गणित महोत्सव उपक्रम:-
भारतीय गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा 22 डिसेंबर जन्मदिन प्रत्येक वर्षी राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो.शालेय स्तरापासून विध्यार्थ्याना गणित विषयाची गोडी लागावी तसेच गणितीय दृष्टिकोन विकसित व्हावा यासाठी गणित
दिनानिमित्त आपल्या जि. प. शाळा शिळ,ता.अंबरनाथ(ठाणे) येथे विविध गणितीय उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
पायाभूत संख्याज्ञान आणि गणितीय क्षमता विषयी बोलतांना श्री.संजय मराठे सर यांनी विध्यार्थ्याना संख्यात्मक संकल्पना आणि त्यांच्यातील कार्यकारणभाव,गणनपूर्व संकल्पना,संख्याची तुलना,क्रमवार संख्या,वर्गीकरण,आकृतिबंध इत्यादी गोष्टींची प्रात्याक्षिके करून विध्यार्थ्याना समजाऊन सांगितले.गोट्या,खडे,पत्ते, काड्या,रंगीत खंडू,संख्याकार्ड इत्यादी गोष्टींच्या सहाय्याने विध्यार्थ्याना मार्गदर्शन केले.
परिसरातील गणित,गणित शब्दकोडी,गणित पेटीतिल साहित्य,व्यावहारातील गणित इत्यादी बाबींचे कल्पक आणि रंजक खेळ खेळून श्री.तांबे सरांनी विध्यार्थ्यामधील गणित विषयाची भीती घालवली आणि विध्यार्थ्याना बोलते केले.
विध्यार्थ्यानी गणितीय रांगोळी,चित्रकला स्पर्धा,गणितीय खेळ,गणित शब्दकोडी इत्यादी खेळरूपी उपक्रमात भाग घेऊन कार्यक्रमात रंजकता आणली.
स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या विध्यार्थ्याना प्रोत्साहन म्हणून शाळा व्यवस्थापन समिती,पालक आणि शिक्षकवर्गाकडून शैक्षणिक वस्तूंचे बक्षीस रूपाने वाटप करण्यात आले.सर्व विध्यार्थ्याना गोड खाऊ देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली
No comments:
Post a Comment