सध्या बऱ्याच व्यक्तींचे फेसबूक अकाउंट प्रोफाईल फेक बनवून यादीतील मित्रांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यांच्याकडून पैसे मागण्याचे प्रमाण वाढत आहे. ज्यांची कोणाची फेसबुक प्रोफाईल फेक बनवली जाईल त्यांच्यासाठी........
१) प्रथमतः ज्यांची फेसबुक प्रोफाईल फेक बनवली आहे त्यांनी आपल्या स्वतःच्या फेसबुक अकाउंटवरून बनवलेली फेक प्रोफाईल शोधा. स्वतःला शोधता येत नसेल तर ज्या मित्रांना त्या प्रोफाईलवरून रिक्वेस्ट गेली आहे, त्यांच्याकडून सदर फेक प्रोफाइलची फेसबूक लिंक मागवून घ्या.
२) त्या प्रोफाइलवर गेल्यानंतर प्रोफाईल वर उजव्या बाजूला तीन डॉट दिसतील, त्या डॉट वर क्लिक करा.
३) तुमच्यासमोर Find Support Or Report Profile हा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा.
४) Pretending To Be Someone हा पहिला ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा.
पुढे तुम्हाला 3 ऑप्शन दिसतील.
Me, A Friend आणि Celebrity.
५) आपण आपलीच बनवलेली फेक प्रोफाईल रिपोर्ट् करत असल्याने त्यापैकी Me हा ऑप्शन सिलेक्ट करा. आणि नेक्स्ट करा. फेक प्रोफाईल अकाउंट काही वेळाने बंद होईल.
.........................................................
इतरांनी सदरची प्रोफाईल फेक रिपोर्ट करताना, आपल्याला आलेल्या फेक फ्रेंड रिक्वेस्ट वरील अकाउंटवर जावून सेम वरीलप्रमाणेच इंस्ट्रक्शन्स फॉलो करुन तिथे फक्त Me ऐवजी A Friend सिलेक्ट करा.
नेक्स्ट केल्यानंतर नाव टाईप करण्यासाठी तुमच्यापुढे एक बॉक्स येईल. त्या बॉक्स मधे तुमच्या ज्या मित्राची फेक फेसबुक प्रोफाईल बनवली आहे, त्याच नाव तिथे टाईप करा. तिथे तुमच्या मित्राची ओरिजिनल फेसबूक प्रोफाईल येईल, तिला सिलेक्ट करा. रिपोर्ट सेंड करा, फेक प्रोफाईल काही वेळाने बंद होईल....
माहितीस्तव सादर.......
व्हाट्स अँप साभार...
No comments:
Post a Comment