प्रस्तावना (लडाख दर्शन )
प्रवासात जे प्रत्यक्ष पाहिले, अनुभवले ते लेखन रूपाने मांडणे म्हणजे प्रवास वर्णन.... असे ढोबळ मानाने म्हणता येईल. सामान्यता वर्णनाची पातळी हकीकतीची किंवा वृत्तांत कथनाची रहाते. देश काळ परिस्थिती यांचे वर्णन, प्रवासातील हाल-अपेष्टा, मौजमजा वगैरे हकीकती वास्तव सांगणे हे प्रवास वर्णनात येत असतं.सुंदर, मनमोहक निसर्गरम्य.. आणि बरच काही. भारताच्या सर्वात उत्तरेकडे लपलेल्या ह्या भूभागा बद्दल बोलताना प्रवास प्रेमींना विशेषणे कमी पडू लागतात. पूर्वी परदेशी लोकांकडून येथे पर्यटन होत होते. आता मात्र हा प्रांत "बॉलिवूड" आणि "सोशल मीडिया" मुळे बहुसंख्य भारतीयांचे पसंतीचे स्थळ बनला आहे.
होय तुम्ही बरोबर ओळखलत... मी अशा ठिकाणाबद्दल बोलत आहे जिथे निसर्गाने स्वतःचे नियम धाब्यावर बसवत एक भूभाग जो हिमालयातील बाकी निसर्गरम्य प्रदेशापेक्षा खूप आगळा वेगळा आहे. त्याला म्हणतात "लडाख"...
अशा ह्या निसर्गरम्य मोहक आणि तितक्याच खडतर प्रवासाची सफर केली ती आमच्या काही वेड्या मित्रांनी... हो वेडेच...कारण स्वतःची गाडी घेऊन, परक्या परदेशाची कोणतेही पूर्वज्ञान नसतांनाची ही सफर केवळ वेडेच करू शकतात....
आजची तरुणाई मौजमजेत पुरती गुंतली असता असे काही तरुण आहेत की ज्यांना काही आव्हानात्मक ''जीवन" जगायचे,काहीतरी वेगळं करायचे असते.अशातले आमचे मित्र श्री दीपक साळवी,श्री.शंकर यादव,श्री.ज्ञानेश्वर भोईर आणि मस्तकलंदार मित्र श्री.मंदार गोसावी हे ते ध्येय वेडे मित्र...एकूण 18 दिवसाच्या थरारक प्रवासानंतर ते घरी आले तोच जोश घेऊन...आणि मग सतत गप्पा सुरु झाल्या.जणू त्यांच्या अनुभवांनी आम्हीच "लडाख" पाहिले.
लेह मधील पॅगँग सरोवर,बर्फ़ाचे वाळवंट,बौद्धमठ, पटणी टॉप,झोजीला पास,0 पॉईंट,कारगिल संग्रहालय,लाईट ऑफ साउंड शो,नदीच्या वाळूचे वाळवंट,जगात सर्वांत उंचीवर रोड असलेलं ठिकाण खार्दुंगला ,चांगला पास इत्यादी ठिकाणं आम्ही एखाद्या चित्रपटाप्रमाने त्यांच्या कथनातून पाहिलं....
आम्ही मित्रांनी हा थरार आणि निसर्ग सौंदर्य शब्दात पकडायचं ठरवलं खरं पण लेखन कसे करणार हे सुचत नव्हते...आणि श्री दीपक साळवी या मित्राने एक एक ओळीत अनुभव लिहायला सुरुवात केली.आणि मी(संजय मराठे) त्या अनुभवांचं संकलन करायला सुरुवात केली...श्री.विजय हिले सर,श्री.आकाराम महाबळ सर,श्री.संजय माळी सर,श्री.प्रदीप राणे सर यांनी व्हॉट अँप च्या माध्यमातून चर्चा करून कधी शाब्दिक कोट्या करून लिखाणाला उभारी दिली...आणि अनुभव शब्दात समर्पक पणे कागदावर झरझर उतरायला लागले...त्या त्या अनुषंगाने फोटो आणि इतर टेक्निकली बाबी समजून घेऊन ही अनुभव गाथा शब्दबद्ध झाली.
हे प्रवास वर्णन कथा ,कादंबरी सारखा वाङमय प्रकार नाही,हे उघड आहे.प्रवासवर्णनात प्रवासवर्णकाराच्या प्रवासामधील अनुभवाचे कथन आहे ते वाचताना कल्पनेने पुन्हा सगळा प्रवास अनुभवावा लागतो तो मी अनुभवला तुम्हालाही तोच आनंद देईल याची शाश्वती आहे ....
*संजय ग.मराठे*
9421973888
No comments:
Post a Comment