शिक्षकांचे बदली पोर्टल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.👍
✳️ जिल्हातंर्गत बदली प्रक्रिया अपडेट
दिनांक 18 जानेवारी 2023
✳️ बदली प्रक्रियेमध्ये यानंतरचा टप्पा?
➡️ जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हातंर्गत बदल्या बाबत दिनांक 20 डिसेंबर 2022 रोजी पुन्हा एकदा ग्रामविकास विभागाने शासन निर्णय निर्गमित करून बदल्यांचे नवीन वेळापत्रक जाहीर केले होते ते पुढील प्रमाणे.
➡️ या अगोदरच्या वेळापत्रकानुसार दिनांक 19 जानेवारी 2023 रोजी संवर्ग तीन म्हणजेच बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्या पोर्टलवर पूर्ण करणार आहे
➡️ दिनांक 20 जानेवारी 2023 ला बदली पोर्टलवर बदली अधिकार पात्र शिक्षकांच्या बदल्याची यादी व पोर्टलवर आपली बदली कुठे झालेली आहे हे समजेल
➡️ 20 जानेवारी 2023 रोजीच मुख्य कार्यकारी अधिकारी रिक्त पदांच्या याद्या पुन्हा प्रकाशित करतील.
➡️ बदली पात्र शिक्षकांना प्राधान्यक्रम भरण्यासाठी दिनांक 21 जानेवारी 2023 ते 24 जानेवारी 2023 दरम्यान आपला शाळांचा प्राधान्यक्रम भरण्यासाठी पोर्टल उपलब्ध होईल.
➡️ सदर वेळापत्रकानुसार बदली प्रक्रिया पार पडली असता दिनांक 18 फेब्रुवारी 2023 रोजी सर्व संवर्गातील बदली झालेल्या शिक्षकांचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी उपलब्ध करून देऊ शकतात
✳️ बदली पात्र शिक्षक महत्वाचे मुद्दे
➡️ बदली पात्र शिक्षकांच्या बदल्या ह्या त्यांच्या जिल्ह्यातील एकूण सेवाजेष्ठतेनुसार करण्यात येतील
➡️ ज्या शिक्षकांना कार्यरत शाळेवर सर्वसाधारण क्षेत्रात सलग पाच वर्ष व कार्यरत क्षेत्रामध्ये दहा वर्ष पूर्ण होत असतील तर अशा सर्व शिक्षकांचा समावेश बदली पात्र शिक्षाकांमध्ये करण्यात येतो
➡️ बदली पात्र शिक्षकांना प्राधान्यक्रम भरण्यासाठी दिनांक 21 जानेवारी 2023 ते 24 जानेवारी 2023 दरम्यान आपला शाळांचा प्राधान्यक्रम भरण्यासाठी पोर्टल उपलब्ध होईल.*दिलेल्या मुदतीत फॉर्म सबमिट करुन काही चुका झाल्यास किंवा प्राधान्यक्रम बदलायचा असल्यास पुन्हा Withdraw करु शकता.मुदत संपण्यापूर्वी फॉर्म सबमिट झालेला असेल तरच तुमचे पसंतीक्रम विचारात घेतले जातील.
➡️ बदली पात्र शिक्षकांना बदली पात्र शिक्षकांच्या संभाव्य रिक्त जागा व रिक्त जागा पोर्टलवर प्राधान्यक्रम भरण्यास दिसणार आहेत.
➡️ बदली पात्र शिक्षकांनी पोर्टलवर प्राधान्यक्रम न भरल्यास जिल्ह्यातील उपलब्ध होणाऱ्या पदांवर त्यांना बदलीने नियुक्ती दिली जाईल
➡️ बदली पात्र शिक्षकांनी पसंतीक्रम देतांना पोर्टलवर 30 शाळांपेक्षा जास्त शाळा उपलब्ध असल्यास 30 शाळांचा पसंतीक्रम देणे अनिवार्य राहील अथवा जेवढ्या शाळा शिल्लक आहेत तेवढा पसंती क्रम देणे अनिवार्य राहील अन्यथा शक्यतोवर आपला फार्म सबमिट होणार नाही
➡️ परंतु ज्या शिक्षकांना अवघड क्षेत्रातील शाळेवर सलग पाच वर्ष व अवघड क्षेत्रातच दहा वर्ष सेवा पूर्ण झालेली असेल तरीसुद्धा अशा शिक्षकांना बदली पात्र टप्प्यामध्ये पसंतीक्रम देता येणार नाही कारण अवघड क्षेत्रातील शिक्षक हे शासन निर्णय 7 एप्रिल 2021 नुसार बदली पात्र ठरवता येत नाही
➡️ बदली पात्र शिक्षकांना प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध झाल्यास कोणत्याही यादीमध्ये शाळांची शोधाशोध करण्याची गरज नाही.बदली पात्र शिक्षकांच्या पोर्टलवर दिसणाऱ्या सर्व शाळा ह्या बदली पात्र शिक्षकांकरिता उपलब्ध केलेल्या आहेत बदली पात्र यादी किंवा रिक्त पदांच्या यादीतील काही शाळा पोर्टलवर दिसत नसतील तर ते समानीकरणातंर्गत अथवा अन्य कारणांनी आपल्या पोर्टलवरून वगळण्यात आले आहेत असे समजावे
➡️ बदली पात्र शिक्षकांना प्राधान्यक्रम भरण्याकरिता चार दिवस दिलेल्या आहेत त्याकरिता प्राधान्यक्रम भरण्याची घाई करू नये
➡️ या बदली प्रक्रियेमध्ये जे शिक्षक कोणत्याही संवर्गातील बदली पात्र शिक्षक असोत अशा शिक्षकांनी बदली घेतांना आपणास पोर्टलवर सर्वसाधारण क्षेत्रातील आपली सेवाजेष्ठता आपण दिलेल्या प्राधान्यक्रम तसेच आपणास उपलब्ध असलेल्या जागांचा योग्य तो अभ्यासकरून बदलीसाठी प्राधान्यक्रम देतांना निर्णय घ्यावा कारण बदली पात्र शिक्षकांना बदली पात्र शिक्षकांच्या संभाव्य रिक्त शाळा व जिल्ह्यातील रिक्त शाळाच प्राधान्यक्रमात द्यावयाचा आहे अशावेळी संभाव्य रिक्त शाळा या सर्वसाधारण क्षेत्राबरोबरच अवघड क्षेत्रात जास्त प्रमाणात असू शकतात
➡️ बदली पात्र शिक्षकांना बदली पात्र टप्प्यामध्ये बदली न मिळाल्यास त्यांना विस्थापित व्हावे लागेल व पुन्हा विस्थापित टप्प्यामध्ये प्राधान्यक्रम भरावा लागेल अशा वेळी बदली पात्र टप्प्यामधील शाळांपेक्षा निश्चितच विस्थापित टप्प्यामधील शाळा ह्या आपल्या गैरसोईच्या असतील
➡️ सर्वसाधारण क्षेत्रातील विशेष संवर्ग भाग एक मधील शिक्षक ज्यांनी सर्वसाधारण क्षेत्रात सलग सेवा दहा वर्ष पूर्ण केलेली आहे व कार्यरत शाळेमध्ये पाच वर्षे झालेले आहेत त्यांनी बदलीस होकार दिला असेल तर त्यांच्या पसंतीक्रमाने त्यांना संवर्ग एकच्या टप्प्यात बदली मिळाली असेलच परंतु त्यांच्या पसंती क्रमाने शाळा न मिळाल्यास पुन्हा त्यांना बदली पात्र बदली टप्प्यामध्ये पसंती क्रम भरण्यास संधी मिळेल
➡️ पती-पत्नी दोघेही जिल्हा परिषद शिक्षक असतील व त्यांच्या कार्यालयातील अंतर 30 किलोमीटर पेक्षा जास्त असेल त्यापैकी एकाने आपल्या जोडीदाराजवळ जाण्यासाठी पती-पत्नी एकत्रीकरण अंतर्गत अर्ज केला असेल व कदाचित त्या शिक्षकाला पती-पत्नी अंतर्गत बदली मिळाली नसेल अशा परिस्थितीत आपला जोडीदार बदलीस पात्र असेल तर जोडीदाराची बदली पात्र बदली टप्प्यामध्ये पसंती क्रम भरण्याची संधी मिळेल व त्यांची बदली होईल
➡️ पती-पत्नी दोघेही जिल्हा परिषद शिक्षक असतील व त्यांच्या कार्यालयातील अंतर 30 किलोमीटरच्या आत असेल तर असे शिक्षक फक्त बदली पात्र शिक्षक बदली टप्प्यामध्ये एक युनिटचा लाभ घेऊ शकतात त्यापैकी एका बदली पात्र शिक्षकाने बदली पात्र टप्प्यांमध्ये पसंती क्रम देत असताना जर आपल्याला आपल्या जोडीदाराला सुद्धा सोबत बदलीने घ्यायचे असल्यास आपल्या जोडीदार शिक्षकाला शाळेवर तीन वर्ष झालेले असेल तर त्यांना सुद्धा एक युनिटचा लाभ घेऊन दोघांनाही बदली पात्र टप्प्यामध्ये पसंती क्रम भरून एक युनिट चा लाभ घेऊ शकतात अशी सुविधा पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे
➡️ पती-पत्नी दोघांनाही एक युनिट म्हणून बदली पात्र शिक्षकांच्या टप्प्यामध्येच लाभ घेऊ शकता परंतु या टप्प्यामध्ये जर दोघांनाही 30 किलोमीटरच्या परिसरात शाळा मिळाल्या नाही तर ते शिक्षक विस्थापित होऊन रँडम राऊंड मध्ये गेल्यानंतर त्यांना एक युनिटचा लाभ घेता येणार नाही अशा शिक्षकांना बदली देताना 30 किलो मीटरच्या परिसरात शाळा देणे बंधनकारक राहणार नाही त्यामुळे एक युनिटचा लाभ घेताना वरील बाबीचा विचार करावा
➡️ बदली पात्र बदली टप्प्यामध्ये एक युनिट म्हणून दोन समान लिंग असणाऱ्या व्यक्ती एक युनिटचा लाभ घेऊ शकणार नाही
➡️ प्राधान्यक्रम भरताना बदली पात्र शिक्षकांनी खालील लिंकला क्लिक करावे
https://ott.mahardd.in/
वरील लिंकला क्लिक केल्यानंतर आपला मोबाईल नंबर व आपल्या मेसेज बॉक्समध्ये आलेला OTP टाकावा त्याखालील कॅप्च्या टाकून पोर्टल लॉगिन करावे
➡️ सदर पोस्ट आपण इतर ग्रुप वर व मित्रमंडळ फॉरवर्ड करावी जेणेकरून त्यांनाही फायदा होईल
➡️ सदर ही पोस्ट विन्सिन कंपनीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार व जीआर च्या आधारे तयार केलेली आहे या मताशी आपण सहमत असालच असं सांगता येणार नाही
याबद्दल कोणतीही शंका असल्यास आपण मला सरळ कॉल करू शकता
धन्यवाद
*******************************************
Phase-3 जिल्हांतर्गत बदली
मा.अवर सचिव,ग्रामविकास यांच्या दि.18.11.2022 च्या सुधारित वेळापत्रकानुसार Phase-3 जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया ही एकूण 28 टप्प्यांमध्ये राबविली जाणार आहे.
सध्या सुरू असलेले टप्पे-
📌 टप्पा क्र.1-रिक्त पदांची यादी अद्ययावत करणे-
●जबाबदार यंत्रणा-मुख्य कार्यकारी अधिकारी.
●कालावधी-दि.18.11.2022 ते 18.11.2022.
📌 टप्पा क्र.2-विशेष संवर्ग भाग-1 व विशेष संवर्ग भाग-2 चे फॉर्म भरणे.
●जबाबदार यंत्रणा-शिक्षक.
●कालावधी-दि.18.11.2022 ते 21.11.2022
या टप्प्यात विशेष संवर्ग 1 व 2 च्या शिक्षकांनी आपापली सेवाविषयक माहिती व बदली पाहिजे किंवा नको एव्हढीच माहिती म्हणजेच बदलीसाठी होकार किंवा नकार भरायचा आहे.प्रशासनाकडून अर्जाची पडताळणी झाल्यानंतर व आपला अर्ज पात्र ठरल्यानंतर 30 शाळांचे प्राधान्यक्रम विशेष संवर्ग 1 साठी सुधारित वेळापत्रकाच्या 10 व्या टप्प्यात आणि विशेष संवर्ग 2 साठी 13 व्या टप्प्यात भरावयाचे आहेत.
फॉर्म कोणी भरावे..?
■■ विशेष संवर्ग भाग-1■■
●जिल्हा परिषदेने जाहीर केलेल्या बदलीपात्र शिक्षकांच्या यादीतील विशेष संवर्ग-1 च्या ज्या शिक्षकांना बदली हवी आहे, त्यांनी बदलीसाठी होकाराचा फॉर्म भरावा.ज्यांना बदली नको आहे, त्यांनी बदलीतून सूट मिळण्यासाठी नकाराचा फॉर्म भरावा.
●जे शिक्षक वरील बदलीपात्र यादीत नाहीत,परंतु दिनांक 07.04.2021 च्या शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक 1.8.1 ते 1.8.20 नुसार विशेष संवर्ग 1 साठी पात्र आहेत,त्यांना बदली हवी असेल तर त्यांनी होकाराचा फॉर्म भरावा.
●संवर्ग 1 साठी सेवेची अट नाही,मात्र एकदा संवर्ग 1 मधून बदली झाल्यानंतर त्यांना पुन्हा 3 वर्षे विनंती बदली मागता येणार नाही.(G.R. मुद्दा क्र.4.2.7)
📢 विशेष संवर्ग भाग-1 साठी महत्वाच्या बाबी-
1.विशेष संवर्ग 1 शिक्षकांना बदलीसाठी दोनच मार्ग उपलब्ध असतील.
●एक-बदलीतून सूट मागणे (नकार देणे)
●दोन-बदलीपात्र शिक्षकांना खो देणे.
●संवर्ग 1 मधील शिक्षकांना निव्वळ रिक्त पदांवर (Clear Vacancy) बदली मागता येणार नाही. (G.R. मुद्दा क्र.4.2.6) ही तरतूद बदली अभ्यास गटाने विशिष्ट हेतू समोर ठेवून केली आहे.
●विशेष संवर्ग 1 मधील शिक्षकांनी मिळालेल्या अधिकाराचा वापर करताना योग्य ती काळजी घ्यावी. बदलीतून सूट घेणे म्हणजेच बदलीसाठी नकार देणे हा सुद्धा विशेष संवर्ग 1 अंतर्गत घेतलेला "लाभच" आहे याची जाणीव ठेवावी.
●बदलीसाठी नकार देणारा बदलीपात्र विशेष संवर्ग 1 मधील शिक्षक हा जोपर्यंत त्याची बदली होणार नाही, तोपर्यंत दरवर्षी बदलीपात्रच राहणार आहे. अशा शिक्षकांना दरवर्षी बदली प्रक्रियेत भाग घ्यावा लागणार आहे.
2.विशेष संवर्ग भाग 1 मधून फॉर्म भरणाऱ्या 1.8.1 ते 1.8.20 मधील शिक्षकांना आपापल्या संवर्गानुसार सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे अनिवार्य आहे. सदरच्या अर्जाच्या पात्रतेबाबत संबंधित तालुक्याचे गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांची समिती निर्णय घेईल. (G.R. मुद्दा क्.4.2.8)
●पडताळणीमध्ये अर्ज अपात्र ठरला तर संबंधित शिक्षकांचा अर्ज CEO लॉगिन वरून रद्द केला जाईल व चुकीची माहिती भरल्याबद्दल एक वेतनवाढ कायमस्वरूपी बंद करण्यात येईल. (शासन निर्णय दि. 28.06.2018 व उपसचिव ग्रामविकास यांचे पत्र दि.11.08.2022)
3.विशेष संवर्ग 1 मधून बदली झालेल्या शिक्षकांबद्दल बदलीनंतर तक्रार प्राप्त झाल्यास,त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून करण्यात येईल. अशी पडताळणी केल्यानंतर शिक्षकाने जाणीवपूर्वक खोटी व दिशाभूल करणारी माहिती भरून बदली करून घेतली आहे, अशी बाब आढळल्यास संबंधित शिक्षकाचे निलंबन करून त्याच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई मुख्य कार्यकारी अधिकारी प्रस्तावित करतील. (G.R. मुद्दा क्र.5.10.4 व 5.10.5)
4.दिव्यांग व्यक्तींसाठी असलेल्या लाभांचा इतरांनी जाणीवपूर्वक फायदा घेतल्यास, त्यांच्यावर RPWD Act 1995 व RPWD Act 2016 मधील तरतुदींनुसार कारवाई होऊ शकते.
■■ विशेष संवर्ग भाग-2 ■■
●पती-पत्नी यांच्या सध्याच्या कार्यरत कार्यालयांमध्ये 30 कि.मी. पेक्षा जास्त अंतर असेल तर दोघांपैकी ज्यांना बदली हवी आहे, ते विशेष संवर्ग 2 मध्ये फॉर्म भरू शकतात.शासन निर्णयातील मुद्दा क्र.1.9.1 ते 1.9.6 नुसार प्राधान्यक्रमाने संवर्ग 2 मधील शिक्षकांच्या बदल्या होतील.
●संवर्ग 2 साठी सेवेची कोणतीही अट नाही,मात्र एकदा विशेष संवर्ग 2 मधून बदली झाल्यानंतर पुन्हा 3 वर्षे विनंती बदली मागता येणार नाही. (G.R. मुद्दा क्र.4.3.6)
📢 विशेष संवर्ग भाग-2 साठी महत्त्वाच्या बाबी-
1.विशेष संवर्ग 2 मधील शिक्षकांना जोडीदाराच्या कार्यालयाच्या 30 कि.मी. परिघातील सर्व उपलब्ध जागांपैकी 30 पर्याय निवडला येतील.
2.30 कि.मी. रस्त्यांचे अंतर हे सर्वात जवळच्या मार्गाने ग्राह्य धरण्यात येईल.30 कि.मी.अंतराचा दाखला हा "कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग/ कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, बांधकाम विभाग" या सक्षम अधिकाऱ्यांचाच ग्राह्य धरला जाईल.(G.R.मुद्दा क्र.4.3.5)
इतर कोणताही अंतराचा दाखला ग्राह्य धरला जाणार नाही.
3.अर्ज पडताळणीमध्ये चुकीची माहिती भरल्याचे आढळल्यास त्यांचा अर्ज CEO लॉगिनवरून रद्द करण्यात येईल आणि त्यांच्यावर शासन निर्णय दि .28.06.2018 व उपसचिव, ग्रामविकास यांच्या दि.11.08.2022 च्या पत्रानुसार कारवाई होईल.
4.बदलीनंतर तक्रार प्राप्त झाल्यास व खोटी माहिती भरून बदली झाल्याचे आढळल्यास G.R.मुद्दा क्र.5.10.4 व 5.10.5 मधील तरतुदींनुसार निलंबनाची कारवाई होऊन मुख्य कार्यकारी अधिकारी शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करतील.
बदली व पोर्टल मदत
.......................................................
संवर्ग १/२ करिता मार्गदर्शक सुचना .....
2022 च्या बदल्या दिनांक 30 जून 2022 या तारखेनुसार केल्या जाणार आहेत. त्यामुळे या तारखेला सिस्टिमला व्हॅलीडेशन असणार आहे.
बदली बाबत आपणास कोणतीही शंका असल्यास दि.07/04/2021 चा शासन निर्णय व ग्राम विकास* *विभागामार्फत वेळोवेळी आलेली सूचना पत्रे काळजीपूर्वक वाचावीत तसेच विन्सिस सॉफ्टवेअर कंपनीचे अधिकृत VDO काळजीपूर्वक पाहावेत/ऐकावेत.
विशेष संवर्ग भाग एक च्या शिक्षकांनी अर्ज भरण्याची प्रक्रिया
➡️ पोर्टल वर लॉगिन केल्यानंतर पोर्टलच्या डाव्या मेनूमध्ये intra district टॅब दिसेल
➡️ या टॅब वर क्लिक केले की application form टॅब दिसू लागेल
➡️ त्यावर क्लिक केले की apply cadre 1. व apply cadre 2
हे दोन टॅब दिसतील
➡️ जे शिक्षक विशेष संवर्ग 1 चा लाभ घेऊ इच्छिता त्यांनी apply cadre 1 वर क्लिक करावे व जे शिक्षक विशेष संवर्ग 2 चा लाभ घेऊ इच्छितात त्यानी apply cadre 2 वर क्लिक करावे
➡️ Apply cadre 1 वर क्लिक केले की एक आपल्याला स्विकरण स्विकारावे लागेल
➡️ विशेष वर्ग भाग एक मध्ये येणाऱ्या शिक्षकांची बदली ही त्यांच्या खालील प्राधान्य क्रमानुसार होईल
➡️ शासन निर्णय 7 एप्रिल 2021 चे आदेशातील
व्याख्यातील प्राधान्य क्रमानुसार
त्यांच्या सेवाजेष्ठतेनुसार
जन्मतारखेप्रमाणे
व आडनावातील पहिल्या इंग्रजी आद्याक्षराप्रमाणे
वरील प्राधान्य क्रमानुसार बदली पात्र शिक्षकांच्या जागेवर बदली देण्यात येईल
➡️ तसेच विशेष स़वर्ग भाग एक मध्ये येणाऱ्या शिक्षकांना सक्षम अधिकाराचे प्रमाणपत्र आपल्या वरिष्ठ कार्यालयाला जमा करणे अनिवार्य आहे तसेच हे प्रमाणपत्र जर अवैद्य ठरल्यास किंवा प्रमाणपत्र देण्यास असमर्थ ठरल्यास वरील शिक्षकांचा बदली अर्ज रद्द करण्यात येईल
➡️ वरील स्विकारण स्विकारल्यानंतर विशेष संवर्ग भाग एकच्या शिक्षकांना बदली अर्ज दिसू लागेल
➡️ या अर्जामध्ये शिक्षकाचे नाव ,आडनाव, शालार्थ आयडी,व शाळेचा यु-डायस क्रमांक दिसून येईल
➡️ त्याखाली ज्या शिक्षकांचे नाव बदली पात्र यादीमध्ये आलेले असून त्यांना बदलीतून सूट हवी असेल म्हणजेच बदली नको असेल तर अशा शिक्षकांनी dropdown मधून Yes हा पर्याय निवडावा व
➡️ ज्या शिक्षकांना बदली प्रक्रियेतून सूट नको असेल म्हणजेच बदली हवी असेल तर अशा शिक्षकांनी dropdown मधून No हा पर्याय निवडावा
➡️ त्याखालील dropdown मधून विशेष संवर्गाचा प्रकार निवडावा
➡️ त्या ठिकाणी Self व Spouse हे दोन पर्याय दिसतील
➡️ Self म्हणजे विशेष संवर्ग एकच्या शिक्षकांनी स्वतः संदर्भात असलेल्या आजाराचा प्राधान्यक्रम निवडायचा आहे त्याखालील dropdown मधून आपल्या संबंधित असलेला आजाराचा प्राधान्यक्रम निवडावा
➡️ Spouse म्हणजे ज्या शिक्षकांचे जोडीदार आजाराने ग्रस्त असतील त्यांनी Spouse हा प्रकार निवडायचा आहे त्याखालील dropdown मधून आपल्या जोडीदाराच्या आजाराचा प्राधान्यक्रम निवडावा
➡️ व आपला अर्ज सबमिट करावा
➡️ शिक्षकाचे वय 53 वर्ष किंवा 53 वर्षापेक्षा जास्त झाले असेल व त्यांचे नाव बदली पात्र यादीमध्ये असेल तर अशा शिक्षकांना बदलीतून सूट हवी असेल तर त्यांनी Yes हा पर्याय निवडून Self मधील dropdown मधील 13 क्रमांकाचा मुद्दा प वयाने 53 वर्ष झालेले कर्मचारी हा पर्याय निवडून अर्ज सबमिट करावा
➡️ कोणत्याही शिक्षकाला फक्त एका वेळी एकाच संवर्गाचा लाभ मिळू शकेल
➡️ एखाद्या शिक्षकांनी संवर्ग एक मध्ये अर्ज केला असेल तर त्याला संवर्ग दोन चा लाभ मिळणार नाही पर्यायाने आपल्या जोडीदार संवर्ग दोन मध्ये असेल तर तो विस्थापित होईल
✳️ विशेष संवर्ग भाग दोन च्या शिक्षकांची अर्ज भरण्याची प्रक्रिया
➡️ जे शिक्षक संवर्ग दोन मध्ये येतात त्यांनी अर्ज भरतांना Apply cadre 2 या टॅब वर क्लिक करावे
➡️ क्लिक केल्यानंतर त्याखालील एक स्विकरण स्विकारावे लागेल त्याशिवाय अर्ज दिसणार नाही
➡️ ते खालील प्रमाणे
विशेष संवर्ग भाग दोन च्या शिक्षकांना सक्षम अधिकाराचे अंतराचे प्रमाणपत्र वरिष्ठ कार्यालयाला देणे अनिवार्य आहे हे प्रमाणपत्र देण्यास शिक्षक असमर्थ असेल तर त्यांचा अर्ज रद्द करण्यात येईल
➡️ वरील प्रकारचे स्विकरण स्विकारल्यानंतर शिक्षकाचा अर्ज स्क्रीनवर दिसून येईल
➡️ अर्जावर शिक्षकाचे नाव ,आडनाव ,शालार्थ आयडी व शाळेचा यु डायस क्रमांक दिसून येईल
➡️ त्याखालील आपल्याला आपल्या जोडीदाराच्या कार्यालयातील किंवा शाळेतील अंतर द्यावे लागेल हे अंतर 30 किलोमीटर पेक्षा जास्त असेल
➡️ त्यानंतर खालील दिलेल्या dropdown मधून आपल्या विशेष संवर्ग भाग दोन चा प्राधान्यक्रम निवडावा लागेल
➡️ वरील पर्याय विशेष संवर्ग भाग दोनच्या व्याख्येतील प्राधान्य क्रमाने असतील
➡️ जर तुम्ही 1.9.1 पहिला पर्याय पती-पत्नी दोघीही जिल्हा परिषद चे कर्मचारी हा पर्याय निवडल्यास
➡️ त्याखालील जोडीदाराचा शिक्षक प्रकार निवडावा लागेल
➡️ त्याखालील जर आपण Primary हा पर्याय निवडला तर तेथे जोडीदाराचा मोबाईल क्रमांक किंवा शालार्थ आयडी टाकावा लागेल हा पर्याय दोन्ही पती-पत्नी जिल्हा परिषद चे शिक्षक असून या बदली प्रक्रियेमध्ये असतील अशा शिक्षकांसाठी आहे
➡️ त्याखाली आपल्याला एक स्विकारण स्विकारावे लागेल
➡️ ते खालील प्रमाणे
आपल्या जोडीदाराने संवर्ग एक मधून अर्ज भरलेला असल्यास व आपण पती-पत्नी एकत्रीकरण अंतर्गत विशेष वर्ग भाग दोन मधून अर्ज करत असल्यास दोघांनाही एकाच संवर्गातून अर्ज करणे अनिवार्य असल्यामुळे आपण विस्थापित होऊ शकता हे मला मान्य आहे
➡️ वरील स्विकारण स्विकारल्यानंतर लगेच आपल्याला आपल्या जोडीदाराचे नाव, शाळेचे नाव ,शाळेचा यु-डायस क्रमांक स्क्रीनवर दिसून येईल.
➡️ त्याखालील सबमिट बटणावर क्लिक केल्यानंतर आपला अर्ज सबमिट होईल
➡️ जर आपण जोडीदाराचा शिक्षक प्रकार other than primary हा पर्याय निवडल्यास म्हणजेच हा पर्याय सुद्धा प्राधान्यक्रमातील 1.9.1 एक मधील पती-पत्नी दोघेही जिल्हा परिषद कर्मचारी असतील त्यापैकी एक शिक्षक असेल व एक जिल्हा परिषद चा शिक्षक अथवा कर्मचारी असेल अशांकरिता लागू आहे
➡️ आपणास जोडीदारचा मोबाईल नंबर किंवा शालार्थ आयडी टाकावा लागेल
➡️ त्यानंतर जोडीदार चे नाव, शाळेचे नाव, युडायस क्रमांक व उपलब्ध असलेली माहिती टाकून सबमिट करावा
➡️ आपणास जर पहिल्या पर्याय व्यतिरिक्त (1.9.2 ते 1.9.6 )दुसरा कोणताही पर्याय असल्यास तो पर्याय निवडून अर्ज सबमिट करावा
➡️ तसेच विशेष संवर्ग भाग दोन च्या शिक्षकांनी दोघांनाही एकाच संवर्गातून अर्ज करणे अनिवार्य आहे जर दोघांपैकी एकाने संवर्ग एक मधून व दुसऱ्याने संवर्ग दोन मधून अर्ज केल्यास संवर्ग दोन मधून अर्ज करणारा शिक्षक विस्थापित होऊ शकतो
✳️ पोर्टलवर फॉर्म कसा भरावा याबाबत विन्सिस सॉफ्टवेअर कंपनी कडून पाठवलेला VDO काळजीपूर्वक पाहावा.
-----------------------------------------------------------
✳️ जिल्हाअंतर्गत बदली वेळापत्रक तारखांसह विश्लेषण
✳️ जिल्हांतर्गत बदली पोर्टल सुरू झालेले आहे.सध्या केवळ CEO , EO आणि BEO लॉगिन सुरू झाले आहे.त्यांचे काम 4 नोव्हेंबर पर्यंत सुरू राहील. 5 नोव्हेंबर पासून शिक्षक लॉगिन सुरू होईल.
➡️ आपला मोबाईल नंबर खालील लिंक वर टाकून लॉगिन करून पाहावे.
https://ott.mahardd.in/
✳️ विशेष संवर्ग भाग 1 व 2 साठी फॉर्म भरणे. दि.5/11/2022 ते 7/11/2022
➡️ विशेष संवर्ग भाग 1 मध्ये येत असलेल्या शिक्षकांनी पोर्टलवर लॉगिन करून आपल्याला बदली पाहिजे असल्यास वरील 3 दिवसांच्या कालावधीमध्ये होकार नोंदवावा
जेणेकरून बदली यादी मध्ये आपले नाव समाविष्ट केले जाईल
➡️ व विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 नुसार पात्र असलेल्या शिक्षकाचे नाव बदली पात्र शिक्षक यादीमध्ये येत असल्यास व बदली नको असल्यास वरील 3 दिवसांच्या कालावधीमध्ये ऑनलाईन पोर्टलवर नकार नोंदवावा जेणेकरून आपले नाव यादीतून कमी केले जाईल
➡️ तसेच विशेष संवर्ग भाग 2 मध्ये दोन्हीही शिक्षक बदली प्रक्रियेमध्ये येत असल्यास ज्यांना आपल्या जोडीदाराजवळ जायचे आहे त्यांनी वरील 3 दिवसांच्या कालावधीमध्ये ऑनलाईन पोर्टलवर होकार नोंदवावा जेणेकरून त्यांचे नाव यादीमध्ये समाविष्ट करण्यात येईल
➡️ व ज्या जोडीदाराजवळ जायचे आहे त्यांचा नकार नोंदवावा त्यांचे नाव यादीतून कमी करण्यात येईल
➡️ दोघांपैकी (म्हणजेच जोडीदारांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व एक इतर कर्मचारी ) एकच जण बदली प्रक्रियेमध्ये येत असल्यास एकानेच ऑनलाइन पोर्टलवर होकार नोंदवावा
➡️ विशेष संवर्ग भाग 2 चे शिक्षक दोघांची सेवा क्षेत्रनिहाय सलग दहा वर्षापेक्षा कमी असेल व बदलीने सोय होत नसल्यास दोघांनाही नकार देता येतो अर्थातच पसंती क्रमांक न दिल्यास नकार समजला जातो तरीसुद्धा पोर्टलवर नका देण्याचा प्रयत्न करावा
हा मुद्दा GR प्रमाणे लागू होतो
✳️ विशेष संवर्ग भाग 1 साठी प्राधान्यक्रम भरणे- दि.24/11/2022 ते 26/11/2022 (3 दिवस)
➡️ विशेष संवर्ग भाग 1 मध्ये येत असणाऱ्या शिक्षकांनी वरील 3 दिवसांमध्ये पोर्टलवर आपला 30 किंवा आपल्या आवश्यकतेनुसार पोर्टलवर प्राधान्यक्रम नोंदवावा
➡️ या शिक्षकांना आपल्या प्राधान्य क्रमानुसार शाळा न मिळाल्यास पूर्वीचीच शाळा कायम राहील
➡️ विशेष संवर्ग भाग 1 च्या शिक्षकांना सेवा कालावधीची अट नाही
✳️ विशेष संवर्ग भाग 2 साठी प्राधान्यक्रम भरणे- दि.01/12/2022 ते 03/12/2022 (3 दिवस)
➡️ विशेष संवर्ग भाग 2 च्या वरील प्रमाणे होकार दिलेल्या शिक्षकांनी 30 शाळांचा प्राधान्यक्रम ऑनलाइन पोर्टलवर नोंदवावा
➡️ परंतु आपल्या प्राधान्यक्रमानुसार शाळा न मिळाल्यास विशेष संवर्ग भाग 2 चे क्वचितच शिक्षक विस्थापित होऊ शकतात
➡️ विशेष संवर्ग भाग 2 च्या शिक्षकांना आपला जोडीदार ज्या तालुक्यात कार्यरत आहे त्या तालुक्यातील कोणतीही शाळा निवडता येते परंतु दुसऱ्या तालुक्यातील निवडताना जोडीदाराच्या 30 किलोमीटर अंतरापर्यंतची शाळा निवडावी
➡️ विशेष संवर्ग भाग 2 चे शिक्षक दोघांची सेवा क्षेत्रनिहाय सलग दहा वर्षापेक्षा कमी असेल व बदलीने सोय होत नसल्यास दोघांनाही नकार देता येतो
✳️ बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी प्राधान्यक्रम भरणे- दि.08/12/2022 ते 10/12/2022 (3 दिवस)
➡️ बदली अधिकार पात्र शिक्षकांनी आपल्या सेवाजेष्ठतेनुसार 30 शाळा चा प्राधान्यक्रम वरील 3 दिवसांच्या कालावधीमध्ये ऑनलाइन पोर्टल वर नोंदवावा
➡️ परंतु ज्या शिक्षकांना बदली नको असल्यास त्यांनी प्राधान्यक्रम न भरल्यास त्यांची बदली होणार नाही
➡️ तसेच बदली अधिकार पात्र शिक्षकाला अवघड क्षेत्रामध्ये सलग 10 वर्ष व एका शाळेवर सलग पाच वर्षे सेवा झालेली असल्यास त्यांनी 30 शाळांचा प्राधान्यक्रम भरणे अनिवार्य राहील वेंशीस कंपनीच्या मार्गदर्शनावरून
➡️ अन्यथा या शिक्षकांनी प्राधान्यक्रम न दिल्यास त्यांची रिक्त जाग्यावर बदली करण्यात येईल
➡️ बदली अधिकार पात्र शिक्षक हे पुन्हा अवघड क्षेत्राचा प्राधान्यक्रम देऊ शकतात
➡️ बदली अधिकार पात्र शिक्षकांना पसंती क्रमाने शाळा न मिळाल्यास विस्थापित होऊ शकतात
✳️ बदलीपात्र शिक्षकांनी प्राधान्यक्रम भरणे- दि.15/12/2022 ते 17/12/2022 (3 दिवस)
➡️ ज्या शिक्षकांना सर्वसाधारण क्षेत्रामध्ये सलग दहा वर्ष व शाळेवर सलग पाच वर्ष झाली अशा शिक्षकांना सेवा जेष्ठतेने किमान 30 शाळांचा प्राधान्यक्रम वरील 3 दिवसांच्या कालावधीमध्ये देणे अनिवार्य आहे
➡️ बदली पात्र शिक्षकांना शक्यतोवर अवघड क्षेत्रातीलच शाळा मिळतील
➡️ बदली पात्र शिक्षकांनी बदली करिता अर्ज करताना विवरण पत्र 1 मधील अ व आ पर्यायांपैकी आ पर्याय निवडणे सोयीचे होईल कोणताही पर्याय न निवडल्यास संबंधित शिक्षक हा प्रशासकीय बदलीस पात्र ठरेल
✳️ विस्थापित शिक्षकांच्या राऊंडसाठी पर्याय भरणे. दि.22/12/2022 ते 24/12/2022 (3 दिवस)
➡️ विशेष संवर्ग भाग 1, विशेष संवर्ग भाग 2, बदली अधिकार पात्र शिक्षक तसेच बदली पात्र शिक्षक त्यांच्या बदली प्रक्रियेमधून विस्थापित झालेल्या शिक्षकांना वरील 3 दिवसांच्या कालावधीमध्ये पुन्हा 30 शाळांचा पसंती क्रम ऑनलाइन पोर्टल वर नोंदवावा लागेल*
➡️ विशेष संवर्ग भाग 1 विशेष संवर्ग भाग 2 मधील शिक्षकांनी पहिल्यांदाच प्राधान्यक्रम देताना संवर्गनिहाय यादीचा अभ्यास व आपली सेवा जेष्ठता व असलेल्या रिक्त जागांचा योग्य ताळमेळ लावल्यास विस्थापित होणार नाहीत
✳️ अवघड क्षेत्रातील राहिलेल्या रिक्त पदे भरण्यासाठी बदली प्रक्रिया चालवणे. दि. 30/12/2022 ते 01/01/2023 (3 दिवस)
➡️ अवघड क्षेत्रातील बदली पात्र शिक्षकांच्या बदली प्रक्रियेनंतर रिक्त जागा बदली पात्र शिक्षकांमधून पदस्थापित न झाल्यास ज्या शिक्षकांना सर्वसाधारण क्षेत्रामध्ये 10 वर्षाचे वर सेवा झालेले असल्यास अशा शिक्षकांना शाळेच्या कालावधीची अट राहणार नाही अशा शिक्षकांना वरील 3 दिवसांच्या कालावधीमध्ये शाळांचा प्राधान्यक्रम ऑनलाइन पोर्टलवर नोंदवावा
➡️ या ठिकाणी अवघड क्षेत्रातील जेवढ्या जागा रिक्त असतील तेवढ्याच शिक्षकांना सेवाजेष्ठतेने व प्राधान्यक्रमाने अवघड क्षेत्रातील रिक्त जागांवर पदस्थापित केले जाईल
➡️ ज्या शिक्षकांना आपल्या सेवाजेष्ठतीने व पसंतीक्रमाने शाळा न मिळाल्यास त्यांना उर्वरित रिक्त जागांवर पदस्थापित केले जाईल
✳️ बदलीचे आदेश प्रकाशित करणे. दि. 05/01/2023 ते 05/01/2023 (1 दिवस)
Hi
ReplyDelete