म्हणीं आणि त्याचे अर्थ
1. अगं अगं म्हशी मला कोठे नेशी - स्वत:ची चूक मान्य करण्याऐवजी त्यासाठी इतरांवर दोष ठेवणे.
2. पी हळद हो गोरी - उतावळेपणा दाखविणे
3. आपला हात जगन्नाथ - आपली प्रगती आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते.
4. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही - प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही
5. अति तेथे माती - कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो.
6. बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर - दोनपैकी एक पर्याय निवडणे
7. आयत्या बिळात नागोबा - दुसर्याने स्वत:साठी केलेल्या गोष्टीचा आयता फायदा उठविणे.
8. चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे - प्रत्येकाची वेळ कधीतरी येतेच
9. उंटावरचा शहाणा - मूर्ख सल्ला देणारा
10. आईजीच्या जीवावर बाईजी उदार - दुसर्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखविणे.
11. नाचता येईना अंगण वाकडे - स्वत:स चांगले काम येत नसणारा दुसऱ्याचे दोष काढतो
12. आपल्याच पोळीवर तूप ओढणे - फक्त स्वत:चाच तेवढा फायदा साधून घेणे.
13. छत्तीसाचा आकडा - विरुद्ध मत असणे
14. आंधळे दळते कुत्रं पीठ खाते - एकानं काम करावं आणि दुसर्यांनं त्याचा फायदा घ्यावा.
15. तेरड्याचा रंग तीन दिवस - एखादे कार्य थोडे दिवस जोरात चालून एकदम बंद पडणे
16. आधी पोटोबा मग विठ्ठोबा-आदी पोटाची सोय पाहावी नंतर देवधर्म करावा.
17. अडला हरी गाढवाचे पाय धरी- एखाद्या हुशार माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख माणसाची विनवणी करावी लागते.
18. आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे- अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे.
19. अति शहाणा त्याचा बैल रिकामा - जो माणूस फार शहाणपणा करायला जातो. त्याचे मुळीच काम होत नाही.
20. आधी शिदोरी मग जेजूरी - आधी भोजन मग देवपूजा
21. दुष्काळात तेरावा महिना - संकटात अधिक भर
22. असतील शिते तर जमतील भुते - एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्या भोवती माणसे गोळा होतात.
23. नव्याचे नऊ दिवस - नवेपणा असतानाचे कौतुक नंतर टिकत नही
24. आचार भ्रष्टी सदा कष्टी - ज्याचे आचार विचार चांगले नसतात. तो नेहमी दु:खी असतो.
25. वासरात लंगडी गाय शहाणी - अडाणी लोकात अल्प ज्ञान असणारा शहाणा ठरतो
26. आपला तो बाब्या दुसर्याचं ते कारटं - स्वत:चे चांगले आणि दुसर्यांचे वाईट अशी प्रवृत्ती असणे.
27. आपण हसे लोकाला, शेंबूड आपल्या नाकाला - ज्या दोषाबद्दल आपण दुसर्याला हसतो. तोच दोष आपल्या अंगी असणे.
28. रात्र थोडी सोंगे फार - काम भरपूर, वेळ कमी
29. आधी बुद्धी जाते नंतर लक्ष्मी जाते - अगोदर आचरण बिघडते नंतर दशा बदलते.
30 . नाकाचा बाल - अत्यंत प्रिय व्यक्ती
31. अचाट खाणे मसणात जाणे - खाण्यापिण्यात अतिरके झाल्यास परिणाम वाईट होतो.
32. आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना - दोन्ही बाजूंनी अडचण
33. आलीया भोगाशी असावे सादर - कुरकुर न करता निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे.
34. आवळा देऊन कोहळा काढणे - क्षुल्लक गोष्टीचा मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे.
35. अंथरूण पाहून पाय पसरावे - आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च ठेवावा.
36. कामापुरता मामा - काम साधण्यापुरते गोड बोलणे
37. आपलेच दात आपलेच ओठ - आपल्याच माणसाने चूक केल्यावर अडचणीचे स्थिती निर्माण होणे.
38. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास - मुळातच आळशी माणसाच्या आळशी वृत्तीला पोषक अवस्था निर्माण होणे.
39. आईचा काळ बायकोचा मवाळ - आईकडे दुर्लक्ष करून बायकोची काळजी घेणारा
40. आठ हात लाकूड अन नऊ हात ढिपली - अत्यंत मूर्खपणाची अतिशयोक्ती.
41. अळी मिळी गुप चिळी - रहस्य उघडकीला येऊ नये म्हणून सर्वांनी मूग गिळून बसणे.
42. अहो रूपम अहो ध्वनी - एकमेकांच्या मर्यादा न दाखवता उलटपक्षी खोटी स्तुती करणे.
43. इच्छा तेथे मार्ग - एखादी गोष्ट करण्याची इच्छा असेल तर काहीतरी मार्ग निघतोच.
44. इकडे आड तिकडे विहीर - दोन्ही बाजूंनी अडचणीची परिस्थिती असणे.
45. उठता लाथ बसता बुकी - प्रत्येक कृत्याबद्दल अद्दल घडविण्यासाठी पुन्हा पुन्हा शिक्षा करणे.
46. उडत्या पाखरची पिसे मोजणे - अगदी सहजपणे अवघड गोष्टीची परीक्षा करणे.
47. उधारीचे पोते सव्वाहात रिते - उधारी घेतलेल्या गोष्टीत तोटा ठरलेलाच असतो.
48. उंदराला मांजर साक्ष - वाईट कृत्य करतांना एकमेकांना साक्ष देणे.
49. उचलली जीभ लावली टाळ्याला - विचार न करता बोलणे.
50. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग - प्रसंगी हास्यास्पद ठरेल आशा प्रकराच्या उतावळेपणा दाखविणे.
51. उथळ पाण्याला खळखळाट फार- थोडासा गुण अंगी असणारा माणूस जास्त बढाई मरतो.
52. उस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये - कोणत्याही चांगल्या गोष्टीचा किंवा एखाद्याच्या चांगुलपणाचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये.
53. एक ना घड भारभर चिंध्या - एकाच वेळी अनेक कामे करायला घेतल्यावर सर्वच कामे अर्थवट होण्याची अवस्था.
54. एका माळेचे मणी - सगळीच माणसे सारख्या स्वभावाची.
55. एका हाताने टाळी वाजत नाही - दोघांच्या भांडणात पूर्णपणे एकट्यालाच दोष देता येत नाही किंवा एखाद्या कृत्यात दोघेही दोषी असणे.
56.ऐकावे जनाचे करावे मनाचे - लोकांचे ऐकून घ्यावे व मग आपल्याला जे योग्य वाटेल ते करावे.
57. उंटावरून शेळ्या हाकणे - आळस, हलगर्जीपणा करणे
58. एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत - दोन तेजस्वी माणसे एकत्र गुण्यागोविदाने नांदू शकत नाहीत दोन सवती एका घरात सुखासमाधानाने राहू शकत नाहीत.
59. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही - क्षुद्र माणसांच्या निंदेने थोरांचे नुकसान होत नाही
60. घोडा मैदान जवळ असणे - परीक्षा लवकरच होणे
61. ओळखीचा चोर जीवे न सोडी - ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा धोकादायक असतो.
62. कर नाही त्याला डर कशाला - ज्याने काही गुन्हा किंवा वाईट गोष्ट केली नाही त्याने शिक्षा होण्याचे भय कशाला बाळगावयाचे
63. कामापुरता मामा - ताकापुरती आजी आपले काम करून घेईपर्यंत एखाद्याशी गोड बोलणे.
64. काळ आला होता. पण वेळ आली नव्हती - नाश होण्याची वेळ आली असताना थोडक्यात बचावणे.
65. कानामगून आली आणि तिखट झाली - मागून येऊन वरचढ होणे.
66. नाव मोठे लक्षण खोटे - कीर्ती मोठी पण कृती छोटी
67. करावे तसे भरावे - जसे कृत्य असेल त्याप्रमाणे चांगलेवाईट फळ भोगावे लागते.
68. हपापाचा माल गपापा - लोकांचा तळतळाट करून मिळवलेले धन झपाट्याने नष्ट होते
69. कधी गाडीवर नाव तर कधी नावेवर गाडी - कधी गरीबी तर कधी श्रीमंती येणे.
70. कुर्हाडीचा दांडा गोतास काळ - आपलाच माणूस आपल्या नाशाला कारणीभूत होतो.
71. काठी मारल्याने पानी दुभंगत नाही - रक्ताचे नाते तोडून म्हणता तुटत नाही.
72. कडू कारले तुपात तळले - साखरेत घोळले तरीही कडू ते कडूच किती ही प्रयत्न केला तरीही माणसाचा मूळ स्वभाव (दूर्वर्तणी) बदलत नाही.
73. कुडी तशी पुडी - देहाप्रमाणे आहार असतो.
74. कधी तुपाशी तर कधी उपाशी - संसारिक स्थिती नेहमी सारखीच राहत नाही त्यात कधी संपन्नता येते तर कधी विपन्नावस्था येते.
75. कावळा बसायला अन फांदी तुटायला - परस्परांशी कारण-संबंध नसताना योगायोगाने दोन गोष्टी एकाचवेळी घडणे.
76. कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच - कितीही प्रयत्न केले तरी काहीचा मूळस्वभाव बदलत नाही.
77. कुंपणाने शेत खाल्ले तर दाद न्यावी - कुणीकडे रखवालादारानेच विश्वासघात करून चोरी करणे.
78. कोल्हा काकडीला राजी क्ष्रुद्र- माणसे क्षुद्र गोष्टीनीही खुश होतात.
79. कोरड्याबरोबर ओले ही जळते - निरपराध्याची अपराध्यासोबत गणना करणे
80. कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही - निश्चित घडणारी घटना कोणाच्याही प्रयत्नाने टाळता येत नाही.
81. काखेत कळसा नि गावाला वळसा - हरवलेली वस्तु जवळ असतानाही इतरत्र शोधत राहणे.
82. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही - क्षुद्र माणसांनी केलेल्या दोषा रोपाने थोरांचे नुकसान होत नसते.
83. खाण तशी माती - आई वडिलाप्रमाणे त्यांच्या मुलांचे वर्तन होणे.
84. खर्याला मरण नाही - खरे कधी लपत नाही, सत्य मेव जयते!
85. खाऊ जाणे ते पचवू जाणे - एखादे कृत्य धाडसाने करणारा त्याचे परिणाम भोगण्यासही समर्थ असतो.
86. खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी - परिस्थितीशी जुळवून न घेता हट्टीपणाने वागणारा.
87. खाऊन माजवे टाकून माजू नये - पैशाच्या संपतीचा गैरवापर करू नये.
88. खोट्याच्या कपाळी गोटा - वाईट कृत्य करणार्याला माणसाचे शेवटी वाईटच होते.
89. गरजवंताला अक्कल नसते - गरजेमुळे अडलेल्या व्यक्तीला इतरांच्या म्हणण्यापुढे मान डोलवावी लागते.
90. गर्वाचे घर खाली - गर्विष्ठ माणसाची कधीतरी फजिती होतेच.
91. गरज सरो नि वैध मरो - आपले काम झाले की उपकार कर्त्याची पर्वा न करणे.
92. गर्जेल तो पडेल - काय केवळ गाजावाजा करणार्या व्यक्तीच्या हातून फारसे काही घडत नसते.
93. गाढवाला गुळाची चव काय? - मुर्खाला चांगल्या गोष्टीची किंमत कळत नाही.
94. गाढवांचा गोंधळ, लाथांचा सुकाळ - मूर्ख लोक एकत्र आल्यावर मूर्खपणाचेच कृत्य करणार
95. गाव करी ते राव ना करी - श्रीमंत
व्यक्ति स्वत:च्या बळावर जे करू शकत नाही ते एकीच्या बळावर सामान्य माणसे करू शकतात.
96. गाड्याबरोबर नळ्याची यात्रा - मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचाही फायदा होतच असतो.
97. गाढवापुढे वाचली गीता अन कालचा गोधळ बारा होता - मूर्खाला केलेला उपदेश वाया जातो.
98. गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाली - एखादी गोष्ट साध्य झाली तर उत्तमच नाही तर तिचा दूसरा उपयोग करून घेणे.
99. गाढवाच्या पाठीवर गोणी - एखाद्या गोष्टीची अनूकुलता असून उपयोग नाही. तर तिचा फायदा घेता यायला हवा.
100. गुरुची विद्या गुरूला फळली - एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटणे.
101. गुळाचा गणपती - गुळाचाच नैवेद्य ज्याची वस्तु त्यालाच भेट देणे.
102. गोगलगाय नि पोटात पाय - एखाद्याचे खरे स्वरूप न दिसणे.
103. गोरागोमटा कपाळ - करंटा दिसायला देखणा पण नशिबाने दुर्दैवी व्यक्ती.
104. घर ना दार देवळी बिर्हाड - बायको पोरे नसणारा एकटा पुरुष किंवा शिरावर कोणतीही जाबाबदारी नसलेली व्यक्ती.
105. घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात - एखाद्यावर प्रतिकूल परिस्थिती आली म्हणजे सारेच त्याच्याबरोबर वाईटपणे वागू लागतात.
106. घरचे झाले थोडे, व्याह्याने धाडले घोडे - स्वत:च्या कामाचा व्याप अतोनात असताना दुसर्यांने आपलेही काम लादणे.
107. घर पहावे बांधून लग्न पहावे करून - अनुभवाने माणूस शहाणा होतो.
108. घटका पाणी पिते घड्याळ टोले खाते - आपापल्या कर्मानुसार परिणाम भोगावे लागतात.
109. घरोघरी मातीच्याच चुली - सर्वत्र सारखीच परिस्थिती अनुभवास येणे.
110. घोडे खाई भाडे - धंद्यात फायद्यापेक्षा खर्च जास्त.
111. चढेल तो पडेल - गर्विष्ठ माणसाचा गर्व उतरल्याशिवाय राहत नाही.
112. चालत्या गाडीला खीळ - व्यवस्थीत चालणार्या कार्यात अडचण निर्माण होणे.
113. चमत्काराशिवाय नमस्कार नाही - पराक्रमावाचून पोवाडा नाही लोकांना काही विशेष कार्य करून दाखविल्याशिवाय लोक मान देत नाहीत.
114. चिंती परा येई घरा - दुसर्याबदल मनात वाईट विचार आलेकी स्वत:चेच वाईट होते.
115. चोर सोडून सान्याशाला फाशी - खर्या गुन्हेगाराला शासन न करता दुसर्याच निरपराध माणसाला शिक्षा देणे.
116. चोराच्या उलटया बोंबा - स्वत:च गुन्हा करून दुसर्यावर आळ घेणे.
117. चोराच्या मनात चांदणे - वाईट माणसांनाच वाईट माणसांच्या युक्त्या कळतात.
118. चोरावर मोर - एखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसर्यावर कडी करणे.
119. जळत्या घराचा पोळता वासा - प्रचंड नुकसानीतून जे वाचले ते आपले म्हणून समाधान मानावे.
120. जलात राहुन माशांशी वैर करू नये - ज्यांच्या सहवासात राहावे लागते त्यांच्याशी वैर करून नये.
121. जन्माला आला हेला, पाणी वाहून मेला - निरक्षर किंवा निर्बुद्ध माणसाचे आयुष्य शारीरिक कष्टामध्येच जाते.
122. जळत घर भाड्याने कोण घेणार - नुकसान करणार्या गोष्टीचा स्वीकार कोण करणार.
123. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे दुसर्याच्या स्थितीत - आपण स्वत:जावे, तेव्हा तिचे खरे ज्ञान आपणास होते.
124. ज्या गावाच्या बोरी त्याच गावच्या बाभळी - एकमेंकाचे वर्म माहीत असणार्या माणसांशी गाठ पडणे.
125. ज्याचे खावे मीठ त्याचे करावे निट - जो आपल्या वर उपकार करतो त्या उपकार कर्त्याला स्मरण करून त्याच्या यशासाठी प्रयत्न करावेत.
126. जशी देणावळ तशी धुणावळ - मिळणार्या मोबदल्याच्या प्रमाणातच काम करणे.
127. ज्याचे करावे बरे तो म्हणतो माझेच खरे - एखाद्याचे भले करायला जावे तर तो विरोधच करतो व आपलाच हेका चालवतो.
128. जी खोड बाळ ती जन्मकळा - लहानपणीच्या सवयी जन्मभर टिकतात.
129. ज्याच्या हाती ससा तो पारधी - ज्याला यश मिळाले तो कर्तबगार
130. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही - मूळचा स्वभाव आयुष्यात कधीच बदलत नाही.
131. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धरी - मातेकडून बालकावर सुसंस्कार होतात म्हणून ते भविष्यात कर्तुत्ववान ठरते.
132. झाकली मूठ सव्वा लाखाची - व्यंग गुप्त ठेवणेच फायद्याचे असते.
133. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही - कष्ट केल्याशिवाय मोठेपणा मिळत नाही.
134. टिटवी देखील समुद्र आटविते - सामान्य क्षुद्र वाटणारा माणूस प्रसंगी महान कार्य करू शकतो.
135. डोळ्यात केर आणि कानात फुंकर - रोग एक आणि उपचार दुसराच
136. डोंगर पोखरून उंदीर काढणे - प्रचंड परिश्रम घेवूनही अल्प यश प्राप्ती होणे.
137. तंटा मिटवायला गेला गव्हाची कणिक करून आला - भांडण मिटविण्याऐवजी भडकावणे.
138. तळे राखील तो पाणी चाखील - आपल्याकडे सोपविलेल्या कामाचा थोडाफार लाभ मिळविण्याची प्रत्येकाची प्रवृत्ती असते.
139. ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वाण नाही पण गुण लागला वाईट - माणसाच्या सहवासामध्ये चांगला माणूसही बिघडतो.
140. ताकापुरते रामायण - आपले काम होईपर्यंत एखाद्याची खुशामत करणे
141. तोंड दाबून बुक्यांचा मार - एखाद्याला विनाकारण शिक्षा करणे आणि त्याला त्याबद्दल तक्रार करण्याचा मार्गही बंद करणे.
142. तेल गेले तूप गेले आणि हाती धुपाटणे राहिले - फायद्याच्या दोन गोष्टीमधून मूर्खपणामुळे एकही गोष्ट साध्य न होणे.
143. कावीळ झालेल्याला सगळे जग पिवळे - पूर्वग्रहदूषित किंवा स्वत: वाईट प्रवृत्ती असलेल्या माणसांना सगळीकडे दोषच दिसत असतात.
144. गाता गळा, शिंपता मळा - जबाबदारी पेलण्याचे सामर्थ्य व कौशल्य प्रत्यक्ष स्वतः पेलल्याशिवाय येत नाही .
145. असे साहेब किती, सांमटीत हिंडे राती - नावाचे साहेब कितीतरी असतात पण त्यांचा काही उपयोग नसतो.
146. अर्धी टाकून सगळीकडे धावू नये. - संबध वस्तू मिळेल या आशेवर अर्धी मिळत असेल तर ती टाकू नये.
147. अर्थी दान महापुण्य - गरजू माणसाला दान दिल्यामुळे पुण्य मिळते.
148.अन्नाचा येतो वास, कोरीच घेते घास. - अन्न न खाणे पण त्यात मन असणे.
149. उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक - एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्याकरिता काही काल वाट पहावी लागते.
150. देखल्या देवा दंडवत - वरकरणी, खोटे खोटे केलेले स्वागत
No comments:
Post a Comment