बदली

Monday, 18 July 2022

विसर्गयुक्त शब्दांचे लेखन

🎯 भाषासूत्र, दै.लोकसत्ता

🎯 विसर्गयुक्त शब्दांचे लेखन

पुष्कळ वेळा आपण काही शब्दांचे उच्चार चुकीचे करतो. तेच शब्द लिहितानाही, जसे उच्चारले आहेत, तसेच लिहितो. निदान लेखन करताना बिनचूक शब्द लिहावेत.

आता पुढील वाक्ये वाचा –

‘आम्ही सर्व जण संध्याकाळी घरावरच्या गच्चीत बसून गप्पा मारत होतो, चेष्टामस्करी करत होतो. इतक्यात काळेकुट्ट ढग आकाशात जमा झाले. एकदम सर्वत्र अंध:कार झाला. आम्ही गडबडीने घरात गेलो. घरातही अंधार! दिवा लावायला गेलो तर, वीज गेली होती. खिडकीतून बाहेर पाहिलं. रस्त्यावरचे दिवेही गेले होते. सर्वत्र नुसता हाहा:कार माजला होता.’

या परिच्छेदात दोन चुका आहेत. बोलताना त्या शब्दांचा उच्चार आपल्याला हवा तसा करत असलो, तरी अर्थबोध होण्यात अडचण येत नाही, हे मान्य. लेखनात मात्र उच्चारलेल्या शब्दांसारखे लिहिणे योग्य नाही. ते शब्द आहेत- अंध:कार आणि हाहा:कार.

हे संस्कृतातून मराठीने जसेच्या तसे स्वीकारलेले तत्सम शब्द होत. पण लेखनात चूक आहे, ती दोन्ही शब्दांतील विसर्गचिन्हांची. पहिला शब्द हा जोडशब्द आहे- अंध कार. ‘अंध’ (संस्कृत, विशेषण) अर्थ-अंधाराने व्याप्त, निबिड, दाट; ‘अंधकार’(सं.नाम, पुल्लिंगी) अर्थ-काळोख. अंधकार या शब्दात ‘अंध:’ असा शब्द नाही. अनेक मराठी भाषक या शब्दाचा उच्चार अंध्धकार असा करतात, त्यामुळे लिहिताना ‘ध’ नंतर विसर्ग असावा, असे वाटते. (जसे मन:पूर्वक. शब्द आहे- मनस् पूर्वक. अंधकार शब्दामध्ये ‘अंधस्’ असा शब्द नाही. अंधकार हे बरोबर आहे. अर्थ आहे- दाट काळोख. अंध:कार चूक.

आता हाहा:कार हा वरील परिच्छेदात योजलेला शब्द पाहा. हाही तत्सम शब्द आहे. हाहा कार. संस्कृतात ‘हाहा’ हे उद्गारवाचक अव्यय आहे. अर्थ- दु:ख किंवा यातना सूचित करणारे अव्यय. ‘हाहा’ हा दु:खोद्गार आहे. मराठीत ‘अरेरे, अगग, हाय हाय’ ही जशी दु:खोद्गारदर्शक अव्यये आहेत, तसेच संस्कृत ‘हाहा’ हे दु:खोद्गारदर्शक अव्यय आहे. हा शब्द आहे ‘हाहाकार’. ‘हा’ नंतर विसर्ग नाही.

काही विसर्गयुक्त (शब्दाच्या मध्ये विसर्ग असलेले) शब्द पाहू-

क:पदार्थ, छंद:शास्त्र, नि:सत्त्व, अंत:करण, अंत:स्थ, दु:ख, प्रात:स्मरण, मन:स्थिती, मन:पूर्वक, दु:स्वप्न, दु:स्थिती.

*🖊यास्मिन शेख*

==============

*संकलक- नितीन खंडाळे, चाळीसगाव*

*दिनांक- १८जुलै २०२२*

🖊यास्मिन शेख

==============

संकलक- नितीन खंडाळे, चाळीसगाव

दिनांक- १८जुलै २०२२

No comments:

Post a Comment

करिअर निवडतांना.....

 करिअर निवडतांना..... नुकत्याच दहावी-बारावी च्या परीक्षा झाल्या.अनेक विद्यार्थ्यांनी आपले पेपर झाले म्हणून सुटकेचा निःश्वास टाकला. पण ही सुट...