वेडे व्हा...
असं म्हणतात 'वेडी माणसंच इतिहास घडवितात'."वेडे व्हा" हा साथी एस. एम. जोशींचा मंत्रच खूप काही सांगून जातो.आपण करत असलेल्या कामात एवढं समरस व्हा की लोकांनी आपल्याला वेडं म्हटलं पाहिजे.समाजपोयोगी काम करत असतांना ,उद्दिष्ट्य साध्याकडे जात असतांना साधने उत्तम निवडावीत. जीवनात साधन सुचितेला फार महत्व आहे....आपल्या साध्याकडे जात असतांना अपयश येत असतं, परंतू एखादया कामासाठी वेडी झालेली माणसं अपयशाला फारसं मोजत नाही. काहीतरी वेगळं, दिव्य भव्य,विस्मयकारक,अलौकिक करायला वेडेपणचं लागतं.आणि हेच वेडेपण आपल्याला पूर्णत्वाकडे नेतं.....म्हणून आपल्या वेडेपणालाच आपलं ध्येय बनवा.
प्रत्येकानं आपलं सामाजिक दायित्व ओळखून काम केले पाहिजे. केलेल्या कामाची सर्वच ठिकाणी जाहिरात करायची नसते. आपण करतो ती सेवा आहे हे आपण आधी लक्षात ठेवलं पाहिजे. नुसते प्रत्येक गोष्टीचे फोटो टाकून- दोन ओळी लिहून मोठं होता येत नाही.असं केल्यामुळे उलट समाजामध्ये आपली प्रतिमा मलिन होत असते.समाजाला जेवढं आपण निद्रिस्त समजतो तेवढा समाज बिलकुल निद्रिस्त नसतो....आपण मात्र आपल्या कोशात जगत असतो.केवळ डबकं करून घेतो जीवनाचं....
जेवढं आपण प्रसिद्धीच्या मागे धावतो तेवढी प्रसिद्धी आपल्यापासून दूर जाते.आपल्याला पाहिजे म्हणून प्रसिद्धी मिळत नसते....त्यासाठी आपण वेगवेगळ्या अँगलने फोटो काढले, व्हाट्सअप आणि फेसबूकच्या विद्यापीठात ते फोटो टाकले तरी आपल्याला किती महत्व दयायचं ते लोक ठरवतात....
आपण आपलं काम सातत्याने करत राहिलो तर एक दिवस आपोआप आपण इतरांच्या मनावर राज्य करू...आपण कधीही आपल्या तत्वाशी आणि आदर्शाशी तडजोड करता कामा नये.जे चांगलं आहे ते चांगलं आणि वाईट आहे ते वाईट हे स्पष्टपणे बोलता आलं पाहिजे.तेव्हाच आपल्या शब्दाला महत्व प्राप्त होत....दुसर्याच्या मतानुसार आपली मतं ठरविणे किंवा पूर्वग्रह दूषित ठेऊन वागणे हे आपल्या अस्तित्वाला धोक्याचं आहे.समोरील व्यक्ती किती "आपला" आणि किती "आतला" हे वेळीच ओळखलं नाही तर आपल्या अस्तित्वाचा अस्त जवळ आहे हे आपण जाणलं पाहिजे.
समाजामध्ये काम करत असतांना आपलं काम जर समाज हिताचे असेल तर कोणाच्याही दबावाच्या पुढे झुकायचे नसते.अंतर्मनाचा आवाज ऐकून आपलं काम सातत्याने चालू ठेवा.असं केल्यामुळे कामाची "गती" आणि "कृती" दोन्ही सफल होत असतात.कालांतराने आपल्या कामाला प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष विरोध करणारे आपले पुरस्कर्ते होतात...थोडासा संयम आपण ठेवला पाहिजे.आपलं काम समाज हिताचं आणि प्रयत्न प्रामाणिक असतील तर जास्त दिवस आपल्याला त्याची प्रतीक्षा करावी लागत नाही...यश आपल्या जवळ येऊन पोहचतं.
समाजाच्या कल्याणासाठी काम करत असतांना आपल्याला वेगवेगळ्या पातळीवरील - वेगवेगळ्या कक्षा ओलांडून काम करावं लागेल.तरच आपल्या कामाच वेगळेपण दिसून येईल आणि 'कामाचं' पर्यायाने 'आपलं' अस्तित्व टिकून राहील....आणि समाजाच्या हृदयात आपलं स्थान पक्क होईल यात शंका नाही.आणि म्हणूनच समाजात काम करत असतांना आपले डोळे आणि विचार हे खुले असले पाहिजे.डोळसपणे अवती- भवती सामाजिक जाणिव ठेऊन काम पुढे नेले पाहिजे.तेव्हा एक आदर्श विचारातून आदर्श काम उभं राहतं....आणि जीवनाला सकारात्मक दिशा मिळत असते.
संजय ग. मराठे
वेल्हाणे, धुळे
उल्हासनगर 4
9421973888

सध्या चा काळ हा शो बिझनेसचा झाला आहे. जो दिखता है वह बिकता है हेच सर्वत्र झाले आहे. आपण काय करतोय हे दाखवायची घोड दोड चालू आहे. खरंच तर सर्वत्र पाणी गढूळ झाले आहे त्याला बदलायची गरज आहे
ReplyDeleteअगदी बरोबर सर
ReplyDeleteखूप छान लेख सर
ReplyDelete