शाळा

बदली पोर्टल

 बदली प्रक्रिया पोर्टल येथे ओपन करा.


जिल्हांतर्गत बदली नवीन शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.



महत्वाचे......

*जिल्हांतर्गत बदली 2025 माहिती नियम व अपडेट*


♻️ *`बदली वर्ष`*:- ज्या कॅलेंडर वर्षाच्या दिनांक 31 मे पर्यंत बदल्या करावयाच्या आहेत ते वर्ष. म्हणजे या वर्षी 31 मे 2025 पर्यंत


💁‍♀️ *`बदलीसाठी निश्चित धरावयाची सेवा`*:- अवघड क्षेत्र निहाय व सर्वसाधारण क्षेत्र निहाय बदली वर्षाच्या दिनांक *31मे पर्यंत* पूर्ण झालेली *एकूण सलग सेवा.*


👨‍💼 *`शिक्षक`* : बदली शासन निर्णयाचे प्रयोजनार्थ शिक्षक म्हणजे जिल्हा परिषदेंतर्गत *कार्यरत असलेले प्राथमिक शिक्षक / पदवीधर शिक्षक / मुख्याध्यापक.*


👑 *`सक्षम प्राधिकारी`*:- शिक्षकांच्या बदल्यांसाठी जिल्हा परिषदेचे *मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO)* हे सक्षम प्राधिकारी असतील.


🔰 *`शिक्षक बदली - अवघड क्षेत्राचे निकष`*


१) नक्षलग्रस्त / पेसा गाव क्षेत्रात असणारे गाव


२) वार्षिक सरासरी पर्जन्यमान २००० मिलीमिटर पेक्षा जास्त किंवा नैसर्गिक आपत्तीने सातत्याने संपर्क तुटणारे गाव. (महसूल विभागाकडील माहितीनुसार)


३) हिंस्त्र वन्य प्राण्यांचा उपद्रव असणारा जंगलव्याप्त प्रदेश. (संबंधित उप वनसंरक्षक यांच्या अहवालानुसार)


४) वाहतूकीच्या सुविधांचा अभाव असणारे गाव तसेच वाहतूक योग्य रस्त्यांचा अभाव / रस्त्याने न जोडलेल्या शाळा. (बस, रेल्वे, इतर सार्वजनिक वाहतूक)


५) संवाद छायेचा प्रदेश (Communication Shadow Area) (संबंधित महाप्रबंधक, BSNL यांच्या अहवालानुसार)


६) डोंगरी भाग प्रदेश (नियोजन विभागाच्या शासन निर्णयानुसार)


७) राष्ट्रीय, राज्य महामार्गापासून १० कि. मी. पेक्षा जास्त दूर.


♻️ `अवघड क्षेत्रासाठी वरील निकषापैकी 3 निकष लागू असणे गरजेचे आहे.`


♻️ `अवघड क्षेत्राचे दर 3 वर्षांनी पुनर्विलोकन करण्यात येते.`


💁‍♀️ *`बदलीस पात्र शिक्षक`* :-

बदलीस पात्र शिक्षक म्हणजे `ज्या शिक्षकांची सर्वसाधारण क्षेत्रात किंवा अवघड क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धरावयाची सलग सेवा १० वर्षे पूर्ण झालेली आहे आणि विद्यमान शाळेत सदर शिक्षकाची सेवा ५ वर्षे पूर्ण झालेली आहे असे शिक्षक.` 


*तथापि,* अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये रिक्त असलेली पदे भरावयाची झाल्यास सर्वसाधारण क्षेत्रात १० वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना विद्यमान शाळेतील ५ वर्षे सेवेची अट लागू राहणार नाही. अवघड क्षेत्रातील रिक्त जागा प्राथम्याने भरणे आवश्यक असल्याने सेवाजेष्ठता विचारात घेऊन सर्वसाधारण क्षेत्रात १० वर्षे पूर्ण सेवा केलेल्या शिक्षकांना वास्तव्य जेष्ठतेप्रमाणे आवश्यकतेनुसार अवघड क्षेत्रामध्ये बदली करुन पदस्थापित करण्यात येईल (टप्पा क्र. ७ नुसार).


💁‍♀️ *`बदली अधिकार प्राप्त शिक्षक`* :- म्हणजे ज्या शिक्षकांची अवघड क्षेत्रात *बदलीसाठी निश्चित धरावयाची सेवा 3 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त झाली असेल असे शिक्षक.*


*अवघड क्षेत्रातील शाळा सर्वसाधारण क्षेत्रात घोषित केल्यास*:- अवघड क्षेत्रातील शाळांची सुधारित यादी प्रसिध्द केल्यानंतर सर्वसाधारण क्षेत्र म्हणून घोषित झालेल्या मात्र पूर्वी अवघड क्षेत्रामध्ये मोडणाऱ्या शाळांमधील शिक्षकांची सलग सेवा 3 वर्ष झालेली असेल तर, त्यांना पुढील बदली वर्षामध्ये बदली अधिकार प्राप्त करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येईल.


🤗 *`बदली प्रक्रीयेमधून वगळण्यात येणारे शिक्षक`* :-

१) पुढील बदली वर्षात सेवानिवृत्त होणार आहेत असे शिक्षक.


२) बदली प्रकिया सुरु असताना निलंबित / सेवेतून कार्यमुक्त केलेले शिक्षक.


💁‍♀️ *विशेष संवर्ग शिक्षक भाग-1* : 

👇 `खाली नमूद संवर्गाचे शिक्षक हे विशेष संवर्ग शिक्षक भाग-1 म्हणून गणले जातील.`

१.८.१ पक्षाघाताने आजारी शिक्षक (Paralysis)

१.८.२ दिव्यांग शिक्षक (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णय दिनांक १४.१.२०११ मधील नमूद प्रारुपाप्रमाणे सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आवश्यक), मानसिक विकलांग मुलांचे व दिव्यांग मुलांचे पालक (पालक म्हणजे आई वडील किंवा ते नसल्यास बहिण भाऊ), तसेच ज्या शिक्षकांचे जोडीदार मानसिक विकलांग व दिव्यांग आहेत असे शिक्षक


१.८.३ हृदय शस्त्रक्रिया झालेले शिक्षक

१.८.४ एकच मुत्रपिंड (किडनी) असलेले / मुत्रपिंड रोपण केलेले शिक्षक / डायलीसीस शिक्षक

१.८.५ यकृत प्रत्यारोपण झालेले शिक्षक 

१.८.६ कॅन्सरने (कर्करोग) आजारी शिक्षक

१.८.७ मेंदुचा आजार झालेले शिक्षक

१.८.८ थैलेसेमिया / कॅन्सर विकारग्रस्त मुलांचे पालक/जन्मजात गुणसुत्रांच्या दोषांमुळे उद्भवणारे आजार (उदा. Methyl Malonic Acidemia (MMA) Classical type (Mutase deficiency व इतर आजार) (पालक म्हणजे आई-वडील किंवा ते नसल्यास बहिण भाऊ), तसेच ज्या शिक्षकांचे आई किंवा वडील कॅन्सरग्रस्त आहेत व त्यांचेवर उपचार सुरू आहेत असे शिक्षक 

१.८.९ माजी सैनिक तसेच आजी/माजी सैनिक व अर्धसैनिक जवानांच्या पत्नी / विधवा

१.८.१० विधवा शिक्षक

१.८.११ कुमारिका शिक्षक

१.८.१२ परित्यक्ता / घटस्फोटीत महिला शिक्षक

१.८.१३ वयाची ५३ वर्षे पूर्ण झालेले शिक्षक

१.८.१४ स्वातंत्र्य सैनिकांचा मुलगा/मुलगी / नातू / नात (स्वातंत्र्य सैनिक हयात असेपर्यंत)


👇 *खालील आजाराने ज्या शिक्षकांचे जोडीदार व्याधिग्रस्त आहेत असे शिक्षक संवर्ग 1 मध्ये येतील:*

१.८.१५ हृदय शस्त्रक्रिया झालेले

१.८.१६ एकच मूत्रपिंड (किडनी) असलेले / मूत्रपिंड रोपण केलेले कर्मचारी / डायलिसीस सुरु असलेले

१.८.१७ यकृत प्रत्यारोपण झालेले

१.८.१८ कॅन्सरने (कर्करोग) आजारी असलेले

१.८.१९ मेंदूचा आजार झालेले.

१.८.२० बॅलेसेमिया विकारग्रस्त असलेले

💁‍♀️ *विशेष संवर्ग शिक्षक भाग-2* : 

👇 *`पती-पत्नी एकत्रीकरण`* `(जर सध्या दोघांचे नियुक्तीचे ठिकाण एकमेकांपासून ३० कि.मी. पेक्षा जास्त अंतरावर असल्यास त्यांना विशेष संवर्ग शिक्षकांचा दर्जा प्राप्त होईल.)`


💁‍♀️ *पती पत्नी एकत्रीकरण प्राधान्यक्रम*

1. पती-पत्नी दोघेही जिल्हा परिषद कर्मचारी असतील तर,

2. पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य शासकीय कर्मचारी असेल तर.

3. पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा केंद्र शासकीय कर्मचारी असेल तर

4. पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचा कर्मचारी असेल तर, उदा. महानगरपालिका/नगरपालिका

5. पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य अथवा केंद्र शासनाच्या सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी

6. पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा शासन अनुदानित संस्थेतील शिक्षक / कर्मचारी असेल तर

7. *पती-पत्नी दोघांपैकी एक / दोघेही शिक्षणसेवक / तात्पुरत्या स्वरुपात शिक्षक म्हणून कार्यरत असेल तर*

2 comments:

बहुजनांच्या प्रज्ञेचा सूर्य: कर्मवीर

 ▪️बहुजनांच्या प्रज्ञेचा सूर्य: कर्मवीर                      महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात आणि समाजसुधारणेच्या प्रदीर्घ इतिहासात कर्मवीर ...