जि. प. शाळा शिळ,ता अंबरनाथ येथे दिवाळी फराळ वाटप कार्यक्रम
आज दि 31ऑक्टोबर 2021वार रविवार रोजी जि. प. शाळा शिळ,ता.अंबरनाथ येथे दिवाळी फराळाचे वाटप.
भारतात साजरा होणारा सर्वात मोठा आणि उज्वल सण म्हणजे दिवाळी होय. दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव. हा सण अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतिक आहे. हा सण खूप उत्साहात साजरा केला जातो. घराघरात आनंदाने आणि आपापल्या परिस्थितीनुसार नवीन कपडे, दागिने, फराळ या गोष्टींबरोबर हा सण साजरा करतात. पण समाजात काही कुटुंब अशी आहेत कि ते केवळ आर्थिक दुर्बलतेमुळे सण साजरा करू शकत नाहीत.अशांसाठी पराग प्रतिष्ठान मुंबई यांनी "दिवाळी फराळ " हा उपक्रम हाती घेतला ....
आपल्या सभोवतालच्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो. याच मानसिकतेने समाजातील गरीब घटकांसाठी आपल्याच आनंदातील काही क्षण त्यांच्यासाठी देण्याच्या भावनेतून "पराग प्रतिष्ठान मुंबई " यांच्या पुढाकाराने सौ.आर्ची गांगण साठे मॅडम,श्री अभिजित कांबळी सर,श्री.अभिजित बावळे सर यांनी जि. प. शाळा -शिळ ता. अंबरनाथ. येथे समक्ष येऊन मौजे शिळ, कातकरीवाडी,ठाकूरवाडी येथील 150 वंचित, गरजू कुटुंबांना दिवाळी सणानिमित्त फराळाचे वाटप केले.
पराग प्रतिष्ठान मुंबई यांचे अनेक वर्षांपासून शैक्षणिक व सामाजिक कार्यात सहकार्य मिळत आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून शिळ येथे शालेय विध्यार्थ्याना शैक्षणिक साहित्य वाटप,कपडे वाटप,धान्य वाटप इ उपक्रम पराग तर्फे वर्षभर राबविले जात आहेत.असे श्री संजय मराठे सरांनी सांगितले.
कार्यक्रम ठिकाणी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य,शिक्षक श्री संजय मराठे सर,श्री.संजय तांबे सर, समस्थ ग्रामस्थ मंडळ,तरुण मंडळ उपस्थित होते.

No comments:
Post a Comment