बदली

Wednesday, 22 February 2023

पोर्ट फोलिओ

 अध्ययनाचे मूल्यमापन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर वापरली जाणारी एक प्रक्रिया. पोर्टफोलिओ हा मूल्यमापन आणि अध्यापनाचे हेतू या दोहोंत सुसंगती आणण्याचा प्रभावी मार्ग आहे. कलावंत, लेखक, छायाचित्रकार, जाहिरातदार, मॉडेल्स, वास्तुशास्त्रातील तज्ज्ञ इत्यादी व्यक्ती आपापल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्याची जाणीव करून देण्यासाठी पोर्टफोलिओचा वापर करतात. तसेच अध्ययन, मूल्यमापन, बढती आणि मुल्यांकन या हेतूंसाठी पोर्टफोलिओचा वापर केला जातो. कार्याच्या संदर्भात तयार केलेल्या पोर्टफोलिओच्या माध्यमातून व्यक्तींचे विषयज्ञान, अध्यापन पद्धतींवरील प्रभुत्व, विमर्षी व्यवहार (रिफ्लेक्टिव प्रॅक्टिस), व्यावसायिक पूर्वतयारी व तज्ज्ञता आणि व्यवसाय या पैलूंच्या विकासाचे मुल्यांकन केले जाते. शैक्षणिक मूल्यमापन हा पोर्टफोलिओचा हेतू असल्याने त्यातील तपशील व्यक्तीने स्वत:च निवडणे आवश्यक असते. म्हणूनच पोर्टफोलिओच्या प्रत्येक व्याख्येत ‘विद्यार्थ्यांचा सहभाग…’ (स्टुडंट पार्टिसिपेशन इन…) अशी शब्दरचना असल्याचे आढळते. संबंधित व्यक्तीचे स्वत: रेखाटलेले शब्दचित्र असणे, हे पोर्टफोलिओचे वैशिष्ट असते.


प्रकारात सादर करता येतात.


(१) कार्यदर्शक पोर्टफोलिओ : यात विद्यार्थी पूर्ण करीत असलेल्या किंवा नुकतेच पूर्ण केलेल्या प्रकल्पाबाबत माहिती असते.


(२) प्रदर्शनार्थ पोर्टफोलिओ : यात विद्यार्थ्याच्या सर्वोत्कृष्ट/निवडक कार्याची मांडणी आणि प्रस्तुतीकरण असते.


(३) मूल्यमापनार्थ पोर्टफोलिओ : यात विद्यार्थ्याच्या विशिष्ट स्वरूपाच्या अध्ययनाचे हेतू आणि त्यासाठी आवश्यक बाबी साध्य केल्या आहेत का, हे सिद्ध करण्याऱ्या कार्याचा समावेश असतो.


(४) समग्र पोर्टफोलिओ : यात संपूर्ण विकासाचा आढावा घेता येतो. हे चारही प्रकार मूल्यमापनात वेगवेगळ्या स्तरावर विचारात घेता येतात. पोर्टफोलिओच्या काही वैशिष्ट्यपूर्ण निकषांमुळे त्याचा वापर मूल्यमापनासाठी करता येतो.


करण्याची क्षमता पोर्टफोलिओच्या विविध स्वरूपाच्या वापरात असते. पोर्टफोलिओचा मूल्यमापनासाठी वापर केल्यास अध्यापन व अध्ययन वर्तनांच्या नोंदी करण्यासाठी आणि त्याबाबत चिंतन करण्यासाठी संरचना आणि प्रक्रिया उपलब्ध होतात. त्यांना सार्वजनिक प्रसिद्धी देणे शक्य असते. सध्या नवीन मूल्यमापन प्रणालीवर भर दिला जात आहे. तरीही शिक्षणक्रम व मूल्यमापन यांतील सैद्धांतिक संबंध फारसा स्पष्ट केला जात नाही. सध्या अभ्यासक्रम आणि अध्ययनाचे मूल्यमापन यांत ऐक्य राहाणे आणि त्या दोन्ही बाबी अध्यापनशास्त्राशी सुसंगत राहाणे गरजेचे आहे. तसेच शिक्षणक्रमाचे विकसन आणि मूल्यमापन या दोहोंचे एकात्मीकरण करण्यासाठी पोर्टफोलिओचा वापर करणे हा चांगला पर्याय ठरतो. शिक्षणातून विचारप्रवृत्त/विमर्षी चिंतन करणारे विद्यार्थी किंवा व्यवसायाशी निष्ठा असणारे शिक्षक तयार करण्याची आकांशा शिक्षक – प्रशिक्षक ठेवतात. विचार, विमर्षी चिंतन, स्वयंमूल्यमापन, चिकित्सक विश्लेषण अशा महत्त्वपूर्ण क्षमतांच्या विकसनास पोर्टफोलिओचा वापर केल्याने चालना मिळते, असे संशोधनातून सिद्ध झाले आहे.


अध्ययन व मूल्यमापनासाठी पोर्टफोलिओचा वापर महत्त्वाचा ठरतो; कारण त्याचा वापर केल्याने उच्चस्तरीय स्व-अवबोधनाचा (मेटाकॉग्निटिव्ह) विकास होतो. पोर्टफोलिओमध्ये शिक्षणक्रम व अध्यापनशास्त्रीय यांचा समन्वय असल्याने स्व-अवबोधनाची प्रक्रिया अधिक विकसित होण्याची शक्यता वाढते. उच्चस्तरीय स्व-अवबोधनासाठी समस्याशोधन व निश्चिती, समस्येचे मानसिक रीत्या प्रस्तुतीकरण, वाटचालीसाठी नियोजन आणि स्वत:च्या संपादनाबाबतच्या ज्ञानाचे मूल्यमापन या चार प्रक्रियांची आवश्यकता असते. या प्रक्रियांचा अध्ययन व आकलनासाठी आवश्यक असणाऱ्या क्षमतांशी संबध पोर्टफोलिओच्या माध्यमातून जोडता येतो.


व्यावसायिक विकास हा शिक्षकांचा व्यावसायिक विकास होण्यासाठी, त्यांना आपल्या अध्ययन आणि अध्यापन व्यवहारांचे टीकात्मक परीक्षण करण्यासाठी महत्त्वाचे असते. सहयोगी शिक्षकांशी चर्चा करून त्यांनी नमूद केलेले मूल्यमापनही लक्षात घेतले जाते. शुल्मन यांनी प्रथमत: ही बाब निदर्शनास आणून दिली. त्यांच्या मते, अध्यापन पोर्टफोलिओ तयार करताना शिक्षकाला आपल्या अध्यापनाबाबत सहकार्यांशी चर्चा करण्याची संधी मिळते, हे पोर्टफोलिओचे वैशिष्ट होय.


पोर्टफोलिओचे विकसन : पोर्टफोलिओचे विकसन ही एक चिंतनात्मक व्यवहाराची प्रक्रिया असते. त्याद्वारे स्वनिर्देशित अध्ययनास चालना मिळते. व्यवसायातील नियोजन व विकासासाठी साह्य लाभते. पोर्टफोलिओचे विकसन ही एक दीर्घ प्रक्रिया असते. ते कार्य हाती घेणाऱ्यास सहा ते वीस तास लागू शकतात. सर्व सामग्री संकलित करणे, सर्व घटना व अध्ययन अनुभवांचे स्मरण करणे, आपला विचार नोंदविणे, इतर व्यक्तींकडून पुरावे आधार प्राप्त करणे अशा स्वरूपाच्या कार्यासाठी बराच कालावधी खर्च करावा लागतो. अर्थात, व्यक्तीच्या व्यावसायिक पक्वतेवर कालावधी अवलंबून असतो; पण एकदा त्या प्रक्रियेचा प्रारंभ केला की, पोर्टफोलिओमध्ये सातत्याने भर घालणे, शक्य तेवढी परिपूर्णता आणणे या बाबींचे महत्त्व समजू लागतात. पोर्टफोलिओचे विकसन करण्यासाठी पोर्टफोलिओच्या हेतूचे पुनरावलोकन, समर्पक सामग्रीचे संकलन, सर्व संबंधित अनुभवांचा समावेश, समन्वयक सहाध्यायीशी सल्लामसलत, विकसनाचे मुल्यांकन, पडताळणीसूची वापर, पोर्टफोलिओचे संयोजन व सुरक्षितता आणि सातत्याने भर घालून परिपूर्णता करणे या आठ टप्प्यांतून कार्यवाही करणे इष्ट ठरते.


औपचारिक शिक्षण घेताना, आपल्या पदात बदल करताना, पदोन्नतीची आकांशा ठेवताना वापर करता येतो.


हेलन बॅरेट यांनी इलेक्ट्रॉनिक पोर्टफोलिओच्या विकसनासाठी पुढील पाच टप्पे सुचविले आहेत.


(१) निवड : अध्ययनाच्या पूर्वनियोजित उद्दिष्टांवर आधारित पोर्टफोलिओत बाबींचा समावेश करण्यासाठी निकषांचे विकसन/निवड करणे.


(२) संग्रहण : पोर्टफोलिओचे हेतू, पोर्टफोलिओचे वाचक (वापर करणारे) आणि भविष्यकालीन वापर या दृष्टीने बाबींचे संकलन करणे.


(३) चिंतन : प्रत्येक बाबीची लक्षणीयता आणि संकलित केलेल्या सर्व सामग्रीचे एक एकसंध स्वरूप यांबाबत केलेल्या विचारांची/चिंतनाची विधाने नमूद करणे.


(४) दिशांकन : भविष्याचा वेध घेणाऱ्या आणि भविष्यातील हेतू निश्चित करणाऱ्या विचारांचे पुनरावलोकन करणे.


(५) संबंध : हायपरटेक्स्ट दुव्याची निर्मिती, प्रकाशन आणि प्रत्याभरणाची सोय करणे. पोर्टफोलिओ तयार करण्याची क्षमता विकसित होण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचार आणि स्वयंमूल्यमापन या क्षमता विकसित होणे गरजेचे असते. त्या क्षमता विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांना विशिष्ट प्रकारे अध्ययन करून योग्य आधार सामग्री पुरविणे महत्त्वाचे असते.


पोर्टफोलिओचे मूल्यमापन : पोर्टफोलिओचे मूल्यमापन हे समारोपात्मक, प्रशस्तीपत्र व निवड, आधारभूत अध्ययन व अध्यापन, व्यावसायिक विकास यांसाठी महत्त्वाचे ठरते. समारोपात्मक यात सर्वसमावेशक अध्ययन आणि मूल्यमापन प्रणाली यांच्याशी पोर्टफोलिओचा संबंध जोडून समारोपात्मक मूल्यमापन करता येते. शैक्षणिक क्षेत्रात पोर्टफोलिओचा प्रशस्तीपत्र आणि निवड या कारणांसाठी वापर करण्याची आवश्यकता असते. आधारभूत अध्ययन आणि अध्यापन या मुद्यातून पोर्टफोलिओची विकासात्मक अथवा संस्कारक्षम मूल्यमापनाची गरज जाणवते. विद्यार्थ्यांच्या संस्कारक्षम मूल्यमापनासाठी या पोर्टफोलिओचा वापर होतो. पोर्टफोलिओचे मूल्यमापन करताना काही समस्या येतात. उदा., व्यावहारिक समस्या. पोर्टफोलिओचे मूल्यमापन आणि श्रेणीदान करण्यासाठी पद्धती व प्रक्रिया या समस्या असतात. या समस्या तांत्रिक स्वरूपाच्या असतात. त्यात मूल्यमापन, श्रेणीदान यांची सप्रमानता, निष्कर्षांचे सामान्यीकरण करण्यातील अडचणी, मानसिक रचना सप्रमाणात निश्चित करण्यातील समस्या इत्यादी प्रश्न असतात.


पोर्टफोलिओचे मूल्यमापन करताना अध्यापनाचे फलित : पोर्टफोलिओमध्ये नमूद केलेली निरीक्षणे आणि फलिते यांचा शिक्षणाच्या प्रमुख हेतूशी संबंध असतो. त्यातून विद्यार्थ्यांची सकारात्मक अभिवृती आणि अध्ययन सवयी यांचे प्रतिबिंब जाणवते. वाचनाद्वारे अर्थनिर्वचन, अर्थविकसन, सकारात्मक अभिवृती विकसन हे अध्ययनाचे हेतू असतात. विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतांच्या मापनाद्वारे अध्ययनाच्या हेतूंचे मूल्यमापन करता येते.


दीर्घ कालावधीत विविध फलितांचे संकलन : पोर्टफोलिओसाठी आवश्यक सामग्री संकलनाची प्रक्रिया दीर्घ कालावधित केली जाते. त्यामुळे त्यातील तपशील हे व्यक्तिच्या वाढ व विकासाचे संकेत आणि पुरावे देतात. शिक्षकांनी विशिष्ट स्तरावरील व्यक्तिविकासाचे, विशिष्ट विषयातील विकसनाचे निकष निश्चित केल्यास विद्यार्थांच्या निकषांसंदर्भात विकासाचे मूल्यमापन करता येते.


साहित्याची विविधता : शिक्षकांनी केलेल्या नोंदी, शिक्षकांनी पूर्ण केलेल्या पडताळा सूची, विद्यार्थ्यांचे स्व-चिंतन, विद्यार्थ्यांनी केलेल्या वाचनाच्या नोंदी, नियतकालिकातील नमुन्याची पृष्ठे, लेखी सारांश, ध्वनिफिती, प्रकल्प पूर्णतेबाबत ध्वनीचित्रफिती अशा विविध प्रकारच्या साहित्याचा समावेश पोर्टफोलिओत होतो. प्रत्येक वेळी सर्व साहित्याचा वापर होईलच असे नाही; पण मूल्यमापनासाठी विविध साहित्याची उपलब्धता असते.


विद्यार्थी सहभाग : मूल्यमापन प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा सहभाग हा पोर्टफोलिओच्या मूल्यमापनाचा विशेष पैलू असतो.


विद्यार्थी प्रगतीच्या मूल्यमापनासाठी आशयाची समृद्धता : पोर्टफोलिओतून विविध प्रकारची सामग्री उपलब्ध होते. त्यांच्या आधारे अध्यापनाबाबतचे निर्णय घेण्यासाठी आधार प्राप्त होतात आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मूल्यमापन करता येते. विद्यार्थी विकासाचा दर्जा, अध्ययनातील प्रगती यांबाबतचे अहवाल पालकांना देता येतात. विकासाबाबतच्या निष्कर्षासाठी योग्य आधारभूत सामग्री पोर्टफोलिओतून प्राप्त होते. विद्यार्थ्यांना प्रेरणा देता येते. विद्यार्थ्यांनी स्वयंमूल्यमापन करावे आणि स्वत: बाबतचे आकलन त्यांनी करावे यांसाठी मार्गदर्शन करता येते. लिन बेकर आणि डनबार यांनी सप्रमाणतेच्या विस्तारित संकल्पनेत परिणाम, न्याय, संक्रमण व सामान्यीकरण, बोधात्मक संमिश्रता, आशयाची गुणवत्ता, आशय व्याप्ती, अर्थपूर्णता आणि मितव्ययता हे पैलू समाविष्ट केले आहेत. सप्रमाणतेच्या या सर्व निकषांचा पोर्टफोलिओच्या संदर्भात पूर्तता करणे शक्य होते.


अध्यापन व मूल्यमापन यातील जुळणी : पोर्टफोलिओद्वारे मूल्यमापन करणे म्हणजे ‘अध्यापनाचा एक भाग’ असा विचार करणे शक्य असते. शिक्षक अध्यापनाचे हेतू निश्चित करतात. ते साध्य करण्यासाठी अनुभूती देतात. हेतू किती प्रमाणात साध्य झाला, याचा पडताळा घेतात. म्हणजेच, मूल्यमापन हे प्रत्यक्ष अध्यापनातूनच उगम पावते. पारंपरिक मूल्यमापनात विविध कसोट्यांचा वापर होतो. त्यात नैमित्तिकता असते. गुणांकात बदल होण्याची शक्यता असते. त्यांची विश्वसनीयता व सप्रमानतेबाबत शंका घेता येते. अशा परिस्थितीत पोर्टफोलिओद्वारे केल्या जाणाऱ्या विविध स्वरूपाच्या मापनाचा आधार घेणे इष्ट ठरते.


साक्षरतेचे/ज्ञानाचे सप्रमाण वा वैध मापन : लिन बेकर आणि डनबार यांच्या मते विद्यार्थी, अध्यापन आणि शिक्षणक्रम असून यांवर होणाऱ्या परीणामाला त्यांनी परीणामात्मक सप्रमाण असे म्हटले आहे. सप्रमाणतेच्या या पैलूंचा उपयोग मूल्यमापनासाठी होतो. सप्रमाणतेमुळे विद्यार्थ्यांच्या विकासाला गती देता येते, अध्यापनाची गुणवत्ता वृद्धिंगत करता येते आणि शिक्षणक्रमात योग्य बदल करण्यासाठी आधार सामग्री प्राप्त होते.


गुगल साभार

No comments:

Post a Comment

करिअर निवडतांना.....

 करिअर निवडतांना..... नुकत्याच दहावी-बारावी च्या परीक्षा झाल्या.अनेक विद्यार्थ्यांनी आपले पेपर झाले म्हणून सुटकेचा निःश्वास टाकला. पण ही सुट...