संविधान दिन आणि शौर्यगाथा सलाम दिन:-
जिल्हा परिषद शाळा - शिळ ता.अंबरनाथ ,जि. ठाणे. येथे संविधान दिन आणि शौर्यगाथा सलाम दिन साजरा...
जिल्हा परिषद शाळा शिळ येथे संविधान दिवसाचे औचित्य साधत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला ग्रामपंचायत सरपंच आदरणीय सौ.दर्शना दिनेश बनोटे यांनी प्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि 26 /11 च्या हुतात्म्यांच्या फोटोला हार घालून अभिवादन केले.
सर्व उपस्थित शिक्षक,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य,अंगणवाडी कर्मचारी,पालक,आणि विध्यार्थ्यानी सामूहिक संविधान उद्देशिकेचे वाचन करून आरोग्य शपथ घेतली.
श्री संजय मराठे सर यांनी भारतीय संविधानातील मूलभूत हक्क व कर्तव्य समजाऊन सांगत असतांनाच भारतीय संविधान तयार करण्यासाठी एकूण दोन वर्षे ११ महिने आणि १८ दिवस लागले. आपल्या संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र भारतात राहण्याचा समान अधिकार दिला आहे. पाश्चिमात्य संस्कृतीच्या युगात देशातील तरुणांमध्ये संविधानाची मूल्ये रुजवणे हा संविधान दिन साजरा करण्यामागचा एकमेव उद्देश आहे असे नमूद केले.
आपल्या देशाच्या संविधानाच्या निर्मितीमध्ये डॉ. भीमराव आंबेडकर यांचा सर्वात महत्त्वाचा वाटा होता. त्यामुळे त्यांना आदरांजली वाहण्याचे प्रतीक म्हणूनही संविधान दिन साजरा केला जातो. असे श्री संजय तांबे सर यांनी विद्यार्थ्याना स्पष्ट केले.तद्नंतर शहीद हुतात्म्यांची माहिती विद्यार्थ्याना देण्यात आली.
देशाबद्दल आपले कर्तव्य आणि निष्ठा याबाबत विध्यार्थ्यामध्ये जागरूकता निर्माण करून खाऊचे वाटप केले...आणि कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,सदस्य,अंगणवाडी ताई,मदतनीस ताई,शा पो आहार शिजवणाऱ्या ताई उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment