बदली

Sunday, 1 November 2020

स्त्री रत्ने

 स्त्री रत्ने


1.राजमाता जिजाबाई


जन्म-

मृत्यू- जून 1674

स्वताच्या कर्तृत्वाने अगर थोर पती मिळाल्याने ज्यांचे आयुष्य किर्तीमंत ठरले अशा नामवंत स्त्रिया पुष्कळ आहेत.पण मुलगा अत्यंत थोर व कर्तबगार निपजल्यामुळे जिच्या मातृत्वाची कीर्ती चहूकडे वर्षानुवर्षे गाजत राहिली अशी भाग्यवती राजमाता जिजाबाई श्री. शिवछत्रपतींची माता.जिजाबाई ह्या सरदार लखुजी जाधवराव यांच्या कन्या.जिजाबाईंच्या आयुष्यातली एकाच एक इच्छा "आपलं मराठयांच स्वतंत्र राज्य व्हावं" ती तींच्या अलौकिक पुत्रानं पूर्ण केली.माता कशी असावी याचा एक उच्च आदर्शच त्यांनी आपल्या जीवनात निर्माण केला यात संदेह नाही.


2.अहिल्याबाई होळकर


जन्म- इ.स. 1725

मृत्यू - इ.स. 1775

नाव- न्या.अहिल्याबाई खंडेराव होळकर

       किर्तीमंत महाराष्ट्राच्या इतिहासात ज्या शौर्यवान स्त्रिया होऊन गेल्या.त्यामध्ये अहिल्याबाई होळकर ह्या कायम चमकून दिसतात.माणकोजी शिंदे या धनगर जातीच्या कुटुंबात जन्मास आलेल्या अहिल्याबाई लहानपणापासूनच धैर्यवान व धाडसी वृत्तीच्या होत्या.त्याचे अवघ्या आठव्या वर्षी खंडेरावांशी लग्न झाले.त्या व्यवहारचतुर व स्वाभिमानी होत्या.गुणसंपन्न अहिल्याबाई पुढे फौजेवर जाऊ लागल्या.



3. झाशीची राणी

  

जन्म -19 नोव्हेंबर 1835

मृत्यू -18 ऑगष्ट 1858

नाव - लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर

        कर्तृत्ववान स्त्रियांच्या पराक्रमाच्या शौर्यगाथा मोजक्याच आपल्या नजरेसमोर येतात.त्यांमध्ये धाडसी झाशीची राणी लक्ष्मीबाई हिचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते.खरेतर नियतीने तींच्या आयुष्यात असाधारण पराक्रमी कर्तृत्वाचा अमूल्य ठेवा बहाल केला होता.त्यांचा झाशीची राजे गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी विवाह झाला.पुत्र होऊन वारल्यानंतर दामोदर नावाच्या मुलास दत्तक घेऊन गाडीचा वारसा तयार केला.



4.कस्तुरबा गांधी

जन्म- 1869

मृत्यू - 1944

नाव - कस्तुरबा गांधी

          महात्मा गांधींना भारताचे राष्ट्रपिता म्हणून सर्व लोक ओळखतात.त्यांच्या पत्नी कस्तुरबा.केवळ गांधीजींच्या पत्नी म्हणून त्यांना मान मिळाला नाही.तो मान त्यांना त्यांच्या जनसेवेमुळे मिळाला."बा" म्हणजे गुजराथी भाषेत "आई"असा अर्थ होतो.कस्तुरबांनी महिलांकरिता बरेच कार्य केले.राजकीय चळवळींमध्ये तुरुंगवास भोगला.स्वाभिमानी कस्तुरबा गांधीजींच्या देशभक्तीने भारावून गेल्या.द.आफ्रिकेतील महिलांवरील अन्याय दूर होण्यासाठी त्या स्वताहून पुढे आल्या.त्यांना अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला.


5.सरोजिनी नायडू

जन्म- 3 फेब्रुवारी 1879 हैदराबाद

मृत्यू-  3 मार्च 1949

नाव-  सरोजिनी नायडू

        भारतीय स्वातंत्र्य युध्दात ज्या महान स्त्रियांनी आपले संपूर्ण आयुष्य देशसेवेला वाहिले ,त्यात सरोजिनी नायडू या प्रथमपासूनच स्वातंत्र्य संग्रामात अग्रभागी होत्या.सुसंस्कृत व विद्वान कुटुंबात जन्माला आलेल्या सरोजिनी नायडू बालपणापासून कुशाग्र बुद्धीच्या होत्या.काव्यलेखनाचे वेड,सुंदर शब्दरचना आणि कल्पनेची उंच भरारी घेत त्यांच्या कवितेमध्ये देशाभिमान आणि मानव जातीची तळमळ होती.म्हणून त्यांना "भारताचे बुलबुल" अशी पदवी देण्यात आली.


6. सावित्रीबाई फुले

जन्म - 3 जानेवारी 1831 नायगाव,सातारा

मृत्यू - 10 मार्च 1897

नाव - सावित्रीबाई जोतिराव फुले

        भारतीय स्त्रीशिक्षणाच्या जन्मदात्या म्हणून ज्यांची ख्याती अजरामर आहे.अशा थोर सावित्रीबाई फुले यांचे नाव महाराष्ट्रीयन माणूस कधीच विसरणार नाही.ज्या काळात स्त्रियांनी घराबाहेर पडणे पाप समजले जात होते अशा काळात जोतिराव फुले यांनी स्त्री शिक्षणाचा विडा उचलला व त्यांच्या महान कार्याला खांद्याला खांदा लावून सावित्रीबाई कामाला लागल्या.सावित्रीबाईंनी प्रथम स्वता शिक्षण घेतले व मुलींना शिकवू लागल्या.रूढी परंपरागत समजुतीने ग्रासलेल्या समाजाकडून अनेक अपमान व शिव्या शाप सोसून प्रसंगी दगड,शेणफेक यांचा मारा सहन करून सुद्धा त्यांनी माघार घेतली नाही.


7.मादाम कामा

जन्म- 24 सप्टेंबर 1861

मृत्यू- 19 ऑगस्ट 1936


नाव-श्रीमती भिकाबाई रुस्तूम कामा

        भारतीय स्वातंत्र्यासाठी ज्यांनी स्वताच जीवन पूर्णपणे समर्पित केलं त्या भिकाबाई यांचा जन्म मुंबईतील एका सुखवस्तू पारसी कुटुंबात झाला.मुंबईत प्लेग ने धुमाकूळ घातला असतांना पतीची संमती नसताना साथीत सापडलेल्या रुग्णांची एवढी सेवा केली की त्यांना स्वतालाही रोगाची लागण झाली.उपचारासाठी त्या इंग्लंडला गेल्या.तेथेच सावरकरांशी त्यांचा परिचय झाला.ब्रिटिश सरकारने भारतात चालवलेल्या अन्याय,अत्याचार व पिळवणूक यावर त्या लंडनमध्ये ठिकठिकाणी  भाषणे देऊ लागल्या.जर्मनीत स्तूटगार्ड येथे आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेला त्या भारतीय  क्रातिकारकांच्या प्रतिनिधी म्हणून त्यांनी  राष्ट्रध्वज फडकवला.भारताला स्वातंत्र देण्याबाबतचा ठराव मंजूर करून घेतला.


8.अरुणा असफअली

जन्म- 16 जुलै 1909 

मृत्यू-  29 जुलै 1996

 


       1942 मध्ये महात्मा गांधीजींनी गोवालिया टॅंक मैदानावरून ब्रिटिश साम्राज्यशाही विरुद्ध "भारत छोडो" आंदोलनाचा पुकार करताच,अवती भवती असलेल्या पोलिसांची पर्वा न करता हातात तिरंगा घेऊन "भारत छोडो" च्या गगनभेदी गर्जना करणाऱ्या व आपलं पुढचं सर्व आयुष्य देशासाठी खर्च करणाऱ्या अरुणा असफअलींचा जन्म बंगाल मधील काल्क या गावी एका कर्मठ कुटुंबात झाला.त्यांचं मूळ नाव अरुणा गांगुली.1930 ते 1941 या कालखंडात अटक,कारावास व सुटका या गोष्टी सतत चालू होत्या.1956 मध्ये त्या दिल्लीच्या पहिल्या स्त्री महापौर झाल्या.त्यांना अनेक पुरस्कार मिळालेत.



9. इंदिरा गांधी

जन्म- 19 नोव्हेंबर 1917

मृत्यू-  31 ऑक्टोबर 1984


नाव :- इंदिरा गांधी

          स्वतंत्र्य भारताच्या पहिल्या स्त्री पंतप्रधान इंदिरा गांधी या पं. नेहरूंच्या कन्या.पंडित जवाहरलाल नेहरूंच्या राजकीय कारकिर्दीत लहान इंदिराजी सूक्ष्म निरीक्षण करीत असत.पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीत त्यांनी दारिद्रय व परकीय संबंध यांमध्ये जातीने लक्ष घालून,योजनाबद्ध कार्यक्रम आखून गोरगरीब शेतकरी वर्गाला मायेचा हात दिला.पाकिस्थानच्या कुटीलकारवायांवर प्रसंगावधान बाळगून यशस्वी मात केली. 31ऑक्टोबर 1984 रोजी इंदिरा गांधींची हत्या क्रूरपणे झाली यासारखे दुर्दैव ते कोणते?


10 . मदर तेरेसा -आई

जन्म- 27 ऑगस्ट 1910

मृत्यू- 1997

 

नाव:-अग्रेस गोंक्झा बोजाक्झिऊ

       सध्याच्या काळातील एक थोर समाजसेविका.कलकत्त्याच्या मोती झील या बकाल वस्तीत 1948 मध्ये त्यांनी गरीब मुलांसाठी पहिली आरोग्य शाळा सुरू केली.पुढे 1952 मध्ये रुग्णांच्या सेवेसाठी "निर्मल हृदय" ही संस्था सुरू केली.भारतात 1965 मध्ये "शांतिसागर" ही कुष्ठरोग्यांची वसाहत उभी केली.तर 1976 मध्ये "आशादान" या संस्थेची स्थापना केली. त्यांना भारत सरकारने प्रथम  "पद्दमश्री", नंतर "भारतरत्न" हा सर्वोच्च बहुमान देऊन त्यांच्या महान कार्याचा गौरव केला.त्यांना 1979 मध्ये "नोबेल शांतता पारितोषिक" मिळाले.


11.लता मंगेशकर

जन्म-28 सप्टेंबर 1920


नाव:- लता दीनानाथ मंगेशकर

        भारतातील एक गायिका आहेत. त्या भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक आहेत. हिंदी संगीतविश्वात त्यांना 'लता दीदी' म्हणून ओळखले जाते. लता मंगेशकरांच्या कारकिर्दीची सुरुवात इ.स. १९४२ मध्ये झाली आणि ती कारकीर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून आहे. त्यांनी ९८० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, विसाहून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये (प्रामुख्याने मराठी) गायन केले आहे. लता मंगेशकरांचे कुटुंब संगीतासाठी प्रसिद्ध असून, सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत. लता मंगेशकरांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य-संगीताचे प्रसिद्ध गायक होते.लता मंगेशकराना भारतीय कोकिळा (Indian Nightingale) म्हणतात



12 किरण बेदी

जन्म:- 9 जून 1949

अमृतसर


      या भारतातील पहिल्या आयपीएस (अखिल भारतीय इंडियन पोलीस सर्व्हिससाठीच्या परीक्षेतून आलेल्या) अधिकारी आहेत. मसूरी येथील राष्ट्रीय अकादमीमध्ये पोलीस ट्रेनिंगमध्ये ८० पुरुष तुकडीतील त्या एकमेव महिला होत्या.किरण बेदी यांनी उत्तर दिल्लीच्या डीसीपी असताना ड्रग्जचा दुरूपयोग करण्याऱ्यांविरुद्धच्या मोहिमेची सुरुवात केली. ही मोहीम पुढे नवज्योती दिल्ली पोलीस फाऊंडेशन (२००७मध्ये हिचे नाव नवज्योती इंडिया फाऊंडेशन म्हणून बदलले)मध्ये विकसित झाली. २००३मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव म्हणून पोलीस सल्लागार म्हणून बेदींनी काम केले. शांतता ऑपरेशनचा या सामाजिक कार्यक्रम आणि लेखन यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांनी २००७मध्ये पोलीस खात्याचा राजीनामा दिला. किरण बेदी यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत.

No comments:

Post a Comment

करिअर निवडतांना.....

 करिअर निवडतांना..... नुकत्याच दहावी-बारावी च्या परीक्षा झाल्या.अनेक विद्यार्थ्यांनी आपले पेपर झाले म्हणून सुटकेचा निःश्वास टाकला. पण ही सुट...