✍️ माणसाचे चार चेहरे असतात एक जो आपल्या परिवाराला दाखवतो दुसरा आपल्या मित्रांना दाखवतो तिसरा जगाला दाखवतो आणि चौथा त्याला स्वतःला माहिती असतो तो कसा आहे तो जोपर्यंत सोबत आहात तोपर्यंत एकमेकांना समजुन घेत चला जर दूर झाले तर आठवणींशीवाय शेवटी काहीच उरत नाही स्वभाव असा ठेवायचा की आपल्या सहवासाची जाणीव नाही झाली तरी चालेल पण दुराव्यात मात्र आपली उणीव भासलीच पाहिजे माणुस कितीही आपल्या बुध्दीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असला तरी नियतीने ठरवलेला शेवट आणि नियतीने मांडलेला डाव हा त्याला स्विकारावाच लागतो माणुस मनापर्यंत पोहोचला तरच नातं निर्माण होतं नाहीतर ती फक्त ओळखच ठरते असे जगा की आपली उपस्थिती कुणाला जाणवली नाही तरी चालेल पण आपल्या अनुपस्थितीची उणीव जाणवली पाहिजे आयुष्यात संगतीला फार महत्व आहे कारण यश नेहमी चांगल्या विचारातुन येते आणि विचार सोबतच्या व्यक्तींमधुन येतात कोणालाही न दुखवता जगणे याच्या इतके अतिसुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवायची गरज राहत नाही कामासाठी वेळ द्या कारण ती यशाची किंमत आहे विचार करण्यासाठी वेळ द्या कारण ते शक्तीचे उगमस्थान आहे खेळण्यासाठी वेळ द्या कारण ते तारुण्याचे गुपित आहे वाचनासाठी वेळ द्या कारण तो ज्ञानाचा पाया आहे स्वत:साठी वेळ द्या कारण आपण आहोत तर जग आहे आणि अतिशय महत्वाचे दुसर्यांसाठी वेळ द्या कारण ते नसतील तर आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही माणसाने आपले कर्म चांगले ठेवावे.कुणी पाहत नाही असा अर्थ काढु नये जेव्हा नियती त्याचा हिशोब करते तेव्हा तिथे कोणाचाही वशिला चालत नाही पश्चात्ताप कधीच भूतकाळ बदलू शकत नाही आणि काळजी' कधीच भविष्याला आकार देऊ शकत नाही म्हणूनच वर्तमानाचा आनंद घेणे हेच जीवनाचे खरे सुख आहे भावना कळायला मन लागतं वेदना कळायला जाणीव लागते देव कळायला श्रद्धा लागते माणूस कळायला माणुसकी लागते चांगलं जगायला सुंदर विचार लागतात आणि भरभरून जगण्यासाठी पैसा नाही तर सुखी समाधानी निरामय आयुष्य लागतं माणसाने माणसावर टाकलेला विश्वास जेव्हा तुटला तेव्हा दरवाज्याचा जन्म झाला.
त्या विश्वासावर देखील आघात झाला तेव्हा कुलूपाचा जन्म झालाआणि कोणाचाच कोणावर विश्वास राहिला नाही तेव्हा मात्र सीसीटीव्ही चा जन्म झाला.✍️
विचारधन
(व्हॉट अँप साभार)
No comments:
Post a Comment