हणजे तुम्ही या पोर्टलवर पुढील फॉर्म ऑनलाईन भरू शकता. जो फॉर्म मतदान कार्ड आणि आधार कार्ड लिंक करून देतो त्याचे नाव आहे Form 6B-Information of Aadhaar Number by Existing Electors


🎯स्टेप 3:

तुमचे जर NVSP पोर्टल वर आधीपासून अकाउंट असेल तर तुम्ही तुमचे Username व Password टाकून लॉग इन करा. पण जर तुमचे अकाउंट नसेल तर खाली एक ऑपशन दिला आहे, Don’t have account, Register as a new user या ऑपशन वर क्लीक करायचे आहे.


🎯स्टेप 4:

आता या पोर्टल वर नवीन अकाउंट उघडण्याची प्रक्रिया बघू: आता नवीन पेज वर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून दिलेला कॅपचा (Captcha) टाकायचा आहे, व Send OTP या बटन वर क्लिक करायचे आहे. ओटीपी आल्यानंतर तो दिलेल्या बॉक्स मध्ये टाकायचा आहे व नंतर Verify OTP या बटन वर क्लिक करायचे आहे.


🎯स्टेप 5:

आता नवीन पेज उघडेल त्यावर तुम्हाला दोन ऑपशन दिसतील

I have EPIC number

I don’t have EPIC number

या दोघांपैकी तुम्हाला पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. व खाली दिलेल्या बॉक्स मध्ये तुमचा EPIC नंबर म्हणजेच तुमचा मतदान कार्ड नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा ई-मेल आयडी टाकायचा आहे व नंतर पासवर्ड क्रिएट करायचा व पुन्हा तोच पासवर्ड टाकून कन्फर्म करायचा आहे. व नंतर Register या बटन वर क्लीक करायचे आहे.

त्यानंतर तुम्हाला You are Register Successfully असा मेसेज येईल व तुमचा अकाउंट तयार होऊन जाईल.

नोट – तुम्ही आता भरलेली माहिती तुम्हाला पुढच्या वेळी या पोर्टल वर लॉगिन करताना उपयोगी पडणार आहे.


🎯स्टेप 6:

आता पोर्टल तुमचे अकॉउंट ऑटोमॅटिक लॉगिन करेल आणि तुम्हाला नवीन पेज वर घेऊन जाईल (संदर्भासाठी खालचा फोटो बघा), जर असे झाले नाही तर स्टेप 3: मध्ये सांगितल्या प्रमाणे तुम्हाला पोर्टल वर Username व Password टाकून लॉगिन करायचे आहे.

आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल त्यातील तीन नंबर चा ऑपशन (Information of Aadhaar Number by Existing Electors) वर क्लिक करायचा आहे.


🎯स्टेप 7:

त्यानंतर तुमच्या समोर काही फॉर्म ओपन होतील, त्यातील Form 6B चा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. त्या फॉर्म वर क्लिक करा.


🎯स्टेप 8:

या फॉर्म मध्ये तुम्हाला तुमचं नाव, आडनाव, मतदान कार्ड नंबर, वगैरे माहिती दिसेल ही सर्व माहिती बरोबर आहे का ते चेक करायचे आहे.


🎯स्टेप 9:

आता वेळ आली आहे ती तुमचा आधार कार्ड नंबर लिंक करण्याची. तुमची माहिती चेक करून झाल्यानंतर थोडे खाली स्क्रोल करा, तुम्हाला दोन ऑपशन दिसतील

I have Aadhaar Number

I am not able to furnish my Aadhaar Number…

यातील तुम्हाला पहिला ऑपशन निवडायचा आहे (I have Aadhaar Number) याचा अर्थ तुमच्याकडे तुमचा आधार नंबर आहे. आता तुमचा मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, आधार नंबर आणि त्याखाली Place या ऑपशन मध्ये तुमच्या गावाचं नाव टाकायचे आहे. व नंतर खाली दिलेला कॅपचा टाकायचा आहे व नंतर Preview या बटन वर क्लीक करायचे आहे.

जर तुम्ही आधार कार्ड तयार केले नसेल तर दुसरा ऑपशन (I am not able to furnish my Aadhaar Number… ) निवडावा लागेल आणि खाली सांगितलेले कागदपत्रे (लायसन्स, पॅन कार्ड, वगैरे…) अपलोड करावी लागतील.


🎯स्टेप 10:

मित्रांनो, Preview बटन वर क्लीक केल्यानंतर तुम्ही टाकलेली माहिती दिसेल ती सगळी माहिती चेक करून घ्या. बरोबर असेल तर वरती Print चा ऑपशन दिसेल त्यावर क्लीक करून त्याची प्रिंट काढू शकता किंवा त्याचा स्क्रिन शॉट पण काढू शकता.

आता ही माहिती आपल्याला सबमिट करायची आहे. त्यासाठी खाली दिलेल्या Submit या ऑपशन वर क्लीक करायचे आहे.


🎯स्टेप 11:

नंतर तुम्हाला इथे एक Reference ID दिला जाईल. तो तुम्ही Save करून ठेवायचा आहे. कारण तो Reference ID तुम्हाला नंतर स्टेटस चेक करण्यासाठी लागणार आहे (म्हणजेच तुमचे लिंकिंचे काम कुठेपर्यंत आले आहे ते तपासण्यासाठी).


🎯स्टेप 12:

तुमचे मतदान कार्ड व आधार कार्ड लिंक झाले की नाही ते पाहण्यासाठी तुम्ही Track status मध्ये तुमचा Reference ID टाकून तुम्ही तुमच स्टेटस चेक करू शकता.


तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण मतदान कार्ड व आधार कार्ड एकमेकांशी लिंक करण्याची पूर्ण प्रोसेस म्हणजेच माहिती बघितली. आशा आहे की तुम्हाला आज चा लेख नक्कीच आवडला असेल. तसेच हा महत्वपूर्ण लेख तुमच्या मित्र-मंडळीं सोबत नक्की शेअर करा, म्हणजे त्यांनाही याचा फायदा होईल. धन्यवाद...!

Saturday, 27 November 2021

आधार कार्ड हरवले?आधार क्रमांक आठवत नाही? आधार क्रमांक ऑनलाइन कसा शोधायचा ते जाणून घ्या!

 आधार कार्ड हरवले ? आधार क्रमांक आठवत नाही ? आधार क्रमांक ऑनलाइन कसा शोधायचा ते जाणून घ्या...!


प्रत्येक भारतीय नागरिकाला ओळख म्हणून आधार कार्ड आवश्यक आहे. भारतीय ओळखीच्या पुराव्यांपैकी सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे आधार कार्ड. तुमचे आधार कार्ड हरवल्याने ओळख पडताळणी आवश्यक असलेल्या वेगवेगळ्या ठिकाणी अडचणी निर्माण होऊ शकतात. आधार कार्ड हे युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) द्वारे जारी केलेले एक प्रकारचे दस्तऐवज आहे. कार्डमध्ये बायोमेट्रिक क्रेडेंशियल्स, जसे की व्यक्तीचे बोटांचे ठसे, डोळ्यांचे बुबुळ, तसेच नाव, जन्मतारीख, लिंग आणि पत्ता यासारखी प्रमाणित ओळख दस्तऐवज माहिती समाविष्ट असते. त्याचे महत्त्व लक्षात घेता, तुम्ही हे ओळखपत्र हरवल्यास, तुम्ही ते शक्य तितक्या लवकर पुन्हा जारी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आधार कार्ड चुकीचे असल्यास ते पुन्हा जारी करण्याची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी, सरकारच्या UIDAI ने पडताळणी करण्यायोग्य 12-अंकी ओळख क्रमांक ऑनलाइन मिळवण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. जर आपले आधार कार्ड हरवले असेल, व आपल्याला आपला आधार क्रमांक आठवत नसेल, तर UIDAI च्या अधिकृत पोर्टलचा वापर करून काही मिनिटांत आपण आपला आधार क्रमांक मिळवू शकतो. ही सेवा वापरण्यासाठी तुमचा नोंदणीकृत मोबाइल क्रमांक तुमच्या आधार क्रमांकाशी जोडला जाणे(लिंक असणे) आवश्यक आहे. तसे नसल्यास, तुम्ही ऑफलाइन तंत्र वापरून आधार कार्ड मिळवू शकता.

★ आपला आधार क्रमांक ऑनलाइन मिळवण्यासाठी खालील 
स्टेप्स follow करा.


◆ सर्वप्रथम, तुमच्या फोन किंवा PC वरून (https://resident.uidai.gov.in/) या अधिकृत UIDAI वेबसाइटवर जा.

◆ त्यानंतर, आधार सेवा या पर्यायावर क्लिक करा.

◆ आता, वर्तमान पृष्ठाच्या ‘हरवलेले किंवा विसरलेले EID/UID पुनर्प्राप्त करा’ या टॅबवर क्लिक करा.

◆ त्यानंतर, ‘निवडा’ या विभागाअंतर्गत, तुम्ही योग्य पेजवर यशस्वीरित्या नेव्हिगेट केल्यानंतर ‘आधार क्रमांक (UID)’ बुलेट हा पर्याय निवडा.

◆ आता, विचारलेली माहिती पूर्ण भरा. प्रथम आपले संपूर्ण नाव, फोन नंबर आणि ईमेल पत्त्यासह आपली वैयक्तिक माहिती प्रविष्ट करणे आवश्यक आहे.

◆ त्यानंतर, पृष्ठावरील कॅप्चा दोनदा प्रविष्ट करा.

◆ आता, ‘ओटीपी पाठवा’ या बटणावर क्लिक करा.

◆ मेलमध्ये सहा-अंकी वन-टाइम पासवर्ड येईपर्यंत प्रतीक्षा करा आणि नंतर तो इनपुट करा.

◆ अशाप्रकारे आपण आपला आधार क्रमांक ईमेल पत्त्यावरून किंवा मोबाइल क्रमांकावरून पुनर्प्राप्त करू शकता. तुमचा आधार नावनोंदणी आयडी चुकीचा किंवा बदलला असल्यास, तुम्ही अशाच पद्धतीचा अवलंब करू शकता.

★हरवलेला आधार क्रमांक ऑफलाइन कसा मिळवायचा?

तुमचा फोन नंबर आधारशी नोंदणीकृत नसल्यास, तुम्हाला अतिरिक्त प्रयत्न करावे लागतील.

“तुम्ही तुमचा आधार डाउनलोड करण्यासाठी आणि प्रिंटआउट घेण्यासाठी UIDAI संचालित कोणत्याही आधार सेवा केंद्राला भेट देऊ शकता. ही सेवा फक्त UIDAI संचालित ASK वर उपलब्ध आहे. वेबसाइटनुसार. 15 दिवसांच्या आत, तुमचा पुनर्मुद्रित आधार कार्ड तुमच्या नोंदणीकृत पत्त्यावर पाठवले जाईल.

Friday, 26 November 2021

कोरोना मृतांच्या नातेवाईकांना 50 हजारांची मदत

 ♦️कोरोना मृतांच्या नातेवाईकांना 50 हजारांची मदत मिळणार; काय आहेत नियम आणि अटी?


📌कोरोनामुळे (Coronavirus) मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना 50 हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला असून राज्य सरकारने त्या संदर्भातील जीआर काढला आहे.


कोरोना (Covid 19)  मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून पन्नास हजारांची मदत जाहीर केली आहे. या संदर्भातील जीआर आज राज्य सरकारनं जारी केला आहे. मृतांच्या नाकेवाईकांना 50 हजारांचं सानुग्रह अनुदान दिलं जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ही मदत केली जात आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं कोरोना मृतांच्या नातेवाईकांना मदत करावी असे निर्देश दिले होते. अखेर त्यानंतर राज्य सरकारनं मदत जाहीर केली आहे. 



📌कोणाला मिळणार मदत?


🔹राज्यात जी व्यक्ती कोरोनामुळे निधन पावली आहे. त्या मृत व्यक्तीच्या निकट नातेवाईकास  50,000 रुपये इतके सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती मदत निधीमधून देण्यात येणार आहे.

🔹कोरोनामुळे  व्यक्तीचा मृत्यू हा रुग्णालयात Clinical diagnosis च्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत झाला असल्यास अशा व्यक्तीचा मृत्यू कोरोनामुळे झाला  समजण्यात येईल. जरी हा मृत्यू रुग्णालयाच्या बाहेर झाला असेल अथवा त्या व्यक्तीने कोरोनाचे निदान झाल्यामुळे आत्महत्या केली असेल तरीही ही मदत देणार आहे.

🔹कोरोनाबाधित व्यक्तीचा रुग्णालयामध्ये दाखल असतांना मृत्यू रुग्णालयात झालेला असेल, जरी मृत्यू 30 दिवसाच्या नंतर झाला असेल तरी, अशा व्यक्तीचा मृत्यू देखील कोरोनाचा मृत्यू समजण्यात येईल.

🔹जी व्यक्ती कोरोनामुळे बरी झालेली नव्हती, अशा प्रकरणातील व्यक्तीचा मृत्यू रुग्णालयात किंवा घरामध्ये झालेला आहे. त्या व्यक्तीच्या मृत्यू प्रकरणी जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम, 1969 च्या कलम 10 खाली Medical Certificate of Cause of Death (MCCD) हे Form 4 व 4 A मध्ये नोंदणी प्राधिकाऱ्याला निर्गमित केले आहे अशा व्यक्तीचा मृत्यू कोरोनाचा मृत्यू समजण्यात येईल.

🔹Medical Certificate and of Cause of Death (MCCD) मध्ये “कोव्हिड- 19 मुळे मृत्यू" याप्रमाणे नोंद नसली तरीही  अटीची पूर्तता होत असल्यास, ती प्रकरणे  50,000 रुपये मदत देण्यात येईल. 

🔹नातेवाईकांना ही मदत मिळवण्यासाठी राज्य सरकारने विकसित केलेल्या वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.

🔹हा अर्ज दाखल करताना अर्जदाराने  स्वतःचा तपशील, आधार क्रमांक किंवा आधार नोंदणी क्रमांक,  अर्जदाराचा स्वत:चा बँक तपशील,  मृत पावलेल्या व्यक्तीचा तपशील, मृत पावलेल्या व्यक्तीचे जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम,  मृत्यू प्रमाणपत्र, इतर  नातेवाईकाचे नाहरकत असल्याचे स्वयं घोषणापत्र देणे आवश्यक आहे.

🔹मृत पावलेल्या व्यक्तीचा आधार तपशील किंवा आधार नोंदणी क्रमांक, उपलब्ध असल्यास व सार्वजनिक आरोग्य विभागाकडे उपलब्ध असलेल्या कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या राज्यातील डेटा उपलब्ध असलेल्या आधार क्रमांकाशी मृत व्यक्तीचा आधार क्रमांक जुळल्यास हा अर्ज संगणकीय प्रणालीवर आपोआप  स्वीकृत करण्याची कार्यवाही करण्यात येईल.

🔹जर उपलब्ध आधार क्रमांकाशी जुळला नाही तर अशा अर्जदाराकडे Medical Certificate of cause of Death (MCCD) प्रमाणपत्र उपलब्ध असल्यास ते तपासणीसाठी संबंधित जिल्हा शल्य चिकीत्सक मुख्य आरोग्य अधिकारी निश्चित करतील अशा वैद्यकीय अधिकाऱ्याकडे संगणकीय प्रणालीवर पाठविण्यात येईल. हे वैद्यकीय अधिकारी हे प्रमाणपत्र तपासून त्यात कोव्हिड-19  हे मृत्यूचे कारण त्यात नमूद असल्यास त्यास संगणकीय प्रणालीवर सहाय्य मिळणेबाबतचा हा अर्ज स्वीकृत करतील.

🔹मृत व्यक्तीच्या RT-PCR/ Molecular Tests/RAT Positive अहवाल अथवा रुग्णालयात दाखल असताना करण्यात आलेल्या आरोग्य चाचण्यांच्या अहवाल तसेच इतर कोणतीही कागदपत्रे जी अर्जदाराच्या मते हा मृत्यू  कोरोनामुळे असल्याचा सिध्द करत असेल ती अर्जदार संगणकीय प्रणालीवर upload करतील. अर्जदाराने उपलब्ध करुन दिलेली कागदपत्रे संबंधित जिल्हा शल्य चिकीत्सक मार्फत / म.न.पा. क्षेत्रातील मुख्य आरोग्य अधिकारी यांचे कडील संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याकडे संगणकीय प्रणालीवर पाठविण्यात येतील. वैद्यकीय अधिकाऱ्याने ही प्रमाणपत्रे तपासुन हा मृत्यू कोरोनामुळे असल्याचे मान्य केल्यानंतर अर्जदाराचा अर्ज  स्वीकारण्यात येणार आहे.





 







Thursday, 18 November 2021

आधार कार्डमध्ये किती वेळा बदल करता येतो ? .

 💁‍♂️ आधार कार्डमध्ये किती वेळा करता येईल बदल ? - जाणून घ्या महत्वाचे अपडेट.


✒️  जर आपल्याला आधार कार्डमधील नाव, पत्ता, लिंग किंवा जन्म तारीख बदलायची असेल - तर त्यात किती वेळा बदल करता येणार ते आपण या मॅसेज मध्ये सविस्तर समजून घेऊया....


🤷‍♂️  किती वेळा करता येईल बदल ?


● नाव - 

नावात केवळ दोन वेळा करेक्शन करता येणार 


● जन्म तारीख- 

मध्ये एकदाच करता येणार करेक्शन 


● पता- 

पत्ता बदलायचा असल्यास त्यासाठी कोणतीही मर्यादा नाही


● लिंग - 

केवळ एकदाच बदल करता येणार 


● मोबाइल नंबर - 

मोबाईल क्रमांक अपडेट करण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही


● फोटो - 

जर आपला फोटो क्लियर नसेल किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे फोटो बदलायचा असेल तर फोटो कितीही वेळा बदलता येणार - असे UIDAI ने सांगितले 


😇  आधार कार्डमध्ये किती वेळा बदल करता येणार -हि माहिती सर्व नागरिकांसाठी, नक्कीच खूप महत्वाची आहे - आपण थोडासा वेळ  काढून - इतरांना देखील अवश्य शेअर करा.

Monday, 15 November 2021

सुशिक्षित युवकांसाठी मार्गदर्शन


सुशिक्षित युवकांसाठी मार्गदर्शन


१ 】चहा काॅफी करुन विकणे. पाचपट नफा. 

२】 कुल्फी विकणे. घरीच केली तर तिप्पट नफा. 

३ 】मासे विकणे. दिडपट नफा.

४ 】आंबे होलसेल आणून रिटेल विकणे. 

५ 】तरकारी अर्थात पहाटे होलसेल भाजी खरेदी करून रिटेल विकणे दिडपट होतात

६ 】पाणीपुरी रगडा पुरी विकणे यात पैसे तिप्पट होतात 

७】 कच्छी दाबेली. हातगाडी भाड्याने घ्या व चौपट नफा मिळवा. दाबेलीचे वेगळे पाव मिळतात. 

८ 】वडापावची गाडी लावा. स्वस्त विकलेत तरी दिडपट नफा.

९ 】मूग भजी ची विक्री करा. घराबाहेरच स्टाॅल लावा. नंबर वन धंदा होतो. तिप्पट नफा. 

१०】 ढोकळा विक्री. घरी ढोकळा बनवा. चटणी बनवा. मोठ्या स्टीलच्या डब्यात भरुन घराबाहेर किंवा मोक्याच्या ठिकाणी विका. 

११ 】चाळीस रुपये किलोच्या डोश्याच्या पीठाचे वीस डोसा तयार होतात. एक डोसा वीस रुपयांना विका. सोबत भाजक्या डाळीची चटणी व बटाटा भाजी द्या. याच पीठाचे वडेसुध्दा विकता येतात. 

१२】 घरीच पोळी भाजी बनवुन कस्टमरला ऑफिस पोच डबा पोहोचवा. 

१३】 फळ विक्री करा. 

१४ 】शहाळे आणून विका. रोज तेच ते ग्राहक मिळेल. बावीस रुपयांचे चाळीस रुपये होतात. 

१५ 】कापडाचे तुकडे पोत्याने विकत मिळतात. घरी शिलाई मशीन असेल व कोणाले शिलाई करता येत असेल तर झबले टोपडे व दुपटे करून विका. टाकाऊतुन टिकाऊ बनवा. 

१६】 फ्लेक्स बोर्ड तयार करुन, आणून, चिटकवून, लावून द्या. दोनशे ते पाचशे रुपये प्रती मिळतात. 

१७ 】सातारा येथे राजवाड्याजवळ सुट्ट्या उदबत्त्या वजनावर विकतात तशा आपल्या स्वतःच्या गावातही विकता येईल. 

१८】मुंबई येथे होलसेल मार्केट मध्ये कपड्यांचा लाॅट विकत आणून घरी सुध्दा बिझिनेस सुरु करु शकता. दादर रेल्वे स्टेशन शेजारीच होलसेल मार्केट आहे. 

१९】 मंदिराजवळ नारळ विक्री करा

२० फुलांच्या मार्केटमधुन फुलं आणा व त्याचे हार करुन विका. यात खुप फायदा आहे. 

२१】 हाॅटेलला कडधान्ये पुरवणे. 

२२】 हाॅटेलला बटाटे खुप लागतात. सप्लाय करा. 

२३ 】घरी चटणीचे चार पाच प्रकार तयार करुन थेट फूड मार्ट ला विका किंवा स्वतः रिटेल करा. 

२४】 लेदर शिलाईची जुनी मशीन घ्या व सिटकव्हर तयार करुन विका. चांगले मार्जिन मिळते. 

२५】 मार्केटला लसणाच्या पाकळ्या होलसेलमध्ये मिळतात. घरी आणून गरम पाण्यात मीठ टाकून लसणाच्या पाकळ्या टाकल्या की लगेच हाताने चोळुनही साले निघतात. हाॅटेल, भाजीवाले यांना छोटी मोठी पाकिटे करुन विका. 

२६】 एलईडी बल्ब स्टाॅल लावून विका. आपल्या ग्रुपवर त्याचे होलसेलर आहेत

२७】 ज्यांना योगासने येतात त्यांनी त्याचे क्लास सुरु करावेत. 

२८】 महिलांसाठी घरगुती बिझिनेस, पाळणाघर सर्वात बेस्ट बिझिनेस करु शकता. भांडवल लागतेच. खेळणी, दूध, इ. ठेवावे लागते 

२९】 प्लॅस्टीक बंदी होणार असल्यामुळे कागदी व कापडी पिशव्यांची मागणी वाढत आहे. घरी तयार करा. दुकानदारांना थेट विका. खुप स्कोप आहे. 

३०】 पेस्टकंट्रोल कसे करतात शिकून घ्या. हा धंदा उन्हाळ्यात खुप चालतो. रुमनुसार रेट असतात. 

३१】 प्लंबिंग काम शिकून घ्या. दररोज हजार रुपये 'सहज कमवा'.

३२】 विको दंतमंजनच्या मागे लिहिलेले साहित्य काष्टौषधीच्या दुकानातुन आणून त्याचे घरी दंतमंजन तयार करा. खुप परवडते. 

३३】 काही औषधी जंगलात जाऊन गोळा करुन आणून आयुर्वेद डाॅक्टरांना विका. 

३४】 गोमुत्र गोळा करुन बाटलीत पॅक करुन विका. 

३५】 खेडेगावात असाल तर दुध गोळा करुन शहरात जाऊन विका. देशी गायीचे दूध शहरात सत्तर रुपये ते दोनशे रुपये प्रतिलीटर विकले जाते. 

३६】 गावाकडे उन्हाळ्यात कडबा कुट्टी खुप चालते. ज्याच्याकडे यंत्र आहे त्याच्याकडे जाऊन पोती भरुन घरपोच करता येतील. 

३७】 फाईल तयार करायचा पुष्ठा मिळतो. पट्ट्याही मिळतात. फक्त कटिंग मशीनने कटींग करुन ऑफिसला सप्लाय करु शकता. प्रिंटिंग करुन पाहिजे असल्यास प्रेसमधून करुन घेऊ शकता. 

३८】 स्टेपलर, त्याच्या पिना, पंच मशीन ऑफिसला सप्लाय करुन वीस ते पंचवीस टक्के फायदा मिळतोच. फक्त तुम्हाला बरेच ऑफिस शोधावे लागतील. 

३९】 आता लगीनसराई सुरु झाली आहे. नवरदेवाचे फेटे विका. ज्यांचे टेलरींगचे दुकान आहे त्यांना हा जोडधंदा म्हणून चांगला आहे 

४०】 भगव्या फेट्यांची फॅशन जोरात चालू आहे. फेटा बांधायला शिका. चार महीने भरपूर कमवा. सोबत भगव्या फेट्याचे कापडही भाड्याने द्या. 

४१】 उन्हाळ्यात चिंच फोडून चिंच वेगळी करुन विकू शकता.  शिरे व टरफले यांची पुड बनवुन त्यात मीठ मिसळुन तांबे पितळेची भांडी घासायला पावडर तयार करु शकता. चिंचोक्याचे भट्टीतुन लाह्याही बनवतात.

४२】 उन्हाळ्यात होलसेल दही आणून त्याचे घुसळुन लोणी व ताक काढले जाते. मसाला ताक करुन विकणे हा खुप फायदेशीर बिझिनेस आहे. फक्त त्यात बर्फ टाकू नये. त्याऐवजी माठात साठवून ठेवता येते. तसे विका

४३】देवदेवतांचे साचे विकत मिळतात. त्यात POP टाकून मुर्ती बनवता येतील व रंगवून विकता येतील परंतु याला प्रशिक्षणाची व कौशल्याची खुप गरज आहे. कलेतुन पैसे जास्त मिळतात. 

४४】रद्दी खरेदी करणे गठ्ठे बांधून होलसेल विकणे हा सर्वात कमी भांडवलाचा सुंदर व्यवसाय आहे. अनुभवातुन हा व्यवसाय मोठा करता येईल

४५】जिमचा अनुभव असेल तर शहरामध्ये जाम कोच म्हणून सेलिब्रेटीजना गाईडंस करुन भरपूर फी मिळते. 

४६】शेवचिवडा होलसेल आणायचा. चुरमुरे पोत्याने आणायचे. चुरमुरे चाळण मारुन साफ करून घ्यायचे. चिंचपाणी घरीच तयार करुन ओली व सुकी भेळ विकता येईल. अगदी हातगाडीसुध्दा चालेल. नाट्यगृह, समुद्र बीच, गजबजलेल्या रस्त्यावर किंवा बागेबाहेर अशी छोटी दुकाने थाटली जातात. 

४७】धोबी अर्थात लाँड्रीवाले कामगार ठेवतात. धुवायचे कपडे, ड्रायक्लिन कपडे बाहेरच्या माणसाकडुन घेतले जाते. हल्ली हा बिझिनेस कोणीही करत आहे. शहरात जाऊन टाकला तर मी खात्रीने सांगतो तुम्ही हा बिझिनेसमध्ये यशच मिळवणार. कारण शहरात महिला नोकरीचे प्रमाण खुप आहे. 

४८】रेडियम चा बिझनेसही खुप चांगला आहे पण मशीनरी आवश्यक आहे. सध्या सर्वात जास्त चालणारा बिझिनेस आहे. नंबर प्लेट ते गाडीचे डेकोरेशन सर्वात रेडियम वापरतात. रोल होलसेल मिळतात. अगदी घरीही ब्लेडने कटिंग करुन विकता येते. 

४९】रिचार्ज चा बिझनेसही खुप चांगला आहे. एक हजारपासून सुरु करता येतो. विशिष्ठ टारगेट पुर्ण केले तर स्कीमनुसार अनेक जादाचे फायदेही मिळतात. 

५०】 सर्वात सुंदर व लेटेस्ट बिझिनेस म्हणजे मोबाईल अॅक्सेसरीज विकणे....


मित्रानो,स्वावलंबी व्हा, जिद्दीने जगा,श्रीमंत व्हा,रुबाबात रहा,गरजू-गरिबांना मदत करा,तुम्ही पण श्रीमंत होऊ शकता हे कायम ध्यानात ठेवा.

व्यवसाय हीच यशाची गुरुकिल्ली आहे.


*****

सायंदैनिक राजरंग टाइम्स

दैनिक लोकमैत्री

साप्ताहिक सखी मंच


*****

Wednesday, 6 October 2021

ग्रामपंचायत जमा निधी आणि खर्च.

 *राज्यातील सर्व गावंकरी मंडळीसाठी खुशखबर आता ग्रामपंचायत जमा निधी आणि खर्च निधी बघता येणार ऑनलाईन*

आत्ताच ॲप डाऊनलोड करा

लिंक- https://play.google.com/store/apps/details?id=nic.in.unified


केंद्र सरकारने आपल्या देशातील ग्रामपंचायतीचा विकास करण्यासाठी खूप मोठा निधी आपल्या गावात पाठवलेला असतो, पण आलेला निधी व खर्च झालेला निधी गावातील गावकऱ्यांना, ग्रामपंचायत सदस्य यांना माहित होत नाही, त्यामुळे सरकारने आता आपल्या गावात वर्षभरात कोणती विकास कामे होणार आहेत , कोणत्या कामावर किती निधी खर्च होणार आहे, गावात सध्या कोणती कामे चालू आहेत, कोणती कामे झाली आहेत त्या कामासाठी किती खर्च केला आहे ही सर्व माहिती गावकऱ्यांना तसेच ग्रामपंचायतीच्या सदस्यांना माहिती व्हावी या सुविधेसाठी केंद्र सरकारने *e-GramSwaraj* हे ॲप्लिकेशन बनवले आहे.

हे ॲप्लिकेशन Google Play Store वरून डाऊनलोड केल्यावर काही परमिशन द्यावे लागतात, त्यानंतर ऑप्शन मध्ये राज्य निवडा , जिल्हा निवडा, तालुका निवडा, त्यानंतर आपली ग्रामपंचायत चे नाव निवडा त्यानंतर तीन बॉक्स ओपन होतील 1.ER Details, 2. Approved activities 3. Financial progress 

*आता आपण या ऑप्शन बद्दल सविस्तर माहिती घेऊ*

*🔴1. ER details-* मध्ये सध्या आपल्याला काहीच माहिती दिसणार नाही.

*🔴2. Approved activities-* या ऑप्शन मध्ये Total works मध्ये Deatails वर क्लिक केल्यावर गावात ग्रामपंचायत वर्षभरात कोणते विविध विकासकामे कोणत्या विभागावर करणार आहे त्यासाठी किती निधी मंजूर होऊन ग्रामपंचायत च्या खात्यात जमा झाला आहे याची माहिती मिळते. म्हणजे हा आपल्या गावाचा विकास कामाचा आराखडा असतो.

 *Ongoing work* - सुरू असलेली विकासकामे

*Completed work* - पूर्ण झालेली विकासकामे


¶ मुख्य मेनुतील तिसरे ऑप्शन

*🔴3. Financial progress-* हे खूप महत्त्वाचे ऑप्शन आहे,

*¶ Scheme name* -योजनेची किंवा ग्रामपंचायत खात्याची नाव.

*¶ Receipt amount-* खात्यात जमा असलेली रक्कम.

*¶ Expenditure amount-* विकास कामावर खर्च झालेली रक्कम.


सध्या महत्वाचे चालू असलेले खात्याबद्दल माहिती पाहू👉🏻

*🔘Financial progress* या मेनू मध्ये आपल्याला 

*1️⃣15 वा वित्त आयोग( xv finance commission )-* यामध्ये केंद्र व राज्य सरकारकडून गावामध्ये विविध विभागाची विविध विकास कामे करण्यासाठी अनुदान निधी खुप मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत च्यां खात्यात जमा होत असतो.

 *Receipt amount* च्या रकमेवर क्लिक केल्यावर जमा रक्कमेबद्दल बद्दल माहिती मिळते.

*Expenditure amount* च्या समोर दिसणाऱ्या रकमेवर क्लिक केल्यानंतर नंतर एक बॉक्स ओपन झाल्यावर *Deatails* वर क्लिक करा त्यानंतर *Vouchar amount*  म्हणजे उचललेली रक्कम , *Particulars* म्हणजे ती रक्कम कोणत्या कामासाठी  वापरली आहे . किती तारखेला खर्च केलेली आहे अशी विविध प्रकारची माहिती दिसते.


*2️⃣ग्रामनिधी (own resource)-* यामध्ये गावांमधील पाणीपट्टी घरपट्टी व विविध प्रकारचे टॅक्स जमा केले जातात, व त्यामधून गावांतील विविध विकास कामे करावी लागतात, यामध्ये सुद्धा वरील पंधराव्या वित्त आयोग प्रमाणेच माहिती असते.


*3️⃣नरेगा ग्रामीण रोजगार हमी* अशा विविध खात्याची माहिती financial progress या ऑप्शन मध्ये मिळते.


या ॲप्स चा फायदा गावकऱ्यांना गावात विविध विकास कामे ग्रामपंचायत कडून दर्जेदार करून घेण्यासाठी होणार आहे. गावकऱ्यांनी ॲप्स आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून वेळोवेळी माहिती तपासने ही काळाची गरज आहे.

 निधी योग्य ठिकाणी, योग्य प्रकारे खर्च न झाल्यास गावकऱ्यांना त्याबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार करुन वेळेवर योग्य ठिकाणी व योग्य प्रकारे विकास कामे करून घेण्यासाठी या ॲप ची मदत होणार आहे.

आता गावकऱ्यांनीच ठरवायचे आहे जागरूक राहून गावाचा विकास करून घ्यायचा आहे की गावाच्या विकासासाठी आलेला निधी कोणा दुसऱ्याच्या घशात जाऊ द्यायचा आहे.



👍गावकऱ्यांना आता जागरूक करा...


 धन्यवाद....!!!🙏🏻

Saturday, 19 June 2021

दाखला नसतांना शाळा प्रवेश

 सरकारचा मोठा निर्णय ! आता शाळा सोडल्याचा दाखला नसतानाही मिळणार दुसऱ्या शाळेत प्रवेश

------------------------------------------ 

मुंबई – शाळेतील विद्यार्थ्यांना आता दुसऱ्या शाळेत प्रवेश घ्यायचा असल्यास आता शाळा सोडल्याचा दाखला (एलसी) किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट (टीसी) नसेल तरी प्रवेश मिळणार आहे. तसेच शाळा सोडल्याचा दाखला नसल्यास विद्यार्थ्यांच्या जन्म प्रमाणपत्रवर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा, असा महत्वाचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.


शासन निर्णयात म्हटले आहे की, प्रत्येक मुलाला शिकण्याचा तसेच एका शाळेतून दुसऱ्या शाळेत प्रवेश घेण्याचा अधिकार आहे. सध्याच्या करोना काळात असामान्य परिस्थितीत आर्थिक कारणांमुळे शालेय शुल्क भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला (T.C/L.C) काही शाळा नाकारत असल्याचे कळत आहे.


यामुळे शाळा सोडल्याचा दाखला नसल्याने विद्यार्थ्यांना इतर शासकीय व अनुदानित शाळांत प्रवेश नाकारला जात असल्याचे कळते. केवळ शाळा सोडल्याचा दाखल नसल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणे अन्यायकारक तसेच आटीई कायद्याची पायमल्ली करणारे आहे. त्यामुळे सरकारने अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.ज्या विद्यार्थ्यांना त्यांचा T.C/L.C उशिरा दिला जात असेल किंवा नाकारला असेल अशा विद्यार्थ्यांना तात्पुरता प्रवेश देऊन तरतुदीनुसार पुढील कार्यवाही करावी. शिक्षण अधिकार कायद्यांतर्गत आठवीपर्यंत अशी तरतूद आहे. हा नियम आता नववी-दहावीच्या प्रवेशासाठी सुद्धा लागू केला आहे, असेही या निर्णयात म्हटले आहे.


विद्यार्थ्यांना TC/LC अभावी प्रवेश नाकारू नये. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, याची मुख्याध्यापकांनी दक्षता घ्यावी. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिल्यास संबंधित मुख्याध्यापक/शाळाप्रमुख यांच्याविरुद्ध नियमातील व कायद्यातील तरतुदीनुसार योग्य ती कारवाई केली जाईल.पूर्वीच्या शाळेकडून LC/TC प्राप्त न झाल्यास प्रवेशित होणाऱ्या शाळेत विद्यार्थ्यांना वयानुरूप वर्गात प्रवेश द्यावा. यासाठी विद्यार्थ्यांचे जन्माचे प्रमाणपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरावे, असे या निर्णयात म्हटले आहे.

Saturday, 5 June 2021

5G-जुही व न्यायालय

 5G-जुही व न्यायालय 


5G तंत्रज्ञानाला विरोध करणारी जुही चावला हिची याचिका फेटाळतांना दिल्ली उच्च न्यायालयाने जे ताशेरे ओढले ते अत्यंत चुकीचे आहेत. याचिका फेटाळणे सुद्धा अविचारीपणा.अर्थात वाईट पद्धतीने व घाईने इतक्या महत्वाच्या विषयावरील याचिका ड्राफ्टिंग करणे चुकीचे आहे. पण अश्यावेळी न्यायाधीशांनी विषयाला महत्व देऊन त्याला महत्व देणे, दखल घेणे शक्य आहे. याचिका पुढील तारखेच्या आता नीट लिहून दाखल करा असेही सांगता येते. 


एक तर जुही चावलाने मुळीच प्रसिद्धीसाठी ही याचिका केलेली नाही. ती मागील 5 वर्षांपासून या विषयावर बोलते आहे हे मला नक्की माहिती आहे. मुंबईचे प्रकाश मुन्शी यांनी माझा जुही चावलाशी संपर्क करून दिला. त्यावेळी जुही चावला, प्रकाश मुन्शी व इतर अनेक जण मुंबईत कुठेही मोबाईल टॉवर उभारण्याबद्दल व त्यातील मोबाईल  रेडिएशन च्या दुष्परिणामांबद्दल बोलले होते. घाईघाईने त्यांनी एक याचिका मुंबई उच्च न्यायालयात केली व ती फेटाळण्यात आली होती. 


जुही चावला ला प्रसिद्धीची गरज आहे, तिची याचिका त्रासदायक व अनावश्यक आहे, त्यामुळे कोर्टाचा वेळ वाया गेला आहे ही कारणे न्यायालयाने लोकांप्रती व पर्यावरणाप्रती आपली जबाबदारी झटकण्यासाठी वापरलेली आहेत असे माझे मत आहे. मुळात 5G मागे असलेले प्रचंड आर्थिक फायद्याचे गणित व राजकारण समजून घेण्याची गरज आहे. 


Ericson, नोकिया, Qualcomm अशा महाकाय जागतिक कंपन्या 5G साठी आग्रही आहेत. भारतात 5G चे मोठे नेटवर्क तयार असलेल्या,आर्थिकदृष्ट्या ताकदवान व प्रचंड राजकीय बॅकिंग असलेल्या रिलायन्स, जिओ, भारती एअरटेल, Vi व्होडाफोन-आयडिया यांना डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉम ने 5G ट्रायल करायला मागच्याच आठवड्यात परवानगी दिली आहे. 5G स्पेक्ट्रम मधून $30 बिलियन म्हणजे कदाचित 21 खरब (अब्ज नंतर येणारा आकडा) रुपयांच्या सोन्याच्या खाणीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे, आयटी सेक्टरचे लक्ष याकडे नवीन काम देणारी योजना म्हणून आहे आणि अश्यावेळी यांच्यासमोर एक जुही चावला कोण आहे?


मोबाईल टॉवर विकिरणांमुळे (रेडिएशनमुळे) मानवी आरोग्य आणि पर्यावरण यांना धोका आहे याची जाणीव झाल्याने अमेरिकेसह 8 देशांनी 5G स्पेक्ट्रम नेटवर्कला स्थगिती दिली आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर Huawei या चायनीज कंपानीची 5G मधील मक्तेदारी व  चीनचा या तंत्रज्ञान क्षेत्रातील वाढता दबदबा याची सुद्धा एक किनार या विषयाला आहे. आता सांगा या पार्श्वभूमीवर 'जुही चावला किस झाड की पत्ती आहे' व म्हणतात तिला प्रसिद्धी पाहिजे आहे? 


मला हे सांगायला पाहिजे की बेकायदेशीर मोबाईल टॉवर आणि रेडिएशन परिणाम याबाबतची आमची एक याचिका मुंबई उच्च न्यायालयात मागील 4 वर्षांपासून पेंडींग आहे. पिंपरीचे डॉ सुरेश बेरी यांच्या मार्फत केलेल्या याचिकेत मी वकील असल्याने मला माहिती आहे की ही केस सुनावणीसाठीच येऊ नये यासाठी कसे व कोणते प्रयत्न होत आहेत, किती दबाव येत आहेत. जुही चावला ने मांडलेला विषय बरोबर आहे पण तिने न्यायालयातील सुनावणीची लिंक जाहीर करून चूक केली इतकेच. तिची याचिका जनहिताचा व्यापक प्रश्न मांडणारी आहे. 20 लाखांचा दंड तिच्यावर थोपणे अतार्किक व अन्याय्य आहे. 5G ने मानवी आरोग्याची व पर्यावरणाची हानी होणार नाही हे कंपन्यांनी पटवून द्यावे आणि मग काम सुरू करावे माझा तंत्रज्ञानाला विरोध नाही यात जुही चावलाने काय चुकीचे म्हटले होते??  


पुण्यातील जेष्ठ अभ्यासक सुरेश कर्वे यांनी हे वाढत जाणारे 2G, 3G, 4G मागचे राजकारण व शास्त्रीय माहिती असलेले एक पुस्तक लिहिले आहे तर अभ्यासक मिलिंद बेंबळकर 5G स्पेक्ट्रम व मोबाईल रेडिएशन आणि परदेशात वॉशिंग्टन, इंग्लंड येथील कोर्टात याबाबत सुरू असलेल्या केसेस व त्या देशांनी 5G ला दिलेली स्थगिती याबाबत पुस्तक लिहून जवळपास पूर्ण केले आहे. मी उच्च न्यायालयातील केस दाखल करतांना या सगळ्या लोकांचे मार्गदर्शन मिळाले. 


दरम्यान रोबोट 2.0 नावाचा मोबाईल रेडिएशन विषयावरील रजनीकांत व अक्षयकुमार चा एक सिनेमा येऊन गेला. पशु, पक्षी व निसर्गावर मोबाईल रेडिएशन चा परिणाम दाखविण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. 


जापान, इंग्लंड, स्वीझर्लंड, ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये, ब्रुसेल्स व कॅलिफोर्निया मध्ये 5G स्पेक्ट्रम थांबविण्यात आले व स्थगिती देऊन ते मोबाइल रेडिएशन चा विचार करीत आहेत. आपल्या भारतात ज्या विषयांवर चर्चा सुरू असतात त्यावरून आपण मागासलेले का आहोत याचे उत्तर मिळते? 

@असीम सरोदे

#juhichawla  We support you. We wish to collect 1 Rs each to help in collecting the fine amount. We wish to have any account number to deposit it.....

Thursday, 25 March 2021

फेक फेसबुक प्रोफाईल

 सध्या बऱ्याच व्यक्तींचे फेसबूक अकाउंट प्रोफाईल फेक बनवून यादीतील मित्रांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यांच्याकडून पैसे मागण्याचे प्रमाण वाढत आहे. ज्यांची कोणाची फेसबुक प्रोफाईल फेक बनवली जाईल त्यांच्यासाठी........


१) प्रथमतः ज्यांची फेसबुक प्रोफाईल फेक बनवली आहे त्यांनी आपल्या स्वतःच्या फेसबुक अकाउंटवरून बनवलेली  फेक प्रोफाईल शोधा. स्वतःला शोधता येत नसेल तर ज्या मित्रांना त्या प्रोफाईलवरून रिक्वेस्ट गेली आहे, त्यांच्याकडून सदर फेक प्रोफाइलची फेसबूक लिंक मागवून घ्या.


२) त्या प्रोफाइलवर गेल्यानंतर प्रोफाईल वर उजव्या बाजूला तीन डॉट दिसतील, त्या डॉट वर क्लिक करा.


३) तुमच्यासमोर Find Support Or Report Profile हा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा.


४) Pretending To Be Someone हा पहिला ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा. 


पुढे तुम्हाला 3 ऑप्शन दिसतील.

Me, A Friend आणि Celebrity.


५) आपण आपलीच बनवलेली फेक प्रोफाईल रिपोर्ट् करत असल्याने त्यापैकी Me हा ऑप्शन सिलेक्ट करा. आणि नेक्स्ट करा. फेक प्रोफाईल अकाउंट काही वेळाने बंद होईल.


.........................................................


इतरांनी सदरची प्रोफाईल फेक रिपोर्ट करताना, आपल्याला आलेल्या फेक फ्रेंड रिक्वेस्ट वरील अकाउंटवर जावून सेम वरीलप्रमाणेच इंस्ट्रक्शन्स फॉलो करुन तिथे फक्त Me ऐवजी A Friend सिलेक्ट करा.


नेक्स्ट केल्यानंतर नाव टाईप करण्यासाठी तुमच्यापुढे एक बॉक्स येईल. त्या बॉक्स मधे तुमच्या ज्या मित्राची फेक फेसबुक प्रोफाईल बनवली आहे, त्याच नाव तिथे टाईप करा. तिथे तुमच्या मित्राची ओरिजिनल फेसबूक प्रोफाईल येईल, तिला सिलेक्ट करा. रिपोर्ट सेंड करा, फेक प्रोफाईल काही वेळाने बंद होईल....


                     माहितीस्तव सादर.......

व्हाट्स अँप साभार...

Monday, 11 January 2021

राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टल

 सायंदैनिक राजरंग टाइम्स, धुळे

सोमवार दि . ११ जानेवारी २०२१ 

खालील नावावर क्लिक करा.

राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टल  👍

ग्रामपंचायत निवडणूक : तुमच्या गावातील मतदार यादी , उमेदवार आणि त्यांचं निवडणूक प्रतिज्ञापत्र कसं पाहायचं ?

https://marathesanjay.blogspot.com/p/blog-page_31.html


 जाणून घेऊया तुमच्या  विकास होण्यासाठी चांगले उमेदवार निवडून आणि मग केंचा टाकायचा आहे म्हणजे काय तर समोरच्या निवडायचं आहे . त्यानंतर Election Programe येणं गरजेचं आहे . त्यासाठी तुमच्या गावातल्या आणि तुमच्या रकान्यात दिसणारे आकडे आणि अक्षर जशीच्या तशी तुम्हाला Name या पर्यायासमोर आपल्याला Gram वॉतिल्या उमेदवाराची सगळी माहिती तुम्ही तुमच्या मोबाईलवर इथं टाकायची आहे . Panchayat General Election -2020 % ; पाहू शकता . त्यानंतर Open PDF यावर क्लिक केले की Date : 15-01-2021 हा पर्याय निवडायचा आहे . महाराष्ट्रात १४ हजार २३४ इतक्या गावामध्ये १५ तुमच्यासमोर तुमच्या गावाची मतदार यादी ओपन होते . सगळ्यात शेवटी तुम्हाला तुमचा वॉर्ड निवडायचा आहे जानेवारीला मतदान होईल , तर १८ जानेवारीला निकाल मतदार यादी -२०२१ असं या यादीचं शीर्षक असतं . इथं आता समजा मी वॉर्ड क्रमांक १ निवडला , तर त्याखाली लागेल . सुरुवातीला तुमचं गाव ज्या विधानसभा आणि लोकसभा असलेल्या सर्च या पर्यायावर क्लिक करायचं आहे . पण , मतदान करायचं म्हटलं तर गावातील मतदार यादीत मतदारसंघात येतं त्या मतदारसंघाचं नाव , क्रमांक आणि त्यानंतर वॉर्ड क्रमांक १ मधून निवडणूक लढवणाऱ्या अंतिम आपलं नाव आहे की नाही , तसंच आपल्या वॉर्डातील उमेदवार आरक्षणाची स्थिती दिलेली असते . उमेदवारांची यादी All Final Contesting Can आणि त्याची माहिती जसं की नाव , शिक्षण , गुन्हे . संपत्ती याची पुढे मतदान केंद्राच्या तपशीलात मतदान केंद्राचं नाव , didate List या पर्यायासमोर तुम्हाला दिसेल . माहिती असणं आवश्यक असतं . क्रमांक आणि पत्ता दिलेला असतो आणि त्यानंतर मतदारांची इथं उमेदवाराचा नोंदणी क्रमांक , पूर्ण नाव , वॉर्डाचा नंबर , हीच माहिती घरबसल्या कशी पाहायची , हे आपण आता संख्या ( महिला , पुरुष , तृतीयपंथी ) दिलेली असते , वोडांचं नाव आणि डाऊनलोड हा पर्याय दिलेला असेल , त्यानंतर गावातील मतदारांच्या नावाची यादी दिलेली असेत . आता ज्या उमेदवाराचं प्रतिज्ञापत्र तुम्हाला पाहायचं आहे मतदार यादी कशी पाहायची ? यात मतदाराचं नाव , पती किंवा वडिलांचे नाव , घर क्रमांक , त्या उमेदवाराच्या नावासमोरील View Affidavit या मतदार यादी पाहण्यासाठी सगळ्यांत आधी तुम्हाला वय , लिंग ही माहिती दिलेली असते . अशा पद्धतीनं तुम्ही या पायावर क्लिक करायचं आहे . ceo.maharashtra.gov.in हा पत्ता टाईप करावा यादीत तुमचं नाव शोधू शकता . त्यानंतर तुमच्यासमोर उमेदवारानं उमेदवारी अर्जासोबत लागेल . त्यानंतर तुमच्यासमोर मुख्य निवडणूक अधिकारी ही उमेदवारांची कुंडली - आता बॉर्डनिहाय उमेदवार आणि सादर केलेले प्रतिज्ञापत्र ओपन होईल . वैबसाईट ओपन होईल . त्यांचं प्रतिज्ञापत्र पाहण्यासाठी तुम्हाला या प्रतिज्ञापत्रात उमेदवाराची गुगारी पार्श्वभूमी , व्यवसायाचा ग्रामपंचायत निवडणूक कशी होते ? यंदा होणार हे बदल .... panchayatelection.maharashtra.gov.in तपशील , मालमत्तेचा तपशील याची सविस्तर माहिती दिलेली मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा असं टाईप करावं लागेल . त्यानंतर तुमच्यासमोर राज्य निवडणूक असते करायचा ? तुमच्या गावासाठी सरकारनं दिलेला निधी आयोगाची वेबसाईट ओपन होईल . इथं तुम्हाला Affi- सगळ्यात शेवटी प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीचा सारांश ग्रामपंचायतीनं कुठे खर्च केला , हे कसं पाहायचं ? davit by the final contesting candi- असतो . जसं की क्य , शिक्षण , व्यवसाय , अपत्यांची संख्या , या वेबसाईटवरील उजवीकडच्या Go to New dates या पर्यायावर क्लिक करायचं आहे . यानंतर नावावर गुन्हे आहे का , कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न , स्थावर , जंगम Website या पर्यायावर क्लिक केलं की एक नवीन पेज Search Document नावानं एक नवीन पेज आणि एकूण मालमत्ता , तसंच काही कर्ज असल्यास तेसुद्धा ओपन होईल . या फेजवरील निवडणूक यादी ( विभागनिहाय ) तुमच्यासमोर ओपन होईल . इथं तुम्हाला Local Body नमूद केलेलं असतं . पीडीएफ या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे मधील पर्यायांपैकी ग्रामपंचायत हा पर्याय निवडायचा आहे . अशापद्धतीनं तुम्ही तुमच्या वॉर्डमधील उमेदवारांची नावे त्यानंतर यादी पाहण्यासाठी तुम्हाला तुमचा जिल्हा . त्यानंतर मध्ये तुमचं गाव ज्या विभागात येतं तो विभाग आणि त्यांच्याविषयीचा तपशील इथं पाहू शकता . विधानसभा मतदारसंघ आणि गावाचं नाव निवडायचं आहे निवडायचा आहे . त्यानंतर जिल्हा , तालुका आणि गावाचं नाव ( स्त्रोत - बी.बी.सी )

Friday, 8 January 2021

RTO Driving लायसन्स

 RTO Driving लायसन्स काढणे झाले खूप सोपे.....


कोणत्याही agent शिवाय अगदी 31 रुपयात तुम्ही ऑनलाइन Registration करून Lincence मिळवू शकता !!!


१) sarathi.nic.in वर जाऊन ऑनलाइन अँप्लिकेशन करा.

२) फॉर्म भरून झाल्यावर सबमिट करा.

३) त्याच वेबसाइटवर स्लॉट बुकिंग करून अपॉयमेन्ट घ्या.

४) अपॉइमेन्ट च्या दिवशी फॉर्म व कागदपत्रांसह RTO ऑफिस ला जा.

५) डॉक्युमेंट वेरिफिकेशन करा.

६) ३० रु. चलन भरा.

७) बायोमेट्रिक Registration करा.

८) परीक्षा द्या. 

परीक्षेच्या तयारीसाठी RTO Exam in Marathi हे Mobile App डाउनलोड करा.

९) पास झाला तर लगेच ५ मिनिटात Learning Lincece मिळते.

आपण इंटरनेटचा उपयोग फक्त Whatsapp & Facebook साठी न करता अशा गोष्टींसाठी जर केला तर निश्चितच फायदा होईल.

Agent ला २ते ३ हजार रुपये घालवण्यापेक्षा सोप्या माध्यमातून Driving Lincece नसणार्यांनी Apply करायला काहीच हरकत नाही.

Same Process पक्क्या Driving Lincence साठी Fees Rs.321/- आहे !!!!


बहुजनांच्या प्रज्ञेचा सूर्य: कर्मवीर

 ▪️बहुजनांच्या प्रज्ञेचा सूर्य: कर्मवीर                      महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात आणि समाजसुधारणेच्या प्रदीर्घ इतिहासात कर्मवीर ...