Udiseplus मध्ये विद्यार्थ्यांची माहिती भरण्याकरता सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. खाली दिलेल्या लिंक वरती आपण आपल्या शाळेची (विद्यार्थ्यांची) माहिती भरू शकता.
U Dise ला विद्यार्थी माहिती भरण्यासाठी क्लिक करा.👍
विद्यार्थी माहिती दोन प्रकारे भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
१. पोर्टल वरती लॉगिन करून ऑनलाइन विद्यार्थ्यांची माहिती भरून .
२. एक्सल शीट अपलोड करून .
विद्यार्थी प्रोफाईल चे ५४ मुद्यांचा समावेश असलेला exel sheet डाउनलॊड करा.
विद्यार्थी प्रोफाइल मध्ये एकूण ५४ मुद्यांचा समावेश आहे. या ५४ मुद्यांसह आपणास प्रत्येक विद्यार्थ्यांची माहिती भरायची आहे.
यु- डायस प्लस प्रणालीमध्ये केंद्र शासनाकडून दोन टप्प्यामध्ये माहिती संकलित करण्यात येणार आहे.
प्रथम टप्प्यामध्ये शाळेची सांख्यिकी माहिती (शाळेचे ठिकाण,व्यवस्थापन,माध्यम,इत्यादी)शाळा सुरक्षा,अनुदान व खर्च,व्यावसायिक प्रशिक्षण,भौतिक सुविधा,साहित्य उपकरणे,संगणक,नाविन्यपूर्ण डिजिटल उपक्रम,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग इत्यादी माहिती संगणकीकृत करण्यात येणार आहे.
दुसऱ्या टप्प्यामध्ये शाळांमधील विध्यार्थ्याची तपशीलवार माहिती विध्यार्थ्याचे नाव,वडिलांचे नाव,आईचे नाव,मोबाईल नंबर,घराचा पत्ता,वर्ग,जनरल रजिस्टर नंबर,जन्म दिनांक,जात,BPL, दिव्यांगांचे प्रकार,शासनाकडून मोफत देण्यात येणाऱ्या सुविधा,व्यावसायिक शिक्षण संबधी माहिती,शाळाबाह्य विद्यार्थी माहिती,आधार संबधित माहिती,RTE प्रवेश,सहाय्यभूत सुविधा इ. यु. डायस प्लस सॉफ्टवेअरमध्ये शालास्तरावरून अद्यायवात करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment