आसवांचा व्यापार गझल व्हिडीओ लॉन्च
https://youtu.be/2dusUDakvik
कवी श्री.संजय मराठे सर यांची मराठी गझल आसवांचा व्यापार शुक्रवार दिनांक 20/05/2022 रोजी pipilika या You tube चॅनेलवर लॉन्च करण्यात आली.
मराठे सरांची कविता वाचण्याची सवय असलेल्या वाचकांना गझल रूपाने एक पर्वणीच जणू उपलब्ध झाली आहे.
एक आदर्श शिक्षक, हळव्या मनाचा कवी,संवेदनशील माणूस ते गझलकार संजय मराठे हा प्रवास तसा बराच दीर्घ...पण म्हणतात ना अशक्यावर विश्वास ठेवणं आणि ते शक्य करणं प्रेम करणाऱ्यालाच जमू शकतं आणि तेच कवितेवर अतोनात प्रेम करणाऱ्या किंबहुना कविता जगणाऱ्या माणसाला जेव्हा त्याच्या मनातले शब्द प्रत्यक्ष साकार होताना दिसतात तेव्हा ते पाहतांना - ऐकतांना मनाची होणारी कातर अस्वस्थता, मना-शरीरावर येणारी विलक्षण बेचैनी, शब्दातला भाव मनाला भिडल्यावर येणारा सुन्नपणा... सारेच कसे विलक्षण...
दोन व्यक्ती कितीही एकमेकांच्या प्रेमात असल्या तरी त्या दोन्ही व्यक्तिमत्वाच्या भौतिक, मानसिक, भावनिक ,सामाजिक गरजा वेगवेगळ्या असतात. प्रत्येकाची मतं, इच्छा,आकांक्षा वेगळ्या असतात. सहवासात जसं माणूस खुलतो तसेच ते स्पेस न मिळाल्याने रसहीन ही होतो. हीच कसरत करतांना कधीतरी छोटी-मोठी भांडणं ही होतातच, लहान-सहान कुरबुरी होतात... नि त्यामुळे होणारी मनाची घालमेल,घुसमट या गझलमध्ये अचूक टिपलीय.
शब्द तर हृदयाला भिडतातच पण अतिशय समृद्ध,सशक्त अभिनयाने सार्थक खैरनार आणि सोनाक्षी कांडरकर या दोन्ही कलाकारांनी ती आर्तता,व्याकुळता प्रभावीपणे आपल्यापर्यंत पोहचवलीय, मनाची ही अवस्था स्वत: सार्थक खैरनार यांनी तितक्याच हृदयाला भिडणाऱ्या आवाजाने साधलीय आणि कवींच्या शब्दांना साजेशी स्थळ काळाची योजना अभिषेक जगताप या नवोदित दिगदर्शकाने केलीय.प्रत्येक फ्रेम अचूक आणि समर्पक झालीय, आशय मांडणी आणि तितक्याच ताकदीने ती कॅमेऱ्याने टिपणे यामुळे विचारांची ,भावनांची तीव्रता पोहचविण्यात सर्वचजण यशस्वी झालेत.कविता वाचण्यात...ऐकण्यात....पाहण्यात आणि अनुभवण्यातला आनंद ही गझल पाहतांना मिळतो.व्हिडीओ संकलन करतांना अभिजीत अरुण कांबळी ,चैतन्य पवार यांची ताकद आपणास दिसून येते....
नात्यात आलेला तात्पुरता दुरावा नि मग अबोला,जोडीदाराचा कासावीस चेहरा ..... मानवी भाव भावनांचा आणि प्रेमाचा बंध कमकुवत होण्याचा क्षण ...आणि तेथूनच सुरू होतो *आसवांचा व्यापार....
गझलकार : संजय मराठे
संगीत /गायक : सार्थक खैरनार
तबला : संगीत कुलकर्णी
दिग्दर्शन /छायाचित्रण : अभिषेक जगताप
संकलन : चैतन्य पवार / अभिजीत अरुण कांबळी
कलाकार
सोनाक्षी कांडरकर
सार्थक खैरनार


No comments:
Post a Comment