' 'दिव्या' दृष्टीचे रविंद्र जैन!'
रविंद्र जैन यांचा जन्म झाला तेव्हा( 28 फेब्रु 1944) 'बाळाच्या डोळ्यांच्या जागी कातडी' होती...डोळे दिसतच नव्हते.. डॉक्टरनी अॉपरेशन करुन ती त्वचा काढून टाकली तेव्हा कुठे बाळाचे डोळे दिसू लागले...पण 'बाळाच्या डोळ्यांना' मात्र काहीच दिसत नव्हतं... फक्त अंधार! जन्मतः अंधत्व!
![]() |
मोठेपणी हा माणूस संगीत- काव्य- गायन अशा त्रिविध कलांत पारंगत झाला. त्यांच्या या तीन भूमिकांतली 'गीतकार' ही भूमिका सर्वाधिक थक्क करणारी आहे. 'जन्मांध व्यक्तीनं कविता करणं' हे जगावेगळं आहे असं नाही. मानवी भावभावना, नातेसंबंध यावर काव्य करणं तुलनेनं सोपं आहे ... पण जो निसर्ग कधी पाहिलाच नाही त्यावर गीत रचणं.. ते ही कथानकाच्या मागणीनुसार... ही खचितच 'दिव्य' गोष्ट आहे. रविंद्र जैन यांच्या गीतातल्या अशा अनेक ओळी नेहमीच अचंबित करतात... वानगीदाखल काही ओळी पहा...
--- 'खुला खुला गगन ये हरीभरी धरती.. जितना भी देखो तबियत नहीं भरती...'
--- 'चांदीसा चमकता ये नदियाँ का पानी...'
----'हुस्न पहाडोंका क्या कहना के बारों महिने यहाँ मौसम जाडोंका..'
-----'घिर आए मेघ परबतपें बिजुरियाँ चमके..हो गयी दिनमें रात...'
----'नित साँझसवेरे मिलते है.. उन्हें देखके तारे खिलते है...'
----'ऊंचे महलके झरोकेसे तुम अंबर की शोभा निहारो जरा.. रंगोंसे रंगोका मेल ये आँखोंसे दिलमें उतारो जरा...'
रविंद्रजींच्या अन्य गीतांतूनही अशा ब-याच पंक्ती वेचता येतील. त्यांची अतिशय गाजलेली काही गाणी 'डोळ्यांशी' वा 'पाहण्याशी' संबंधित आहेत...
'अखियोंके झरोंकेसें मैंने देखा जो सावरे...'
'दिलमें तुझे बिठाके कर लूंगी मैं बंद आँखे..'
'गोरी तेरा गाँव बडा प्यारा मैं तो गया मारा..'
'ईश्वरनें मेरी आँखोके बजाय मेरे दिमाग को रोशन किया हैं' असं ते म्हणत...खरंच आहे... दोन डोळे हिरावून घेणाऱ्या नियतीनंच प्रतिभेचा हा 'तिसरा डोळा' त्यांना बहाल केला होता.
एका कवी संमेलनात त्यांनी सादर केलेली रचना ऐकून एक मुलगी अगदी भारावून गेली.. तिनं घरी येऊन ती कविता आईला ऐकवली.. आईही रसिक असावी.. ती म्हणाली.."माझी मुलगी मोठी असती तर या कवीबरोबर तिचं लग्नच लावून दिलं असतं!"..हे ऐकून ती मुलगी आतल्या खोलीत गेली आणि 'साडी नेसून' आली.. म्हणाली.."आई, मी मोठी झालीय असं तुला वाटत नाही का?"
याच मुलीनं... 'दिव्या'नं... पुढे रविंद्रजींशी विवाह केला व आयुष्यभर प्रेमाची संगत केली..रविंद्रजी म्हणूनच म्हणत...
"दिव्या मेरी आँखोकी रोशनी है!"
'दिव्या' दृष्टीच्या या कलाकाराला जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
(धनंजय कुरणे)
फेसबुक साभार
No comments:
Post a Comment