बदली

Sunday, 26 December 2021

नाताळ किंवा क्रिसमस सण साजरा

 नाताळ किंवा क्रिसमस सण साजरा :-


जि. प. शाळा - शिळ,ता. अंबरनाथ,जि. ठाणे येथे नाताळ सण साजरा.


         सर्वप्रथम विध्यार्थ्याना श्री.संजय मराठे सरांनी नाताळ या सणाविषयी सांगितले की नाताळ किंवा क्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी २५ डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. काही ठिकाणी ह्या सणाऐवजी एपिफनी सण ६, ७ किंवा १९ जानेवारीला साजरा केला जातो.ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण १२ दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळच्या पोप पहिला ज्युलियसने ‘२५ डिसेंबर’ हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला.त्या वेळेपासून नाताळ हा दिवस २५ डिसेंबर या तारखेला साजरा केला जाऊ लागला. अशी माहिती दिली.

          तद्नंतर श्री.तांबे सरांनी सांता क्लॉज हे पाश्चिमात्य ख्रिश्चन धर्मात आणि संस्कृतीत आढळणारे काल्पनिक पात्र आहे. सांता क्लॉजाचे नाताळ सणाशी अतूट नाते आहे. सांता क्लॉज जगभरातील मुला-मुलींना नाताळच्या आदल्या रात्री म्हणजे २४ डिसेंबरला खेळणी व इतर भेटवस्तू वाटतो असा ख्रिश्चन लोकांमधे समज आहे. जगभरातील लहान मुलांचे सांताक्लॉज हे अनोखे आणि आवडते पात्र आहे. असे नमूद केले.

            नाताळ या सणाची सविस्तर माहिती सांगून झाल्यावर मुलांना कागदी टोप्या बनवून सांता क्लोज चा खाऊ वाटप खेळ घेण्यात आला.मुलांचे पटांगणात खेळ आणि नृत्य घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



No comments:

Post a Comment

करिअर निवडतांना.....

 करिअर निवडतांना..... नुकत्याच दहावी-बारावी च्या परीक्षा झाल्या.अनेक विद्यार्थ्यांनी आपले पेपर झाले म्हणून सुटकेचा निःश्वास टाकला. पण ही सुट...