बदली

Wednesday, 30 September 2020

आदरणीय ग्रामस्थ मित्र

 आदरणीय ग्रामस्थ मित्र परिवार

नमस्कार,
शाळेला गावाचा आधार असावा आणि गावाला शाळेचा अभिमान वाटावा.ही उक्ती आज रोजी सार्थ झाली.
सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्या शाळेसाठी आपले मित्रग्रुप के.बी.विरा हायस्कुल डोंबिवली बॅच सन 1982-83 यांनी रंगकामासाठी रु 9 हजाराचा निधी गोळा करून दिला आणि आपणास फक्त आपल्या ग्रुप वर आव्हान केले की आपल्याला वेळ असेल तेव्हा रंगकाम करून द्यावे...आणि आपण क्षणाचा विलंब न करता त्या आव्हानाला साद घातली आणि आज मितीला सर्व काम पूर्ण करून दिले .... मनातील भावनेला शब्दात खरंच पकडता येत नाही ... ...खरच शब्द अपूर्ण पडतात...
ज्या ठिकाणी गावाचा आधार शाळेला मिळालेला असतो, त्या गावाचा शैक्षणिक आलेख निश्चितच उंचावलेला असतो. "मंदिर हे गावाचे श्रद्धास्थान आणि शाळा ही गावाची प्रेरणास्थान" असते आणि आज ह्या दोन्ही गोष्टी आपल्या गावात पूर्णत्वाला येत आहेत .
मुलांमध्ये असणाऱ्या नैसर्गिक उर्जेला दिशा देण्याचे काम करण्यासाठी पालक आणि शाळेमध्ये सहकार्यभाव हवे .मुलांच्या सक्षम वाढीसाठी शाळा आणि पालकांमधले *"सुजाण नाते"* जास्त प्रमाणात आवश्यक आहे ...आणि ते आज निदर्शनात येत आहे ... याची प्रचिती म्हणजे रंग कमी पडत असताना उमेश ने 20 लिटर रंग स्वता दिला. मिक्स करण्यासाठी स्टेनर च्या 4 बॉटल सर्व ग्रुप ने उपलब्ध करून दिल्या. काय वर्णन करून लिहावं ...शब्द अपूर्ण आहेत......
मी आज धन्यवाद मानणार नाही कारण धन्यवाद दिले की कृतीला पूर्णविराम दिला अस मी मानतो ..मी कायम आपल्या ऋणात राहू इच्छितो...

मित्रानो ! प्रवास अजून संपला नाही ...

... तूर्तास थांबतो .


श्री. संजय मराठे सर
जि. प. शाळा- शिळ



*विशेष सहकार्य*

1श्री दिनेश बनोटे,
2श्री संतोष बनोटे,
3श्री यशवंत शिंदे,
4श्री भास्कर शिंदे,
5श्री अशोक बनोटे,
6श्री राजेश बनोटे,
7श्री दिलीप कडव,
8श्री सुनील बनोटे,
9श्री भवर शिंदे,
10चि.उमेश कडव,
11श्री केतन शिंदे,
12चि विवेक बडेकर,
13 चि कैलास शिंदे,
14 श्री किरण शिंदे,
15 श्री प्रमोद बनोटे,
16चि.भावेश शिंदे
*समस्त तरुण मंडळ शिळ*

No comments:

Post a Comment

करिअर निवडतांना.....

 करिअर निवडतांना..... नुकत्याच दहावी-बारावी च्या परीक्षा झाल्या.अनेक विद्यार्थ्यांनी आपले पेपर झाले म्हणून सुटकेचा निःश्वास टाकला. पण ही सुट...