शाळा प्रवेश कार्यक्रम :-
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत...
जि. प. शाळा -शिळ, ता.अंबरनाथ(ठाणे) येथे कोविड 19 प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर आज दि .15 डिसेंबर 2021 रोजी शाळा पूर्ववत सुरू......
आज दि.15 डिसेंबर 2021 रोजी जि. प. शाळा शिळ,ता. अंबरनाथ येथे शासनाच्या लेखी आदेशान्वये कोरोनाचे नियम पाळत इयत्ता 1 ली ते 4 थी विद्यार्थ्याचा शाळा प्रारंभ दिनी सर्व परिसरात रांगोळी काढण्यात आली.दाराला आंब्यांच्या पानांचे तोरण बांधून सजवण्यात आले. आनंदाच्या वातावरणात विध्यार्थ्याचे स्वागत करण्यात आले.
शाळेच्या आवारात सर्व विध्यार्थ्याचे ऑक्सिजन लेव्हल आणि टेम्प्रेचर लेव्हल तपासण्यात आली.सर्व विद्यार्थ्याना शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष सौ.वर्षा शिंदे यांच्या कडून औक्षण करण्यात आले.आगमन झालेल्या विदयार्थी तसेच पालक यांच्याशी श्री.संजय मराठे सर आणि श्री.संजय तांबे सर यांनी हितगुज केली.दोन्ही शिक्षकांनी स्वखर्चाने आणलेले शैक्षणिक साहित्याचे विध्यार्थ्याना वाटप करण्यात आले.सर्व विध्यार्थ्याना तोंड गोड करण्यासाठी चॉकलेट आणि बिस्किटांचे वाटप करण्यात आले.
सर्व बालगोपालांच्या चिमुकल्या पावलांनी सर्व शाळेचा परिसर दुमदुमून गेला....
No comments:
Post a Comment